बे एके बे, बे दुणे चार
बे त्रिक सहा, बे चोक आठ
बे पंचे दहा, बे सख बारा,
बे साती चौदा, बे आठी सोळा,
बे नवे अठरा, बे दाही वीस
मराठीत दोन या अंकासाठी बे आणि बा या अक्षराचा उपयोग फार पूर्वीपासून होत आहे. मराठी बोलीभाषेत तर नक्कीच याचा वापर आढळून येतो. उदाहरण द्यायचं झालं तर बाशिंग हा शब्द घेऊया, यात बा हे अक्षर दोन हा अंक दर्शवतो. मराठी अंकात हा ब, बे आणि बा ही अक्षरं दोन अंक असलेल्या अंकात सर्वत्र दिसून येतात आणि ती शब्दाच्या सुरवातीला येतात. जसं बारा, बावीस, बत्तीस, बेचाळीस, बावन्न, इत्यादी.
आता दोन अंकासाठी बे अक्षर वापरात असल्याने असेल कदाचित दोनचा पाढा बे म्हणायची पद्धत असेल. त्यात गेयता आहे, म्हणायला सोपं आहे.
२ बेचा (दोनाचा) पाढा
२ x १ = २
बे एके बे
२ x २ = ४
बे दुणे चार
२ x ३ = ६
बे त्रिक सहा
२ x ४ = ८
बे चोक आठ
२ x ५ = १०
बे पंचे दहा
२ x ६ = १२
बे सक बारा
२ x ७ = १४
बे सत्ते चौदा
२ x ८= १६
बे अठ्ठे सोळा
२ x ९ = १८
बे नव्वे अठरा
२ x १० = २०
बे दाहे वीस
बे/ब हा उपसर्ग जोडून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द
- बदनाम
- बेशिस्त
- बेवारस
- बेमालूम
- बेपर्वा
- बेदम
- बेजबाबदार
- बेइमान
- बेरोजगार
- बेवफा
- बेहिशेबी
Be Eke Be Be Dune Char is a Marathi language
Be Eke Be Be Dune Char - Song Download from Balrang