Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गोंदिया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गोंदिया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, जुलै २८, २०२२

 भीषण अपघातात  चौघे ठार; तर दोन गंभीर जखमी

भीषण अपघातात चौघे ठार; तर दोन गंभीर जखमी




संजीव बडोले प्रतिनिधी.                                        
नवेगावबांध दि.२८ जुलै :-

काल दि.२७ जुलै रोज बुधवार ला रात्री ११:०० वाजेच्या सुमारास नवेगावबांध येथुन सोलर पंप फिटिंग करून कामावरून आमगाव तालुक्यातील नवेगाव येथे आपल्या स्वगावी घरी परततांना नवेगावबांध कोहमारा मार्गावर खोबा व परसोडीच्या मध्ये जंगल परीसरात टाटा नेक्सान क्र. एमएच ५३,एजी  ८७७१ या चार चाकी वाहनाचा तोल बिघडून झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन युवकांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला . असे या अपघातात चार युवक ठार झाले. सर्व मृतक १८ ते २४ वर्षे वयोगटातील आहेत.तर दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. मृतकामध्ये आमगाव तालुक्यातील नवेगाव येथील रामकृष्ण योगराज बिसेन वय २४ वर्ष, सचिन गोरेलाल कटरे वय २३ वर्ष,यांचा जागेवरच अपघाती मृत्यु झाला.संदिप जागेश्र्वर सोनवाने वय १८ वर्ष नवेगाव तालुका आमगाव, तर चालक  वरुन निलेश तुरकर वय २७ वर्ष ,राहणार भजेपार तालुका आमगाव यांचा उपचारादरम्यान ग्रामिण रुग्णालय नवेगावबांध येथे  अपघाती मृत्यू झाला आहे. चार चाकी वाहनाने जबरदस्त धडक दिल्याने गाडीचा चंदामेंदा झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार संजय पांढरे आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळावर दाखल होऊन,जखमींना उपचारासाठी नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मधुसुदन नंदलाल बिसेन वय २३ वर्ष ,प्रदीप कमलेश्वर बिसेन वय २४ वर्ष दोन्ही  राहणार नवेगाव तालुका आमगाव जि. गोंदीया यांना पुढील उपचाराकारिता केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदीया येथे  रेफर करण्यात आले. सदर जखमी गोंदिया येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजते.चारही मृतकाचे मृतदेह शवविच्छेदनाकरिता  पोलिसांनी नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.घटनेच्या तपास डुग्गीपार व नवेगावबांध पोलीस करीत आहेत.

सोमवार, जुलै २५, २०२२

 येत्या ३ दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस.

येत्या ३ दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस.

#BIGNEWS Monsoon
विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा जोर धरणार
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
नागपूर, चंद्रपूर, अकोला, गडचिरोली, गोंदियाला ‘यलो अलर्ट’


येत्या ३ दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढचे ३ दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही जिल्ह्यांत पूरस्थिती होती. राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर या भागातील नद्यांची पाणी पातळी घटली असून पूरही ओसरला आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याने विदर्भाची चिंता वाढवलीय. विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. याशिवाय मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आलाय.
मागील आठ दिवसापासून गायब असलेल्या पावसानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे. रात्रीपासून जिल्ह्याचा अनेक भागांमध्ये सरींवरती पाऊस बरसत आहे. कोसळणाऱ्या सरी या जोरदार अशाच आहेत. सध्या देखील जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. रात्री उशिरा जिल्हा माहिती कार्यालयाने जगबुडीबाबत दिलेली माहिती आहे. पाऊस पडत असला तरी जिल्ह्याच्या जनजीवनावरती मात्र कोणताही मोठा परिणाम झालेला नाही.

गुरुवार, जुलै २१, २०२२

सावरटोला परिसरात अतिवृष्टीचा भात पिकाबरोबरच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका.

सावरटोला परिसरात अतिवृष्टीचा भात पिकाबरोबरच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका.

राष्ट्रवादी चे मुख्यमंत्र्यांना निवेदन.












संजीव बडोल प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२१ जुलै:-
गेल्या आठवड्यापासून परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे  भाताबरोबरच भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाली आहे. नुकसानग्रस्त धानपिक व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करून पंचनामे,सर्वे करून करून पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किशोर तरुणे यांनी केली आहे.नवेगावबांध परिसरामध्ये सततच्या पावसामुळे नाल्यांना पूर आल्याने भातशेतीचे रोपवाटीकांची नुकसान झालेली आहे. परंतु त्याच बरोबर छोट्या छोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेती या पुराच्या पाण्याखाली बुडलेली आहे. कुणाच्या पानामुळे धनाची परे सडलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे शेतकरी रोवणी कशी करणार. असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. धान पिकाची रोग निघालेल्या बांधावर पुराचे पाणी साठून आहे.  सावरटोलाबोरटोला परिसरात नाल्याच्या पुरामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली आली आहे. पूर पीडित शेतकऱ्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पुराच्या पाण्याखाली असलेल्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी वारंवार केली आहे परंतु संबंधित विभागाने अद्यापही लक्ष दिले नाही. वारंवार प्रसारमाध्यमाद्वारे तसेच महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही अजून पर्यंत प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे लक्षात येत आहे. नदी,नाल्याकाठी गावातील तलावाच्या बॅकवॉटर परिसरातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे केल्याचे अजून पर्यंत निदर्शनास आले नाही. तरी माननीय जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सूक्ष्मातिसूक्ष्म सर्वे करून प्रत्यक्ष नुकसान झालेल्या लाभार्थ्यांना नुकसान भरपाई चा लाभ घेण्याकरिता प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत. अशी विनंती माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी केली आहे.
कोट
दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज दिनांक 21 जुलैला तहसीलदार विनोद मेश्राम यांना मुख्यमंत्र्याच्या नावे निवेदन देण्यात आले.तहसीलदार,कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, स्थानिक तलाठी,सरपंच,पोलीस पाटील यांच्या मार्फत सूक्ष्म सर्वेक्षण करून पंचनामे करावेत. अशी मागणी करण्यात आली. यावेळी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष  लोकपाल गहाणे,किशोर तरोणे, दुर्योधन मैंद,डॉ. दीपकरहिले, योगेश हलमारे, राकेश लंजे,देवानंद नंदेश्वर निवेदन देताना उपस्थित होते.
गरजू विद्यार्थ्यांसाठी नवेगावबांध पोलीस ठाण्यात मार्गदर्शन शिबिर.

गरजू विद्यार्थ्यांसाठी नवेगावबांध पोलीस ठाण्यात मार्गदर्शन शिबिर.



संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.२१जुलै:-
येथील पोलीस ठाण्यात नक्षल दमन सप्ताहा अंतर्गत परिसरातील गरजू विद्यार्थी तसेच  पोलीस भरती,इतर स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्याकरिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दिनांक २१ जुलै रोजी गुरुवारला करण्यात आले होते. सदर शिबिरात नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे,पोलीस उपनिरीक्षक तुकाराम नांगरे, सि ६० पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोरखंडे यांनी मार्गदर्शन केले शिबिराला परिसरातील ५० गरजू विद्यार्थी उपस्थित होते. पोलीस स्टेशन स्थित वाचनालयाचा लाभ विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी करावा असे आवाहन ठाणेदार पांढरे यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
अतिवृष्टीमुळे नाल्यांना पूर, सावरटोला -पिंपळगाव मार्गावरील वाहतुक दुसऱ्यांदा बंद

अतिवृष्टीमुळे नाल्यांना पूर, सावरटोला -पिंपळगाव मार्गावरील वाहतुक दुसऱ्यांदा बंद

अतिवृष्टीमुळे नाल्यांना पूर, सावरटोला -पिंपळगाव मार्गावरील वाहतुक दुसऱ्यांदा बंद

Drains flooded due to heavy rains, Savartola-Pimpalgaon route closed for the second time





संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी /गोंदिया
नवेगावबांध:-काल दिनांक २० जुलै दुपारपासून परिसरात पावसाने झोडपले. मुसळधार पावसामुळे परिसरातील नाल्यांना पूर आलेला आहे. काल मध्यरात्रीपासून सावरटोला-पिंपळगाव मार्गावरील नाल्यावर पूर आला असून,नाला दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे सावरटोला, बोरटोला पिंपळगाव मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक बंद झाली आहे.परिसरातील नाल्याला लागूनअसलेल्या सावरटोला, बोरटोला, चापटी,सुरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे. 12 जुलै च्या पहिल्या पुरानंतर काल मध्यरात्रीपासून नाल्याला आलेल्या पुरामुळे परिसरातील शेती पूर्वीपेक्षा जास्त पाण्यात बुडाली आहे.शेतातील बांध पाण्याने तुडुंब भरली आहेत.१२ जुलैला याच नाल्याला एकदा पूर आला होता.धान पिकांची रोवणी पुरामुळे पुन्हा एकदा आणखी खोळंबली आहेत. धानपिकांचे पऱ्हे व रोवलेले पीक पाण्याखाली आल्यामुळे ते सडण्याची भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुन्हा जाण्याच्या रोगणी करिता परे आणायचे कुठून? असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. १२ जुलै चा पूर ओसरल्यावर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आणलेले शेतातील मोटार पंपाचे पाईपही पुरात वाहून गेले आहेत. तसेच विहिरीला लावलेल्या मोटारी सुद्धा वाहून गेल्यात, तर काही पाण्यामुळे खराब झाल्या आहेत. पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी सावरटोला, बोरटोला,चापटी,सुरगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
 प्रफुल पटेल यांच्या इमारतीचे चार मजले जप्त |

प्रफुल पटेल यांच्या इमारतीचे चार मजले जप्त |

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांची काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. आज ईडीने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यांचं वरळीतील घर जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. वरळीतील सीजे हाऊसमधील चार मजले जप्त करण्यात आले आहेत.

#Maharashtra, #Mumbai #Gondia #NCP leader #Praful Patel

वरळी येथे सीजे हाऊस नावाची मोठी इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामाआधी त्या जागेवर एक छोटीशी इमारत होती. ही इमारत गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या ताब्यात होती. या कंपनीची पुनर्बांधणी प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केली होती. त्या मोबदल्यात प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबियांना काही जागा आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम दिली असल्याची माहिती आहे. या व्यवहारात गैरप्रकार झालाचा संशय ईडीला आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेलांवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इक्बाल मिर्ची प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे. प्रफुल पटेल यांची २०१९ मध्ये चौकशीही झाली होती. इक्बाल मिर्ची प्रकरणी हे आरोप होते. त्यानंतर प्रफुल पटेल यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यानंतर आपलं म्हणणं मांडलं होतं. आता याच प्रकरणात ईडीने चार मजले म्हणजेच प्रफुल पटेल यांचं घर जप्त केलं आहे. 


 #Maharashtra, #Mumbai #Gondia #NCP leader #Praful Patel



शनिवार, जुलै १६, २०२२

बिबट्याने बोरटोला येथे दोन शेळ्यांचा पाडला फडशा |

बिबट्याने बोरटोला येथे दोन शेळ्यांचा पाडला फडशा |

   


संजीव बडोले/ जिल्हा प्रतिनिधी गोंदिया

नवेगावबांध | आज १६ मे रोज शनिवारला रात्री दोन अडीच वाजेच्या दरम्यान बोरटोला येथील पतीकुमार रणदिवे यांच्या घरी गोठ्यात बिबट्याने  प्रवेश केला. एक शेळीचा करडू व शेळीला ठार मारले अंदाजे दोन ते  तीन हजार रुपयाचे रणदिवे यांचे नुकसान झाले आहे.

रात्री दोन अडीच वाजेच्या सुमारास बोरटोला निवासी पतीकुमार रणदिवे यांच्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश करून शेळीचा एक कर्डलू (पाटरु) घेऊन बिबट गेला. बिबट आल्याची चाहूल लागताच पतीकुमार रणदिवे हे रात्रीच घराच्या बाहेर पडले. बिबट्याला हाकलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु उलट  बिबटया त्यांच्या अंगावर चालून आला. भीतीमुळे पतीकुमार हे आपल्या घरात शिरले. त्यावेळी त्यांच्या अंगाला थरकाप सुटला होता.

पुन्हा बिबट आला व त्याने गोठ्यात खुंटाला बांधलेल्या शेळीचा फडसा पाडला. घरातून रणदिवे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरड केली असता,बिबट तिथून पसार झाला.

शेळी व  बिबट्याचे पायाचे ठसे  गोठ्याच्या आजूबाजूला उमटलेले दिसले. अंदाजे दोन ते तीन हजार रुपयाचे रणदिवे यांचे नुकसान झाले आहे.

वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रणदिवे यांच्या येथील घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे.त्यानंतर याच बिबट्याने गोविंदा ब्राह्मणकर यांच्या घरी गोठ्यात रात्रीच आपला मोर्चा वळविला.


गोठ्यात बंद असलेल्या शेळ्या वर हल्ला करण्यासाठी,गोठयाच्या दाराला बिबट्याने धक्का दिला.परंतु गोविंदा ब्राह्मणकर यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने, तिथूनही बिबट्याने काढता पाय घेतला. ब्राह्मणकर यांचे अंगणात बिबट वाघाच्या पायाचे ठसे उमटलेले दिसले. गेल्या ७-८ दिवसापासून गावातील अनेक कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या आहेत.मागील महिन्यात उमरी,सावरटोला येथीलही  दहा ते बारा कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या होत्या. 


बोरटोला, उमरी सावरटोला या तिन्ही गावातील लोक गाई,म्हशीं, शेळया, बकरे  पाळत आहेत. त्यामुळे गोपालकांचे देखील धाबे दणाणले आहेत. त्यांच्या आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. सायंकाळ झाली की या तिन्ही गावच्या नागरिकात धाक धुक वाढत असते. गेल्या पंधरा-वीस दिवसापासून गावात बिबट वाघ फिरत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. आतापर्यंत बिबट्याने दहा-बारा कोंबड्या फस्त केल्याची माहिती आहे.शेताच्या बाजूने गावात हा बिबट प्रवेश करीत असतो. बहुतेक तो भिवखिडकी, पिंपळगाव,बोरटोला, इंजोरी च्या जंगलातून येत असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. वन्यजीव मानव संघर्ष होऊ नये. म्हणून वन विभागाने वेळीच या बिबट्याचा बंदोबस्त करावा,  अशी मागणी  बोरटोला ग्रामवासियांनी केली आहे.

बुधवार, जुलै १३, २०२२

 सावरटोला -पिंपळगाव मार्ग वाहतुक बंद |

सावरटोला -पिंपळगाव मार्ग वाहतुक बंद |


नवेगावबांध परिसरात दुपारपासून मुसळधार पावसाने झोडपले  




संजीव बडोले/ जिल्हा प्रतिनिधी गोंदिया


नवेगावबांध दि.१३ जुलै:-

गोंदिया जिल्ह्यात काल  दुपारपासून परिसरात पावसाने झोडपले. मुसळधार पावसामुळे परिसरातील नाल्यांना पूर आलेला आहे. काल मध्यरात्रीपासून मोरगाव अर्जुनी तालुक्यातील  सावरटोला-पिंपळगाव मार्गावरील नाल्यावर पूर आला असून,नाला दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे सावरटोला, बोरटोला पिंपळगाव  मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक बंद झाली आहे.परिसरातील नाल्याला लागूनअसलेल्या सावरटोला, बोरटोला, चापटी,सुरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे. शेतातील बांध पाण्याने तुडुंब भरली आहेत. धान पिकांची  रोवणी खोळंबली आहेत. धानपिकांचे  पऱ्हे  पाण्याखाली आल्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील मोटार पंपाचे पाईपही पुरात वाहून गेले आहेत. तसेच विहिरीला लावलेल्या मोटारी सुद्धा वाहून गेल्यात, तर काही पाण्यामुळे खराब झाल्या आहेत. पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी सावरटोला, बोरटोला,चापटी,सुरगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे.


#rain #nature #rainyday #photography #love #naturephotography #clouds #photooftheday #weather #sky #instagood #instagram #water #travel #storm #photo #art #raindrops #rainbow #beautiful #rainy #india #raining #picoftheday #landscape #summer #sunset #ig #flowers #monsoon

रविवार, जून २६, २०२२

काय हे खरे आहे का?पावसाचे संकेत देणा-या कावळ्याचे घरटे दुर्मिळ...!

काय हे खरे आहे का?पावसाचे संकेत देणा-या कावळ्याचे घरटे दुर्मिळ...!




संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि. २६ जून:-
पशु, पक्षी हे निसर्गात होणारे बदल लवकर टिपतात, त्यानुसार वर्तनही करतात.पुर्वी हवामानाचा अंदाज सांगणारी यंत्रणा नव्हती.त्यावेळेस पशुपक्ष्यांच्या विशिष्ट हालचालीवरून पावसाचा अंदाज बांधला जात होता. कावळ्याच्या घरट्यावरून पाऊस यंदा कशा स्वरुपाचे पडेल याचे संकेत मिळत होते.आजही पुर्वी सांगत असलेले लोक कावळ्याचे घरटे झाडाच्या कोणत्या भागात बांधले यावरून पावसाचा अंदाज बांधीत होते.कावळ्याने झाडाच्या अगदी शेंड्यावर घरटी बांधल्याने कमी पावसाचे संकेत सांगत असत.पक्षी
पुरातन काळापासून ग्रामीण भागात कावळ्याला पावसाचे संकेत देणारा पक्षी समजत असत.पण दिवसेंदिवस कावळ्यांची संख्या कमी झाल्याने गावखेड्यात व शहरी भागात घरटी शोधावी लागतात.पूर्वीच्या काळात हवामान खाते नसल्याने गावठी उपाय व अंदाजावर अवलंबून राहत असत.काळानुसार विज्ञानाने प्रगती केली असली तरी पावसाच्या संबंधात हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरतो.पण पक्षांचा (कावळ्याचा ) अंदाज खरा ठरतो.कावळ्यांचे घरटे बोर, जांभूळ, बाभूळ,सावळ यासारखे काटेरी झाडावर कावळ्याचे घरटे आढळल्यास कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते.तर आंबा,निंब, अर्जुन,करंज,चिंच यासारख्या झाडावर घरटी केल्यास चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात होती.परंतू कावळ्यांची घरटी झाडाच्या शेंड्यावर असल्यास अल्प (कमी) पावसाचे संकेत समजले जात असे .पण आता कावळ्यांची घरटी दुर्मिळ झाले आहेत. शोधून सुद्धा कावळ्यांची घरटी दिसत नाही. एखादेच घरटी दिसतात.असे सदर प्रतिनिधी जवळ कोसमतोंडी येथील गुराखी घुशीराम वाघाडे यांनी सांगितले.

शनिवार, जून २५, २०२२

जि.प.उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणविर यांनी गुढेवार परीवाराचे केले सांत्वन.

जि.प.उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणविर यांनी गुढेवार परीवाराचे केले सांत्वन.





संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.२५ जून:- दि.२३ जून रोज गुरुवारला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास मौजा बोरटोला येथील पवन मनोहर गुढेवार वय २७ वर्षे यांचा शेतात काम करत असताना वीज पडुन मृत्यू झाला होता.गुढेवार परीवाराचे सांत्वन करण्यासाठी आज दिनांक २५ जून रोज‌ शनिवारला जि.प.उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणविर यांनी सांत्वन भेट घेतली.परीवारातील सदस्यांना विचारपुस केली, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधुन गुढेवार परीवाराला लवकरात लवकर पाठपुरावा करुन शासनाची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.तसेच त्यांना आर्थिक मदत केली.  परीवाराला या  दुःखातून सावरण्याची ईश्वरचरणी प्रार्थना केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष लोकपाल  गहाणे तसेच ,चुन्नीलाल येरणे, जितेंद्र गुढेवार,किसनलाल गुढेवार,प्रितम सुर्यवंशी तथा गुढेवार परीवाराचे नातेवाईक उपस्थित होते.

शनिवार, जून १८, २०२२

शेतात पेरणी करताना वीज पडून महिलेचा मृत्यु.सडकअर्जुनी तालुक्यातील सालेधारणी येथील घटना.

शेतात पेरणी करताना वीज पडून महिलेचा मृत्यु.सडकअर्जुनी तालुक्यातील सालेधारणी येथील घटना.



संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१८ जून:-
गोंदिया जिल्ह्यात सडक अर्जूनी तालुका अंतर्गत येत असलेल्या मौजा सालेधारणी येथे लीला योगराज हिडामे वय ४० वर्ष ही स्वतःच्या शेतात पेरणी करत असताना अचानक पाऊस सुरू झाला व लीला च्या अंगावर वीज पडल्याने तिचा शेतातच मृत्यू झाला.गोंदिया जिल्ह्यात आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे.सदर महिलेला 2 मुले आहेत. शासना कडून मृत्यू झालेल्या महिलेच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी सालेधारणीचे संतोष पाटील, गोंडवाना समाज चे गोंदिया जिल्हा प्रमुख भारत मडावी यांची केली आहे.

शुक्रवार, जून १७, २०२२

सम्राट अशोक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल.१२ प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांसह,प्रथम श्रेणीत १३ विद्यार्थी उत्तीर्ण.

सम्राट अशोक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल.१२ प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांसह,प्रथम श्रेणीत १३ विद्यार्थी उत्तीर्ण.

१२ प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांसह, प्रथम श्रेणीत १३ विद्यार्थी उत्तीर्ण.

संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.१७.
सम्राट अशोक विद्यालय उमरी येथील माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे परीक्षेला परीक्षेला एकूण 30 विद्यार्थी बसले होते 12 विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले,प्रथम श्रेणी 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, द्वितीय श्रेणीत पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव एल. आर.भैसारे यांनी अभिनंदन केले आहे. विद्यालयातून ८५.६० टक्के गुण घेऊन साक्षी रणजीत कापसे प्रथम आली. ८५.४० टक्के गुण घेऊन यज्ञा रवीकुमार येरणे, तर तृतीय क्रमांकाने८४.४० टक्के गुण घेऊन नंदिनी रवींद्र पराते उत्तीर्ण झाले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे घरी जाऊन पुष्पगुच्छ व मिठाई भरवून विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस. टेंभुर्णे,वर्गशिक्षक एस.व्ही. बडोले,के.एम.भैसारे यांनी सत्कार करून गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकांना दिले. गुणवंत विद्यार्थ्यांचे गावात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

रविवार, जून १२, २०२२

महींद्र गाडीची कोंबड्या भरलेल्या पिकअप गाडीला जबर धडक. ५ गंभीर ७ किरकोळ जखमी.देवलगाव शिवारातील घटना. गावकऱ्यांनी केली कोंबड्यांची दावत.

महींद्र गाडीची कोंबड्या भरलेल्या पिकअप गाडीला जबर धडक. ५ गंभीर ७ किरकोळ जखमी.देवलगाव शिवारातील घटना. गावकऱ्यांनी केली कोंबड्यांची दावत.

देवलगाव ग्रामवाशीयांची मात्र चंगळ, केली कोंबड्यांची दावत.



संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि. १२ जून:-
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील
कोहमारा-वडसा मार्गावर देवलगाव शिवारात रस्त्याच्या डाव्या कडेला उभ्या असलेल्या कोंबड्या भरलेल्या पीकअप गाडीला नवेगावबांध कडुन चंद्रपुरला जाणा-या महींद्रा एसयुव्ही प्रवासी गाडीने जबर धडक दिल्याने
झालेल्या अपघातात पाच गंभीर जखमी तर सात जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. ही घटना आज दिनांक १२ जून रोज रविवार ला सकाळी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान घडली.प्राप्त माहितीनुसार,विलास अर्जुन चौधरी वाहन चालक राहणार गांगलवाडी तालुका चंद्रपूर हे सत्यवान गणपत निंबेकर राहणार तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली यांच्या मालकीची महिंद्रा बोलेरो मॅक्सिट्रक( पिकअप) क्रमांक एमएच ३३,टी २६३६, वर्मा पोल्ट्री फार्म दातापूर खुर जिल्हा राजनांदगाव छत्तीसगढ येथून देशी कॉकरेल जातीच्या १२०० कोंबड्या घेऊन वडसाला जायला निघाला होते.देवलगाव येथील कोहमारा वडसा मार्गावर आश्रम शाळेच्या जवळ वाहक शौचास गेला होता. त्यामुळे कोबड्याची वाहतूक करीत असलेली पिकअप गाडी डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला उभी होती. पिकप गाडी चा क्लिनर गाडीतच बसून होता. अर्जुनी मोरगाव च्या दिशेने जाणाऱ्या कनसु छेदीलाल निषाद राहणार न्यू लखमापूर,जिल्हा चंद्रपूर हे भरधाव वेगाने चालवित असलेल्या महिंद्रा कंपनीची एक्सयुव्ही गाडी क्रमांक जिजे०५,जेएम ७८६७ भरधाव वेगाने पिकअप गाडीला जोरदार धडक दिली.प्रवासी गाडीने पिकअपगाडी ला जबरदस्त धडक दिली. धडक एवढी जोरात दिली की, डाव्या बाजूची पिकअप गाडी उजव्या बाजूला जाऊन शेतात उलटली, त्यामुळे १०० ते १५० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. धडक दिल्यानंतर रोडच्या उजव्या बाजुला शेतामध्ये गेली व कोंबड्यांचा पिंजरा गाडीवरुन पलटी होवुन खाली पडला .महीद्रा गाडी डाव्या बाजुला पलटी झाली .तसेच महींद्रा गाडीमध्ये असलेले ९ जण जखमी झाले. यात सुदैवाने मनुष्य जिवितहानी झाली नाही .यामध्ये २ बालके, ४ स्त्रीया,६ पुरुषाचा समावेश आहे. यामध्ये ४ ते ५ गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती होताच, देवलगाव ग्रामवासी अपघातस्थळी धावून आले. या दुर्घटनेत जिजे ०५,जेएम ७८६७ या गाडीचा अक्षरशः चुराडा झाला.चेंदामेंदा झालेल्या महिंद्रा गाडीतून जखमी स्त्री-पुरुषांना,मुलांना बाहेर काढले.अपघाताची माहिती नवेगावबांध पोलिसांना मिळताच तेही घटनास्थळी दाखल झाले. पिकअपच्या क्लीनर विकेश सुरेश हूड वय २८ वर्षे राहणार तालुका आरमोरी,जिल्हा गडचिरोली
सह सर्व जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे दाखल करून, त्यांच्यावर उपचार करण्यात आले . चार ते पाच जणांच्या हाता- पायाला गंभीर जखमा झाल्याची माहिती आहे.
अपघातातील जखमी नानू निषाद वय ३४ वर्षे, हंसराज निषाद वय २८ वर्षे, संतादेवी निषाद वय २१ वर्षे, सोमी निषाद वय ४० वर्षे, राजूलिया निषाद वय ५५ वर्षे ,हे गंभीर जखमी झाले आहेत.कनसु निषाद, रुक्कोनीबाई निषाद, छेदीलाल निषाद, ,नयन निषाद,पुनादेवी निषाद, सुनील निषाद, पुनम निषाद हे सर्व आझादनगर न्यू लखमापूर जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहेत.
हे किरकोळ जखमी झाले आहेत.
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना केटीएस सामान्य रुग्णालय गोंदिया येथे पुढील उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. मात्र पोलिसात तक्रार नको म्हणून व सर्व एकाच कुटुंबातील असल्यामुळे चंद्रपूर वरून गाड्या बोलावून सर्व जखमींनी आपल्या स्वगावी चंद्रपुर ला उपचार करणे पसंत करून, येथून काढता पाय घेतला. अपघातात जीव गेला मात्र १०० ते १५० कोंबड्यांचा. काही कोबड्या मरण पावल्या. मृत झालेल्या कोंबड्या व काही जिवंत कोंबड्या मिळेल देवलगाव येथील ग्रामवाशीयांनी या अपघाताची चंगळ करून घेतली . ज्याने त्याने हातात मिळाल्या त्या चार ते पाच कोंबड्या घेऊन कोंबड्यावर यथेच्छ ताव मारला. देवलगाव ग्रामवासीयांनी कोंबड्या नेवुन दावत उडवली. जीव गेला तो मात्र बिचाऱ्या कोंबड्यांचा. कोंबड्या वाहून नेणाऱ्या पिकअप गाडीच्या वाहकाने नवेगावबांध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पिकअप वाहकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कोट---
सदर बातमीदाराने पोलिस स्टेशन नवेगावबांध येथे वारंवार संपर्क करून देखील नवेगावबांध पोलिसांनी अपघात होऊन १२ तास उलटून देखील अपघाताची माहिती देण्याचे सौजन्य दाखवले नाही. यावरून अपघाताला कारणीभूत असणाऱ्यांना पोलीस पाठीशी तर घालत नाही ना? अशी शंका व्यक्त होत आहे. घटनास्थळावरून अपघातग्रस्त गाड्याही कधी नव्हे त्या मोठ्या तत्परतेने हलविण्यात आल्याचे समजते.
----
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

शनिवार, जून ११, २०२२

गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गावर अरुणनगर जवळ रेल्वेगाडीच्या धडकेत वाघाचा मृत्यू.

गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गावर अरुणनगर जवळ रेल्वेगाडीच्या धडकेत वाघाचा मृत्यू.




संजीव बडोले प्रतिनिधी

नवेगावबांध दि.११ जून:-
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोर तालुक्यातील रेल्वे स्टेशन वडेगाव ते अरुणनगर रेल्वेमार्गावर वनविभागाच्या कोरंबी बीटात कक्ष क्रमांक 260 राखीव वनामधील कोरंबी ते चारभट्टी डांबर रोड परिसरातील बल्हारशहा ते गोंदिया रेल्वे मार्गावरील रुळालगत वन्य प्राणी वाघ मृतावस्थेत आढळून आला. ही घटना दिनांक 11 जून ला सकाळी दहा वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे. ही घटना सर्वप्रथम अरुणनगर येथील रेल्वे विभागाचे कर्मचारी गोविंदप्रसाद यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठांना कळविली. घटनेची माहिती मिळताच अर्जुनी-मोर वनपरिक्षेत्र अधिकारी एस.डी. खोबरागडे, वडेगाव स्टेशन क्षेत्र सहाय्यक डब्ल्यू.एम.वेलतुरे तसेच उपवनसंरक्षक गोंदिया कुलराजसिंग, नवेगावबांधचे प्रकानिष्कासन अधिकारी डी.व्ही. राऊत, मानद वन्यजीव रक्षक गोंदिया मुकुंद धुर्वे, रेल्वे सुरक्षा बल उपनिरीक्षक विजय मालेकर या सर्व अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.सदर मृत  वाघ हा वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 चे अनुसूची क्रमांक एक भाग एक मधील असून,मोका पंचनामा करून  पुढील कार्यवाही राष्ट्रीय व्यघ्र प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार केली जाणार आहे. वाघाच्या नाकातुन रक्तस्त्राव येत होता. तसेच कंबर व मागील डाव्या पायाची मांडी मोडलेली व शरीरावर मागील बाजूस खरचटल्याच्या  खुणा दिसून आल्या असून मृत वाघाचे सर्व अवयव साबुत असल्याचे दिसून आले. अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. ही दुर्घटना काल रात्री च्या सुमारास घडली असावी,असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. या मार्गावरून रात्रभर रेल्वे माल गाड्यांची  वाहतूक सुरू असते.

बुधवार, जून ०८, २०२२

सभापती,उपसभापती कक्षात महापुरुषांच्या फोटोंचा विसर.अर्जुनी मोरगाव पंचायत समिती येथील प्रकार.

सभापती,उपसभापती कक्षात महापुरुषांच्या फोटोंचा विसर.अर्जुनी मोरगाव पंचायत समिती येथील प्रकार.






संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
नवेगावबांध दि.७ जून:-
भारतिय संविधानाचे निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो सह अन्य महापुरुषांचे फोटो शासकीय व निमशासकिय कार्यालयात लावणे अनिवार्य असताना अर्जुनी मोर. पंचायत समिती च्या सभापती, उपसभापती कक्षाला महापुरुषांच्या फोटो लावण्याचा विसर पडला असल्याचे दिसत आहे.अर्जुनी मोर. तालुका राजकिय व सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मधे आरक्षणाच्या माध्यमातून अनेक लोकप्रतिनिधी लहान मोठी पदे उपभोगतात.मात्र ज्या महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाने पदे उपभोगतात.त्यांचे फोटो आपल्या कार्यालयात लावण्याचे साधे सौजन्येही हे पदाधिकारी दाखवित नसल्याने अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.  अर्जुनी मोर. तालुक्याला राजकिय वसा लाभलेला आहे. अशा या महत्वपूर्ण तालुक्यात पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाची निवडणुक सहा मे रोजी पार पडली. सध्या पंचायत समितीची नवनिर्मिती इमारतीचे बांधकाम जवळपास पुर्ण झाले असल्याचे समजते.त्यामुळे प्रशासकीय कामकाज पंचायत समितीचे बचत भवनासह उमेद चे कार्यालयात व  इतरत्र इमारतीमधे सुरु आहे. तसेच सभापती व उपसभापती चे कार्यालय षटकोणी इमारतीमधे सजविण्यात आले आहे.सभापती व उपसभापती व अन्य सदस्यांची पदस्थापना सहा मे रोजी करण्यात आली आहे. सभापती कक्षात अन्य चार फोटो लावण्यात आले.मात्र तब्बल एक महिणा होवुनही भारतिय संविधानाचे निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बिरसा मुंडा, हरित क्रांतीचे जनक पंजाबराव देशमुख यांचे फोटो लावण्याचा  सभापती, उपसभापती व सदस्य, तथा पंचायत समिती प्रशासनाला विसर पडलेला असल्याचे दिसत आहे. याबाबत काही सुज्ञ नागरीक व पत्रकारांनी महापुरुषांच्या फोटो लावण्यासंदर्भात सभापती, उपसभापती यांना एक सप्ताहापुर्वीच सांगण्यात आले. त्यानी पंचायत समिती प्रशासनाच्या संबंधित यंत्रनेला सांगितले. मात्र अजुनपर्यंत महापुरुषांचे फोटो सभापती कक्षात लागले नाही. यावरुन पंचायत समिती प्रशासन पदाधिकारी यांचेवर हावी तर होनार नाही ना? असी शंका निर्माण होत आहे. किंवा पंचायत समिती शासन कुठे कमजोर तर पडनार नाही ना ? अशी शंका निर्माण होत आहे. या बाबत सभापती सविता कोडापे यांना विचारले असता गटविकास अधिकारी यांनी नविन इमारतीतच फोटो लावु असे म्हटल्याने सभापतींनी सांगीतली.जर वर्ष दोन वर्ष नविन इमारतीचे उद्घाटन झालेच नाही तो पर्यंत कार्यालयात फोटोच लागणार नाही कां? अशीही शंका निर्माण होत आहे. सभापती पदारुढ होवुन एक महिण्याचा कालावधी होवुन सुध्दा सभापती  निवासाची सुध्दा डागडुजी करुन सुशोभित करण्यात आले नाही हे विशेष.

सोमवार, मे ३०, २०२२

जांभळी येथे जागतिक मत्स्य चढण दिवस उत्साहात साजरा.

जांभळी येथे जागतिक मत्स्य चढण दिवस उत्साहात साजरा.



संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.३० मे:-
आज दिनांक ३० मे  रोज सोमवारला जागतिक मत्स्य स्थलांतरित दिवस साजरा करण्यात आला.मासे हा सर्वांच्या परिचयाचा विषय आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला पावसाचे पाणी जेव्हा नदी, नाल्याव्दारे तलाव धरणांमध्ये येतो तेव्हा तलावातील मासे आपल्या अन्नाच्या शोधात व आपली अंडी देण्यासाठी खूप मोठ्या संख्येने कळपाने एकत्र येऊन पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तलावाच्या वरच्या भागात जाऊन खड्यात किंवा पाण्याच्या प्रवाहात अंडी सोडतात,याला चढण म्हणतात. या चढणीचा मत्स्यव्यवसायाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे, परंतु ही नैसर्गिक क्रिया असल्याने पावसाचे अनियमितपणा व  नद्या नाले ,तलाव यामध्ये  मोठ मोठे उंच धरणे, सांडवे बांधून अशाप्रकारे माश्यांच्या मार्गात मानवाचे हस्तक्षेप वाढल्यामुळे सहजासहजी माशाचे स्थलांतर होतांनी दिसत नाही.त्यामुळे अनेक माशांच्या महत्वाच्या प्रजाती धोक्यात येवून काही प्रजाती नष्टही झाल्या.आपले तलाव, नद्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी माश्यांचे स्थलांतर होणे गरजेचे आहे. स्थलांतरित मासे, लोकं व मुक्त वाहणाऱ्या नद्यांच्यामहत्वाविषयी जागरूकता करण्यासाठी म्हणून जागतिक पातळीवर फिश मायग्रेशन डे या आंतरराष्ट्रीय दिनाचे आयोजन केले जाते. फीड फौंडेशन अर्जुनी व सृष्टी संस्था गडचिरोली , यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था नवेगावबांधच्या माध्यमातून आज जांभळी येथील जिल्हा परिषद  शाळेमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ८.३० वाजता करण्यात आले होते.आपल्या गोंदिया - भंडारा  या जिल्ह्यात सर्वात जास्त तलाव असल्याने मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था  व मासेमारी करणारा समाज जास्त प्रमाणात आहेत परंतु माशांची चढण किंवा माशांचे स्थलांतराच्या म्हत्वाबद्दल मत्स्य संस्था व समाजात उदासीनता आहे. फीड फौंडेशनच्या मध्येमातून मागील काही वर्षांपासून या दिनाच्या जाणीव जागृतीचे काम वेगवेळ्या मस्य संस्थानसोबत करत आहे.संस्था व समाज पातळीवरील या बद्दल जाणीव जागरूकता करण्यासाठी गावामध्ये शाळेतील मुलांची रॅली काढून चढणी संबधी नारे देऊन व माशांचे पोस्टर तयार करून समाजात जाणीवजागृतीचे कार्य करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमास्थळी विद्यार्थी , मासेमार समाजातील महिला, पुरुष यांना चढण व या दिवसाबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष    कुशनजी ठाकरे यांनी चढणीवरचे मासे पकडल्यास आपल्याला व संस्थेच्या उत्पादनाची कशी नुकसान होते आणि चढणीवरचे मासे नाही पकडले तर उत्पादन कसे वाढविता येईल याबद्द्ल माहित दिली. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पतीरामजी तुमसरे हे स्थानिक वनस्पती जाणकार यांनी माशांचे प्रकार व न कोणत्या प्रजातीचे मासे नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत व त्याचे काय कारणे आहेत याबद्दल माहित दिली. या कार्यक्रमाचे संचालन नंदलाल मेश्राम यांनी केले व हे दिवस साजरे करण्याची गरज का पडली या बद्द्ल माहित दिली. तसेच ग्रामपंचायत सदस्य, मत्स्य संस्थेचे सभासद , जलसंवर्धन महिला गट, संजीवनी महिला गटाच्या महिला उपस्थित होत्या, व संस्थेचे कार्यकर्ते दिलीप पंधरे, कविता मौजे, जैवविविधता मित्र जागेश्वर मेश्राम बोंडगाव , झाशीराम मेश्राम सावरटोला आदीउपस्थित होते.अशाप्रकारेजांभळी येथेविद्यार्थ्यांच्या मध्येमातून जागतिक जागरूकता वाढविणार कार्यक्रम घेण्यात आला.

बुधवार, मे २५, २०२२

सावरटोला येथे रोहयो कामावर  बीजप्रक्रिया मोहीम .

सावरटोला येथे रोहयो कामावर बीजप्रक्रिया मोहीम .


संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२५मे:-
 मंडळ कृषी कार्यालय नवेगावबांध अंतर्गत कोयंबतूर ५१ या धानाचे सावरटोला ग्रामपंचायत अंतर्गत आज दिनांक २५ मे रोज बुधवारला नरेगाच्या कामावर शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया व उगवणक्षमता तपासणी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यावेळी बहुसंख्य शेतकरी याठिकाणी उपस्थित होते.३ टक्के बीज प्रक्रिया म्हणजे,३०० ग्राम मीठ दहा लिटर पाण्यात घालून ढवळून घ्यावे, त्यामध्ये  आपल्याकडील बियाणे त्यामध्ये टाकायचे. मग वर आलेले फोलपट धानबियाणे बाहेर काढून ठेवायचे.चांगले बियाने वजनदार असल्याने बुडाला बसतात. ते बाहेर काढून २-३ स्वच्छ पाण्याने धुवून सावलीमध्ये वाळवायचे. त्यानंतर त्या धानाला थायरम लावून सावलीत ठेवावे व मग  आपल्याला गादीवाफ्यावर टाकून त्याची नर्सरी तयार करायची. तयार झालेली नर्सरी १० ते १२ दिवसांमध्ये लावणी करायची आहे.लावणी करत असताना सदर धानाचे अंतर हे २५ सेमी×२५ सेमी इतके  अंतर ठेवून एका ओळीत लागवड करायचे आहे. अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली आहे.को-५१ या धानाचे बीज प्रक्रिया व उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक  कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना करून दाखविले. खरीप हंगामापूर्वी ची तयारी बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी माती परीक्षणानुसार रासायनिक खताचा वापर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे कृषी विभागाच्या विविध योजना याविषयीची माहिती उपस्थित कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिली. यावेळी अर्जुनी मोरगाव चे तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार,मंडळ कृषी अधिकारी कुमुदिनी बोरकर, सावरटोला ग्रामपंचायतचे सरपंच युवराज तरोणे,कृषी पर्यवेक्षक विश्वनाथ कवासे, शेतकरी मित्र यादोराव तरोणे, ग्रामपंचायतचे सदस्य तथा गावातील महिला,पुरुष शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

मंगळवार, मे २४, २०२२

बोरटोला सावरटोला सोसायटीचे अध्यक्षपदी योगेश लाडे, तर उपाध्यक्ष कृष्णा येरणे.

बोरटोला सावरटोला सोसायटीचे अध्यक्षपदी योगेश लाडे, तर उपाध्यक्ष कृष्णा येरणे.


संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.२४ मे:-
 विविध कार्यकारी सहकारी संस्था बोरटोलाच्या  आज दि.२४ मे रोज मंगळवारला अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक संस्थेच्या कार्यालयामध्ये पार पडली.
निवडूण आलेल्या संचालकांमधून योगेश चंद्रकुमार लाडे यांची अध्यक्ष म्हणून तर कृष्णा पांडुरंग येरणे यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली.याप्रसंगी संचालक डॅनी महादेव डोये, नीता राजेश मेश्राम, वंदना दामोदर हेमने, लक्ष्मण जगन मेश्राम, भाऊराव अंताराम गायकवाड, महादेव शिवा डोये, गुलाब इस्तारी ढोक, विलास नामदेव बोळणे, काशीराम रामा भेंडारकर, वामन गोमा राऊत,राजकुमार डोये असे सर्व संचालक उपस्थित होते.निवडणुकीत भाजप समर्थित पॅनलचा मोठ्या फरकाने विजय होऊन,संस्थेत एकहाती सत्ता स्थापन केली आहे.हे येथे उल्लेखनीय आहे.

गुरुवार, मे १९, २०२२

समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन व्हावे.शासन परिपत्रक जारी.

समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन व्हावे.शासन परिपत्रक जारी.

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतने  ठराव करून ठेवला आदर्श.

राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचार पुढे न्या, शासनाचे जनतेला आवाहन.


संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि. १९ मे:-
भारत देश विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून वाटचाल करत असला तरी आजही पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढली जाणे, यासारख्या कुप्रथांचे पालन केले जात आहे. या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर आणि सरपंच सुरगोंडा पाटील आणि त्यांच्या ग्रामसभेने घेतला. प्रसारमाध्यमांनी या ठरावाचा सगळीकडे प्रसार केला आणि शासनाने विधवा प्रथा बंद व्हावी. यासाठी ग्रामपंचायतीनी पुढाकार घेऊन ग्रामसभेचा ठराव घेण्यात यावा, आपापल्या ग्रामपंचायत क्षेत्रात ही कुप्रथा नष्ट करावी.असे आवाहन करत दि. १७ मे रोजी महाराष्ट्र शासनाने शासन परिपत्रक जारी केले आहे.पतिनिधनानंतर त्याच्या पत्नीला विधवा म्हणून समाजात वावरत असताना तिला अवहेलनेला सामोरे जावे लागते. या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही.तिला अशुभ मानले जाते. सदर विधवा महिलांना इतर महिला प्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे.या कुप्रथेचे पालन समाजामध्ये होत असल्यामुळे, अशा व्यक्तीच्या प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी तसेच संविधानिक अधिकाराचे उल्लंघन होते.अपमानास्पद जीवन तिच्या वाट्याला येते.कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावाची शासनाने दखल घेतली असून, राज्यातील सर्व ग्रामपंचायतीनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे.असा शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावाची शासनाने दखल घेतली असून राज्यातील सर्व ग्रामपंचायतीनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे असा शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव करणाऱ्या हेरवाड ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.पाटील आणि ग्रामविकास अधिकारी श्रीमती कोळेकर यांनी याबाबत विशेष परिश्रम घेतले.कोल्हापूरात आलेला महापूर आणि त्यानंतरच्या कोरोना काळात घरातील कमावती कर्ती माणसे  मरण पावली. कर्ती माणसे गेल्यानंतर विधवांचा मानसन्मान  आणि समाजाचा बहिष्कार घालण्याचा प्रकार निदर्शनास आला. यावर उपाय म्हणून,अशा प्रथा बंद करण्याचे धाडस ग्रामसभेने केले. कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जिल्हा आहे. याच कालावधीत राजर्षी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी वर्ष साजरा करण्यात येत होता. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी विधवांसाठी केलेल्या कार्याची जाण म्हणून हा क्रांतिकारी निर्णयाचा ठराव केल्याचे सरपंच श्री.पाटील यांनी सांगितले. या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी महिला संघटनाही प्रयत्न करत होत्या. पण एखादी प्रथा बंद करण्यासाठी कायद्याचा धाक आवश्यक होता. शासनाने आता हेरवाड ग्रामपंचायत पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविण्याचे आवाहन केले आहे.विधवा महिलांना सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. विधवा प्रथांचे पालन होत असल्याने प्रतिष्ठेचे जीवन जगण्याच्या मानवी तसेच संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होते. त्यामुळे भविष्यात स्त्रियांच्या अधिकाराचे हनन होऊ नये, यासाठी ग्रामविकास विभाग पुढे सरसावला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी हेरवाडचे अनुकरण करून आदर्श ठेवण्याचे आवाहन केले आहे. या कुप्रथा बंद करण्यात महाराष्ट्र कायम आघाडीवर राहिला आहे.या प्रथेचे पालन करणे अनुचित असून, त्याबाबत समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्यात यावी याबाबत जनजागृती होण्याच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्याबाबत शासनाने राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी आपल्या स्तरावरून सर्व अधिनस्त ग्रामपंचायत पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांना सूचित करावे तसेच ग्रामपंचायत हेरवाड जिल्हा कोल्हापूर यांनी केलेल्या ग्रामसभा ठरावाप्रमाणेच राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना असाच ठराव घेण्यासाठी  प्रोत्साहित करावे. असे आवाहन या आदेशातून केले आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने, सर्व मिळून कृतिशील कार्यवाही करावी. असे शेवटी आदेशात म्हटले आहे.

मंगळवार, मे १७, २०२२

नवेगावबांध सेवा सहकारी संस्थेवर भाजप सेना प्रणित किसान संस्था विकास पॅनलचा दणदणीत विजय.

नवेगावबांध सेवा सहकारी संस्थेवर भाजप सेना प्रणित किसान संस्था विकास पॅनलचा दणदणीत विजय.




संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.१७ मे:-
विविध कार्यकारी सहकारी संस्था नवेगावबांध र. नं. 551 च्या सन 2022 ते 27 कार्य काळासाठी दिनांक 15 मे ला घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना प्रणित किसान संस्था विकास पॅनल चा दणदणीत विजय झाला. ह्या विरोधात असलेल्या कॉंग्रेस-राॅ. का.प्रणित परिवर्तन पॅनल ला फक्त दोन संचालक निवडून आणण्यात यश आले .
सर्वसाधारण कर्जदार गटामधून जितेंद्र कापगते, अण्णा डोंगरवार, गुलाब डोंगरवार, अशोक हांडेकर ,महादेव बोरकर ,दिलीप पोवळे,खुशाल काशिवार, किसन डोंगरवार विजयी ठरले . महिला राखीव गटामधून विजयाबाई दयाराम कापगते व उर्मिला वेल्हाळ डोंगरवार विजयी झाल्या . भटक्या विमुक्त जाती/ जमाती /विशेष मागास प्रवर्ग गटातून रामेश्वर कोहळे विजयी झाले .अनुसूचित जाती/ जमाती गटामधून खुषालदास मडावी विजयी झाले. तर इतर मागास गटातून शैलेश जायस्वाल हे बिनविरोध निवडूणआले . सदर संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती.या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी आपली संपूर्ण ताकत पणाला लावली होती, मात्र त्यांना आपला एकही प्रतिनिधी निवडून आणता आला नाही.तर दोन संचालक निवडून आल्याने कॉंग्रेसला पक्षाला आपली प्रतिष्ठा राखता आली. सदर निवडणुकीच्या दिवशी माजी आमदार स्व. दयाराम भाऊ कापगते यांची पुण्यतिथी असल्याने भाजप सेना प्रणीत पॅनलने आपला हा विजय श्रद्धांजली म्हणून त्यांना अर्पित केला. निवडणूक निर्णय अधिकारी संदीप बोरले यांच्या टीमने चोख पोलीस बंदोबस्तात सदर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली.