संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
नवेगावबांध दि.७ जून:-
भारतिय संविधानाचे निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो सह अन्य महापुरुषांचे फोटो शासकीय व निमशासकिय कार्यालयात लावणे अनिवार्य असताना अर्जुनी मोर. पंचायत समिती च्या सभापती, उपसभापती कक्षाला महापुरुषांच्या फोटो लावण्याचा विसर पडला असल्याचे दिसत आहे.अर्जुनी मोर. तालुका राजकिय व सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मधे आरक्षणाच्या माध्यमातून अनेक लोकप्रतिनिधी लहान मोठी पदे उपभोगतात.मात्र ज्या महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाने पदे उपभोगतात.त्यांचे फोटो आपल्या कार्यालयात लावण्याचे साधे सौजन्येही हे पदाधिकारी दाखवित नसल्याने अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अर्जुनी मोर. तालुक्याला राजकिय वसा लाभलेला आहे. अशा या महत्वपूर्ण तालुक्यात पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाची निवडणुक सहा मे रोजी पार पडली. सध्या पंचायत समितीची नवनिर्मिती इमारतीचे बांधकाम जवळपास पुर्ण झाले असल्याचे समजते.त्यामुळे प्रशासकीय कामकाज पंचायत समितीचे बचत भवनासह उमेद चे कार्यालयात व इतरत्र इमारतीमधे सुरु आहे. तसेच सभापती व उपसभापती चे कार्यालय षटकोणी इमारतीमधे सजविण्यात आले आहे.सभापती व उपसभापती व अन्य सदस्यांची पदस्थापना सहा मे रोजी करण्यात आली आहे. सभापती कक्षात अन्य चार फोटो लावण्यात आले.मात्र तब्बल एक महिणा होवुनही भारतिय संविधानाचे निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बिरसा मुंडा, हरित क्रांतीचे जनक पंजाबराव देशमुख यांचे फोटो लावण्याचा सभापती, उपसभापती व सदस्य, तथा पंचायत समिती प्रशासनाला विसर पडलेला असल्याचे दिसत आहे. याबाबत काही सुज्ञ नागरीक व पत्रकारांनी महापुरुषांच्या फोटो लावण्यासंदर्भात सभापती, उपसभापती यांना एक सप्ताहापुर्वीच सांगण्यात आले. त्यानी पंचायत समिती प्रशासनाच्या संबंधित यंत्रनेला सांगितले. मात्र अजुनपर्यंत महापुरुषांचे फोटो सभापती कक्षात लागले नाही. यावरुन पंचायत समिती प्रशासन पदाधिकारी यांचेवर हावी तर होनार नाही ना? असी शंका निर्माण होत आहे. किंवा पंचायत समिती शासन कुठे कमजोर तर पडनार नाही ना ? अशी शंका निर्माण होत आहे. या बाबत सभापती सविता कोडापे यांना विचारले असता गटविकास अधिकारी यांनी नविन इमारतीतच फोटो लावु असे म्हटल्याने सभापतींनी सांगीतली.जर वर्ष दोन वर्ष नविन इमारतीचे उद्घाटन झालेच नाही तो पर्यंत कार्यालयात फोटोच लागणार नाही कां? अशीही शंका निर्माण होत आहे. सभापती पदारुढ होवुन एक महिण्याचा कालावधी होवुन सुध्दा सभापती निवासाची सुध्दा डागडुजी करुन सुशोभित करण्यात आले नाही हे विशेष.