Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च १९, २०२३

जुनी पेन्शन योजनेची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपला हा लढा असाच सुरू ठेवा | juni pension yojana latest news

आमदार सुधाकर अडबाले यांच्या भेटीने संपकऱ्यांत नवचैतन्य 

चंद्रपूर, वरोरा, चिमूर येथे भेटी

जुनी पेन्शन योजनेची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपला हा लढा असाच सुरू ठेवा | juni pension yojana latest news

चंद्रपूर : जुनी पेन्शन योजना व इतर मागण्यांना घेऊन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती समन्वय समितीच्या वतीने १४ मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आरोग्य सेवक व इतर सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. आज चंद्रपूर, वरोरा व चिमूर येथील संप मंडपास आमदार सुधाकर अडबाले (SUDHAKAR ADBALE) यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले. आमदार सुधाकर अडबाले यांच्या भेटीने संपकऱ्यांत नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले. (juni pension yojana latest news)


अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेंन्शन  Old pension scheme योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा ठप्प पडली आहे. यावर तोडगा काढण्याऐवजी राज्य शासनाकडून पेन्शन संशोधन कमिटी नेमली आहे. यापूर्वी २०१९ मध्ये अशीच कमिटी नियुक्त झाली होती. परंतु, त्या कमिटीचा अहवाल अजुनही जाहीर झालेला नाही. देशात राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश राज्यात जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे. ते राज्य दिवाळखोरीत निघाले नाही आणि आपले राज्यकर्ते म्हणतात की, जुनी पेन्शन योजना लागू केली तर राज्य दिवाळखोरीत निघेल. पश्चिम बंगाल राज्याने तर जुनी पेन्शन योजना बंदच केली नाही. असे असताना राज्य सरकार टाळाटाळ करत आहे. समृध्दी महामार्गाची कोणी मागणी नसतांना ४५ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊन या महामार्गाची निर्मिती केली. आता राज्य दिवाळखोरीत नाही निघाले का? असा सवाल करीत आमदार सुधाकर अडबाले त्यांनी सरकारवर निशाणा साधला. जोपर्यंत जुनी पेन्शन योजनेची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपला हा लढा असाच सुरू ठेवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 


यावेळी चंद्रपूर येथे श्रीहरी शेंडे, दिगंबर कुरेकर, सुरेंद्र अडबाले, भालचंद्र धांडे, प्रमोद उरकुडे, सचिन मोहितकर, देवानंद चटप, निलेश कुमरे, प्रशांत खुसपुरे, प्रवीण मोरे, वरोरा येथे नितीन जीवतोडे, माधव चाफले, संदीप चौधरी, निखिल ठमके, बंडूजी डाखरे, नंदकिशोर खिरटकर, अविनाश पिंपळकर, अनुप माथनकर तर चिमूर येथे माधव पिसे, नंदकिशोर वरधलवार, जनार्दन केदार, मारोत राव अतकरे, दीपक धोपटे, वैभव चौधरी, सरोज चौधरी, राकेश झिरे, सूनील केलझरकर, गोविंद गोहने, सुरेश डांगे, परमानंद बोरकर, वैशाली दातीर, कांबळे, श्री. बल्की, श्री. बांगडे, सलीम तूर्के, विनोद गेडाम, अशोक वैद्य, शालिक ढोरे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी संपात सहभागी झाले होते.  Old pension scheme



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.