दि .२९ ऑगस्ट २०२२ रोजी यावल तालुका जिल्हा जळगाव येथे
यावल तहसिलदार कार्यालय येथे निळे निशाण सामाजिक संघटनेचे आंदोलन संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समिती प्रमुख चंद्रकांत गाढे , जिल्हा नियोजन समिती उपाध्यक्ष विनायक साळुंखे , जिल्हा नियोजन समिती महासचिव सदाशिव निकम , रोजगार मंच जिल्हा प्रमुख युवराज सोनवणे , जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे , जेष्ठ कार्यकर्त्या नंदाताई बाविस्कर , फैजपुर विभाग प्रमुख भगवान आढाळे यांच्या प्रमुख उपस्थित तसेच यावल तालुका अध्यक्ष विलास भास्कर , यावल तालुका महिला मंच अध्यक्षा लक्ष्मीताई मेढे यांच्या नेतृत्वा खाली आंदोलन करण्यात आले .
१) यावल तालुक्यातिल सांगवी बु ॥ येथिल भिल्ल समाजाकरिता दफनभुमी साठी जागा मिळणे बाबत
२) यावल तालुक्यातील धुळेपाडा येथे आदिवासी समाजा करिता सुःख - सोयी तात्काळ उपाय योजना करण्यात यावे या बाबत
3 ) यावल तालुक्यातील धुळेपाडा येथिल आदिवासी बहिंनाचा कुपोषणाने दुर्दैवी मृत्यु प्रकरण
तहसिलदारांना निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी निळे निशाण सामाजिक संघटनचे कार्यकर्ते व शेकडो आदिवासी महिला व पुरुष उपस्थित होते .