Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट २९, २०२२

माजी आमदार शोभाताई फडणवीस यांच्या लक्षवेधीला दहा वर्षांनी मिळाले उत्तर

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या काकू, माजी आमदार, माजी मंत्री शोभाताई फडणवीस (Shobhatai Fadnavis) यांनी 2012 मध्ये विचारण्यात आलेल्या लक्षवेधीच्या प्रश्नाला तब्बल दहा वर्षांनी उत्तर मिळाले.




'चंद्रपूर व गडचिरोली (chandrapur Gadchiroli) जिल्ह्यांत विविध साथीच्या आजारांची झालेली लागण' या विषयावरील लक्षवेधी सूचना शोभाताई फडणवीस व इतर विधानपरिषद सदस्यांनी नियम १०१ अन्वये ११ जुलै, २०१२ रोजी विचारली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेत शोभाताई फडणवीस यांनी काही उपप्रश्न विचारले होते. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला होते. मात्र मूळ लक्षवेधी चंद्रपूर-गडचिरोलीशी संबंधित असल्याने राज्यमंत्र्यांकडे त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत अधिकची माहिती नसल्याने त्याला उत्तर देताना तत्कालीन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्र्यांनी अधिक माहिती सभागृहासमोर ठेवण्याचे आश्वासन दिले होते. या विषयाला आज दहा वर्षे उलटून गेली अनेक सत्ता बदल झाले. तत्कालीन आमदार शोभाताई फडणवीस माजी झाल्या. त्यांचे पुतणे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री आहेत. तब्बल दहा वर्षे उलटून गेल्यानंतर चंद्रपूर गडचिरोलीच्या साथीच्या आजाराला उत्तर मिळाले आहे. शासकीय कामात किती दिरंगाई होते, याचा प्रत्यक्ष अनुभव उपमुख्यमंत्र्यांच्या काकुलाचा आहे.

Maharashtra political Vidhan mandal adhiveshan

Maharashtra India MH34 Maharashtra Chandrapur 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.