Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
सोमवार, ऑगस्ट २९, २०२२
सोमवार, मार्च ०७, २०२२
जळगावच्या देवकर बीएससी नर्सिंग महाविद्यालयाला शासनाची मान्यता; प्रवेश प्रक्रिया सुरू
मंगळवार, नोव्हेंबर १६, २०२१
निळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक
रविवार, जुलै २५, २०२१
रात्रीच्या वेळी उपमहापौरांवर गोळीबार |
जळगाव : उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर आज (25 जुलै) रात्री पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाला आहे. हा गोळीबार हा त्यांच्या पिंप्राळा येथील घरावर झाला आहे. यात ते सुदैवाने बचावले आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर रात्री उशिरा गोळीबार झाला. यात ते सुदैवाने बचावले. रामानंद नगर पोलीस स्थानकात त्यांनी रितसर तक्रार केली. त्यानंतर पोलीस त्यांच्या घरी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आले. पोलीस याप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासण्याची शक्यता आहे. गोळीबार करणारे नेमके कोण होते ते अद्याप समजू शकलेले नाही. पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे.
बुधवार, मार्च २४, २०२१
चंद्रपूर, जळगावच्या शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारणी संदर्भातील कार्यवाहीस गती द्यावी
चंद्रपूर, जळगावच्या शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय
उभारणी संदर्भातील कार्यवाहीस गती द्यावी
- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई, दि. 24 : चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भात कराराप्रमाणे दिलेल्या सवलतीच्या कालावधीतच काम पूर्ण करावे. याचबरोबर जळगाव येथील शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे काम नियमानुसार उपलब्ध निधीत पूर्ण करावयाच्या कार्यवाहीस गती द्यावी. संबंधीत कामाचा अहवाल तात्काळ सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.
मंत्रालयात चंद्रपूर आणि जळगाव येथील शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, जे.जे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, केंद्र शासनाचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सल्टन्सी कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे महाव्यवस्थापक नरेंद्र कुमार, उपमहाव्यवस्थापक बिनोद कुमार, चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अरूण हुमने, जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री.पोटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर.के. जावन्जळ, यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.देशमुख म्हणाले, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम केंद्र शासनाने दिलेल्या सवलतीच्या कालावधीतच पूर्ण करावे. समांतर वैद्यकीय तंत्रज्ञान खरेदी आणि त्यासंदर्भातील तांत्रिक मान्यतेबाबतही कार्यवाहीस गती द्यावी. याचबरोबर जळगाव येथील रुग्णालयासाठीच्या जमिनीची पाहणी करून, केंद्र शासनाच्या प्रकल्प सल्लागार कंपनीप्रमाणे पुढील कार्यवाही करावी. संबंधीत कामाचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही मंत्री श्री.देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.