गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड आचार्य चाणक्य शिक्षा अवार्ड
गुरु या शब्दाचा अर्थ आहे अंधार दूर करणारा. प्रत्येक शिक्षकाचे स्वप्न असते की, त्यांचा प्रत्येक विद्यार्थी यशस्वी व्हावा. सर्वात प्रथम आपण मुलांचे अक्षर सुंदर, सुरेख करण्याचा प्रयत्न करतो, अशीच रचना मॅडम यांची रचना आहे फन टू लर्न संस्था.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असलेल्या व प्रसिद्ध संस्थेद्वारे संचालित आचार्य चाणक्य शिक्षक पुरस्कार सोहळा नुकताच ऑनलाईन संपन्न झाला. सदर सोहळा सकाळी ७.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत ऑनलाईन चालू होता. यावेळी शिक्षण क्षेत्रात आंतरिक तळमळीने कार्यरत असलेल्या ६५० शिक्षकांना गौरवण्यात आले. तसेच या सर्व सन्मानित शिक्षकांची नोंद वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड बुकमध्ये करण्यात आली.
डॉ. आनंदी सिंह जी लिटील स्टार इंग्लिश हायस्कूल, मुंबई येथे गेली २८ वर्षे ज्ञानदानाचे कार्य अविरत करीत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, फन टू लर्न संस्थेने माझ्यासह अनेक शिक्षकांचा सन्मान करून एक इतिहास रचला आहे. त्याबद्दल मन:पूर्वक प्रणाम.
मुलांचा विकास होण्यासाठी त्यांच्या आवडीनुसार, भितीमुक्त पद्धतीने आनंद निर्मिती करणारे प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. डॉ. आनंदी सिंह जी यांना आजपर्यंत आदर्श शिक्षक पुरस्कार, उत्तराखंड शिक्षक पुरस्कार तथा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यावर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२०साठी त्यांचे नामांकन झाले होते. डॉ. आनंदी सिंह जी यांचा शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक कार्यातही सहभाग राहिला आहे. सध्या कोविड प्रभावामुळे आवश्यक वस्तूंचे भाव वाढले होते. मास्कचे दरही वाढले होते, तेव्हा डॉ. आनंदी सिंह जी यांनी घरीच मास्क तयार करून गरजूंना मोफत वाटले. विभागातील ७०पेक्षा अधिक महिलांना एकत्र करून हजारो मास्क बनवून अनाथालय, रुग्णालये, बस कर्मचारी व गरीब गरजूंना वाटण्यात आले.