Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट २०, २०२३

काँग्रेसची नवीन वर्किंग कमिटी जाहीर; राज्यातील या नेत्यांचा समावेश | Congress Working Committee

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या नावांची अखेर घोषणा, काँग्रेस पक्षासाठी निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च समितीची रचना जाहीर

महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मुकुल वासनिक काँग्रेस वर्किंग कमिटीवर


Congress president Mallikarjun Kharge constitutes the Congress Working Committee.

Congress President Kharge forms 23-member Steering Committee replacing CWC
Mallikarjun Kharge set up a 23member Steering Committee that includes former PM Manmohan Singh and the party's ex-Presidents Sonia Gandhi and Rahul Gandhi.

मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेसची नवीन वर्किंग कमिटी जाहीर

Congress CWC: या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नवी टीम तयार केली आहे. काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात एकूण 39 जणांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे प्रमख असून, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह 39 नेत्यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. 

मल्लिकार्जुन खर्गे यांनी २० ऑगस्ट रोजी प्रेस नोट रिलीझ केली असून यात काँग्रेसच्या वर्किंग मिटीतील नेत्यांची नावे देण्यात आली आहेत. यात काँग्रेस नेते सचिन पायलट, शशी थरुर, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, पी चिदंबरण, अशोक चव्हाण, दिग्विजय सिंग, आनंद शर्मा, अल्का लांबा, यशोमती ठाकूर, पवन खेरा, प्रणिती शिंदे, पवन खेरा, गणेश गडियाल, रणदिप सिंग सुरजेवाला, तारिक अनवर, के सी वेणूगोपाल, गौरव गौगाई यांच्यासह ३९ नावांचा समावेश करण्यात आला आहे.

काँग्रेस वर्किंग कमिटी मध्ये महाराष्ट्रातून खालील मान्यवरांची निवड 👇
१.मुकुल वासनिक
२.अशोक चव्हाण
३.अविनाश पांडे ( महासचिव)
४. रजनीताई पाटील (प्रभारी)
५. माणिकराव ठाकरे (प्रभारी)
६.चंद्रकांत हंडोरे (कायम निमंत्रितांमधे)
७. प्रणिती शिंदे (विशेष आमंत्रित)
८. यशोमती ठाकूर (विशेष आमंत्रित)





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.