नागपूर/प्रतिनिधी:
महादुला येथे आयोजित ग्राहक मेळाव्याला मार्गदर्शन करतांना अधीक्षक अभियंता नारायण आमझरे
|
महावितरणची सेवा अधिकाधिक ग्राहकाभिमुख करून ग्राहकांच्या तक्रारी समजून घेत त्यांचे त्वरीत निराकरण करण्यासाठी ठिकठिकाणी ग्राहक मेळावे आयोजित करण्याच्या सुचना राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणच्या अधिका-यांना केले होते, त्याअनुषंगाने महावितरणतर्फ़े 23 जुलैपासून नागपूर जिल्ह्यात सर्वत्र ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे.
गुरुवारी महादुला, दहेगाव, उमरेड, त्रिमुर्तीनगर, हुडकेशवर, कन्हान, मोहाडी, कान्होलीबारा, बाजारगाव, पिपळा आदी ठिकाणी या मेळाव्यांचे आयोजन करून तेथे उपस्थित ग्राहकांच्या समस्या जाणून घेत त्यापैकी बहुतांश समस्यांचे निराकरण जागीच करण्यात आले. नगरपंचायत महादुला येथे आयोजित मेळाव्यात महादुला नगर पंचायतचे अध्यक्ष राजेश रंगारी उपाध्यक्ष धनंजय भालेराव आणि स्थानिक नगरसेवकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महावितरणच्या नागपूर ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, सावनेर विभागाचे कार्यकारी अभियंता कुलदीप भस्मे, खापरखेडा उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत टेंभेकर, महादुला वीज वितरण केंद्राचे सहाय्यक अभियंता रुपेश खवसे यांचेसह इतर कर्मचारी उपस्थित होते.
उमरेड उपविभागांतर्गतही ग्राहक मेळाव्याचे आयोजन करून ग्राहकांच्या समस्या जाणुन घेण्यात आल्या, यावेळी कार्यकारी अभियंता प्रफ़ुल लांडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. तर पारशिवनी उपविभागांतर्गत दहेगाव, हिंगणा उपविभागांतर्गत कान्होलीबारा तसेच कन्हान उपविभागांतर्गत कन्हान ग्रामिण शाखा कार्यालयातर्फ़े ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वाडीभस्मे यांच्यासमवेत परिसरातील सर्व सरपंच उपस्थित होते. यावेळी कृषीपंप जोडणीसाठी अर्ज केलेल्या शेतक-यांना आवश्यक शुल्काचे मागणीपत्रही वितरीत करण्यात आले.
कॉग्रेसनगर विभागातील त्रिमुर्तीनगर उपविभाग आणि हुडकेश्वर उपविभागांतर्गत असलेल्या पिपळा ग्रामपंचात येथेही महावितरणतर्फ़े ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, कार्यकारी अभियंता कुंदन भिसे आणि त्यांच्या सहका-यांनी यावेळी वीजग्राहकांच्या समस्या एकून घेत अनेक तक्रारींची जागेवरव सोडवणूक केली. या मेळाव्यांत महावितरणतर्फ़े राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती उपस्थित ग्राहकांना देण्यात येऊन या योजनांचा लाब घेण्याचे आवाहनही महावितरणतर्फ़े करण्यात आले.