Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च २९, २०२३

Tiger Attack Chandrapur | आईच्या डोळ्यादेखत बालकाला वाघाने नेले उचलून ! |





चंद्रपूर 
जिल्ह्यातील सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या बोरमाळा येथे पाच वर्ष वयोगटातील बालकाला वाघाने उचलून नेल्याची घटना घडली आहे. अंगणात शौचास बसलेल्या पाच वर्षांच्या बालकावर वाघाने अचानक हल्ला चढविला. त्यानंतर त्या बालकाला वाघाने तोंडात घेऊन तिथून पळ काढला. ही घटना गेवरा बिटातील बोरमाळा येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. (Chandrapur Maharashtra forest tiger attack child wildlife police )


हर्षद संजय कारमेंगे (५, रा. बोरमाळा) असे बालकाचे नाव आहे. सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी उपक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गेवरा बिटातील बोरमाळा येथील ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली.  (tiger tadoba) बालकाची आई अतिक्षा ही आपल्या हर्षदला शौचास लागल्याने त्याला अंगणात बसवून उभी असतानाच वाघाने अंधाराच्या दिशेने येत हर्षदवर हल्ला केला व आईच्या डोळ्यांदेखत त्याला उचलून नेले. आईने आरडाओरड करून शेजारच्या लोकांना बोलाविले. तातडीने नागरिक धावून आले. तोपर्यंत बालकाला वाघ तोंडात घेऊन निघून गेला होता. नागरिकांनी परिसरातील झुडपात शोधाशोध केली. परंतु मुलाचा शोध लागला नाही. तातडीने वनविभागाला व पाथरी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. शोधमोहीम सुरू करण्यात आली. रात्री अंधार असल्याने शोधमोहिमेत अडथळा येत आहे. दरम्यान, घटनास्थळी सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण विरूरकर, पाथरीचे क्षेत्र सहायक एन. बी. पाटील, सावलीचे क्षेत्र सहायक राजू कोडापे, पाथरीचे ठाणेदार मंगेश मोहोड यांनी घटनास्थळी भेट दिली.

A tiger suddenly attacked a five-year-old boy who was defecating in the yard. After that, the tiger took the child in its mouth and ran away from there. The incident took place at Bormala in Gevra Bita on Wednesday evening.


The child's name is Harshad Sanjay Karamenge (5, Res. Bormala). As soon as this incident came to light at Bormala in Gevra bit, which falls under Pathri sub-zone of Savali forest area, there was a stir. The child's mother, Atiksha, was standing in the courtyard sitting her Harshad after defecating, when the tiger came towards the darkness and attacked Harshad and carried him away in front of the mother's eyes. by mother


He shouted and called the neighbors. Urgently Citizens came running. By that time, the tiger had taken the child in its mouth and left. Citizens searched the bushes in the area. But the child was not found. The forest department and Pathari police were immediately informed about the incident. A search operation was launched. Due to darkness at night, the search operation is hampered. Due to this incident, an atmosphere of fear has spread among the citizens. Meanwhile, at the scene of the incident, forest area officer Praveen Virurkar of Sawli, area assistant of Pathari N. B. Patil, Shadow Sector Assistant Raju Kodape, Pathari Thanedar Mangesh Mohod visited the spot.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.