नवेगावबांध परिसरात दुपारपासून मुसळधार पावसाने झोडपले
संजीव बडोले/ जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
नवेगावबांध दि.१३ जुलै:-
गोंदिया जिल्ह्यात काल दुपारपासून परिसरात पावसाने झोडपले. मुसळधार पावसामुळे परिसरातील नाल्यांना पूर आलेला आहे. काल मध्यरात्रीपासून मोरगाव अर्जुनी तालुक्यातील सावरटोला-पिंपळगाव मार्गावरील नाल्यावर पूर आला असून,नाला दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे सावरटोला, बोरटोला पिंपळगाव मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक बंद झाली आहे.परिसरातील नाल्याला लागूनअसलेल्या सावरटोला, बोरटोला, चापटी,सुरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे. शेतातील बांध पाण्याने तुडुंब भरली आहेत. धान पिकांची रोवणी खोळंबली आहेत. धानपिकांचे पऱ्हे पाण्याखाली आल्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील मोटार पंपाचे पाईपही पुरात वाहून गेले आहेत. तसेच विहिरीला लावलेल्या मोटारी सुद्धा वाहून गेल्यात, तर काही पाण्यामुळे खराब झाल्या आहेत. पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी सावरटोला, बोरटोला,चापटी,सुरगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
#rain #nature #rainyday #photography #love #naturephotography #clouds #photooftheday #weather #sky #instagood #instagram #water #travel #storm #photo #art #raindrops #rainbow #beautiful #rainy #india #raining #picoftheday #landscape #summer #sunset #ig #flowers #monsoon