Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १०, २०१९

साखरपुड्यातच लग्न : पहुरचे लोढा आणि शिर्डीचा डोशी परिवाराचा आदर्श

खबरबात / लतीष जैन, जळगाव

चोपडा : लग्न सांगितले की, अनेक विधी, परंपरा, खानपान, मानपान अश्या अनेक विधी पार पाडत असतांना वधू पित्याला आणि वर पित्याला फार मोठी कसरत करावी लागते परंतु या सर्व विधींना फाटा देत साखर पुड्यातच लग्न आपटून पहुरचा लोढा परिवार, आणि शिर्डीचा डोशी परिवार यांनी नवीन आदर्श निर्माण केला आहे 

सविस्तर असे की, पहुर येथील रिखबचंद रायचंद लोढा यांच्या लहान मुलगा महेंद्रकुमार लोढा यांची कन्या दिशा हिचे शिर्डी येथील प्रकाशचंद उत्तमचंद डोशी यांचा मुलगा कमलेश यांच्याशी संबंध जुडले दि २५ जानेवारी रोजी पहुर येथील राजेंद्र लोढा यांच्या मुलीचे लग्न शिर्डी येथे होते त्या ठिकाणी कु दिशा आणि तिचे आजोबा रिखबचंद लोढा हे दोघ जण शिर्डी येथे लग्नाला गेले होते त्या ठिकाणी शिर्डी निवासी मदनलाल रूणवाल, सौ रेखा रुणवाल यांचे लोढा परिवारशी संबंध असल्याने यांनी पुढाकार घेत कमलेश डोशी हा मुलगा सुंदर आहे तो पाहून घ्या याविनंतीला मान देऊन रिखबचंद लोढा यांनी मुलगा बघितला आणि पसंतीचा होकार दिला त्याचवेळी दिशा हिनेही मुलगा पाहून घेतले आणि डोशी परिवाराने सुद्धा दिशाला सर्व लोकांनी पाहून पसंतीचे  होकार दिला फक्त दोन दिवसातच त्यांनी होकार देऊन साखरपुड्याची तारीख काढून घ्या असे सांगितले यानुसार ८ तारखेला नियोजित साखरपुडा ठरले होते यासाठी मुलीचे आजोबा स्वरूप लोढा, मोठे वडील सतीश लोढा, प्रफुल्ल लोढा संजय लोढा, जीतेंद्र लोढा हे तयारी करत होते मात्र खुद्द वर कमलेश डोशी यांनी लोढा परिवारा जवळ प्रस्ताव ठेवला की, आपली तयारी असेल तर साखरपुड्यातच लग्न करायचे आहे यावर लोढा परिवार चिंतेत झाले होते मात्र काही काळा नंतर लोढा परिवाराने ही होकार दिला आणि काय रात्र पूर्ण काळी करत दुरध्वनी वरून जितक्या लोकांशी संपर्क होईल तितक्या लोकांशी संपर्क करून बोलावले आणि अवघ्या २५० तो ३०० लोकांमध्ये साखरपुड्यातच दुपारीच लग्न लावले या लग्नात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ,जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन सह अनेकांनी हजेरी लावली यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी वधू - वरांना शुभआशीर्वाद देतांना म्हणाले की आदर्श लग्न , सामूहिक लग्न ही काळाची गरज आहे आम्ही आमच्या मतदार संघात फिरत असताना अत्यंत छोट्या छोट्या गावात दहा दहा वेळा फक्त लग्नाच्या हजेरी लावत फिरावे लागते या पेक्षा अश्या संपन्न परिवाराचा आदर्श सर्वानीच घ्यायला हवा आणि असे लग्न करणे काळाची गरज होऊन गेली आहे असे सांगत त्यांनी अनेक उदाहरणे देत आदर्श विवाहाचे महत्व सांगितले या लग्नाची स्तुती अनेकांनी केली आहे हे लग्न यशस्वी करण्यासाठी प्रकाश लोढा, प्रवीण लोढा, दिलीप बेदमुथा किशोर लोढा, विजय डोशी , रमनलाल रूणवाल,नंदलाल रुणवाल, श्रेणीक रुणवाल आदींनी मेहनत घेतली


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.