चंद्रपूर (प्रतिनिधी)-
झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय समिती साकोली यांचे द्वारे प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या उपस्थितीत झाडीबोली साहित्य मंडळ शाखा चंद्रपूर ची नवी कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे.
अध्यक्ष- कवी अनिल आंबटकर,
कार्याध्यक्ष - डॉ. धर्मा गांवडे,
सचिव - प्रा. नामदेव मोरे,
उपाध्यक्ष -कवी सुनील इखारे,
सहसचिव- श्रीमती रोहिणी मंगरूळकर ,
कोषाध्यक्ष सौ. मंजुषा खानेकर ,
संघटक सौ. सरिता बेले
.तर कार्यकारणी सदस्य म्हणून
प्रा. डॉ. धनराज खानोरकर, प्रा. डॉ. राज मुसने,प्रा. डॉ. श्रावण बाणासुरे,यवनाश्व गेडकर,एन.एन.गेडकर,कु. रिया पिपरीकर.प्रसिद्धी प्रमुख म्हणून
प्रकाश देवगडे,
प्रभाकर आवारी .
सदर नवीन कार्यकारिणी पुढील(मार्च २०२३ ते एप्रिल २०२५ ) दोन वर्षांकरिता असणार आहे.आजच्या सभेत सर्वानुमते कार्यकारीणीची निवड करण्यात आली. त्यांची यादी नव्याने केंद्रीय समितीकडे पाठविण्यात येणार आहे.जेणेकरून संघटनात्मक बांधणी, शाखा कार्य विस्तार ,झाडीबोलीचा प्रचार आणि प्रसार करणे सोयीचे होईल. सदर सभा मातोश्री विद्यालय (ताडोबा रोड) चंद्रपूर येथे संपन्न झाली.
आजच्या सभेत मंडळाचे दिवंगत सदस्य कवी मधुकर
गराटे चंद्रपूर व ज्ञानेश्वर वाघमारे (मुल) यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दरमहा दुसऱ्या रविवारी साहित्य विषयक उपक्रम राबविण्यासाठी नियोजन करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. प्रा. श्रावण बानासुरे यांनी केले.
सदस्यांचा परिचय प्रा. डॉ. राज मुसने यांनी करून दिला तर मागील ३ वर्षांचा कार्य अहवाल मावळते अध्यक्ष प्रा. डॉ. धनराज खानोरकर यांनी सादर केला.आभार प्रदर्शन कु. रिया पिपरीकर यांनी केले.