Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च ३०, २०२३

चंद्रपुरातील या केंद्रासाठी 6.93 कोटी | Bamboo Research & Training Centre Chichpalli, Dist Chandrapur

चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राकरीता 6.93 कोटी


चंद्रपूर, दि. 30 : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली (Bamboo Research & Training Centre Chichpalli, Dist Chandrapur) या शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी दुसऱ्या टप्प्यातील 6.93 कोटी निधीचे वितरण 29 मार्च 2023 चे शासन निर्णयानुसार करण्यात आले आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी रु. 13.86 कोटी रूपयांचा पुरवणी मागणी प्रस्ताव ऑगस्ट 2022 च्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आला होता. मंजूर झालेल्या प्रस्तावानुसार हा निधी दोन टप्प्यात प्रकल्पाकरिता शासनाकडून वितरीत करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात रु.6.93 कोटी निधीचे वितरण यापूर्वीच ऑक्टोबर 2022 मध्ये करण्यात आले आहे. या निधीच्या माध्यमातून प्रकल्पातील वसतिगृह, शैक्षणिक इमारत, उपहारगृह, पाणी टाकी व फर्निचर इत्यादी कामे वेळेत पूर्ण होऊन प्रकल्प पूर्णत्वास येण्यास मदत होणार आहे. सदर प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात नवीन बांबू धोरणाची व्यापक अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीकोणातून तसेच बांबू क्षेत्रास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मस्यव्यवसाय मंत्री सुधीर मूनगंटीवार  (Sudhir Mungantiwar) यांचा हा एक महत्वाचा प्रकल्प असून चिचपल्ली येथे 8 हेक्टर क्षेत्रामध्ये तो साकारण्यात येत आहे.


या निधी वितरणामुळे प्रकल्पाचे काम शीघ्रगतीने पूर्ण होऊन येत्या काही दिवसातच हा प्रकल्प बांबू क्षेत्रासाठी तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध कारागिरांना आणि युवक व युवतींना आधुनिक व तांत्रिक प्रशिक्षणाचे माध्यमातून रोजगाराचे दालन उपलब्ध करून देईल, असे बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक अविनाश कुमार यांनी सांगितले.

Read News | वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या 'ड्रीम प्रोजेक्ट'ला सोन्याची झळाळी

 

बांबू रिसर्च आणि ट्रेनिंग सेंटर, चिचपल्ली

चीचपल्ली बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची इमारत केवळ बांबूपासून तयार करण्यात आलेली आशिया खंडातील सर्वात मोठी इमारत म्हणून लौकिक प्राप्त आहे. कुठल्याही पद्धतीचे काँक्रीट उपयोगात न आणता निव्वळ माती आणि बांबूपासून ही भव्य इमारत तयार करण्यात आली आहे. सिंगापूरच्या एका प्रसिद्ध मासिकाने याची दखल घेतली आहे.


Read News | चिचपल्ली येथील बांबू केंद्राला भीषण आग

 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.