जुन्नर शहराला स्वच्छ सर्वेक्षण-2021 चा पुरस्कार आणि सलग तीसऱ्यांदा देश पातळीवरील कचरामुक्त शहर ३ स्टार मानांकन प्राप्त - नगराध्यक्ष शाम पांडे
जुन्नर /आनंद कांबळे
शहरातील मैला प्रक्रियेसाठी नगरपरिषदेमार्फत एफएसटीपी प्रकल्प आगर येथे येथे बांधण्यात आला आहे. एकूण १३ शौचालयांपैकी ४ शौचालये ताराकिंत शौचालये म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
जुन्नर शहरात प्लॅस्टीक कचरा व्यवस्थापन करताना नागरिकांना अल्पदरात पुर्नवापर योग्य कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व कचऱ्यावर 100 टक्के शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध मोहिमा राबविण्यात आल्या.
कचरा डेपोमध्ये येणाऱ्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे पुनर्वापर करण्यात येते.
ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत करण्यासाठी १२ TPD क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. जुन्नर शहरात १०० % कचरा वर्गीकरण व १०० % कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते व जुन्नर नगर परिषदेला महाराष्ट्र शासनाचा हरित ब्रांड प्रमाणपत्र प्राप्त आहे. आतापर्यंत 3.५ लक्ष किलो खताची विक्री झाली आहे.
हागणदारी मुक्त गाव योजनेअंतर्गत १६० लाभार्थींना वैयक्तिक शौचालय बांधून देण्यात आली आहेत. शहराला ओडीएफ डबल प्लस दर्जा प्राप्त झाला. जुन्नर नगरपरिषदेकडून शहरामध्ये वृक्षांची लागवड व जोपासना करत हरित पट्ट्यांची निर्मिती करण्यात येत आहे . प्रदूषण कमी करण्याच्या हेतूने सणांच्या दिवसांमध्ये पर्यावरणपूरक मुर्ती निर्माल्य संकलन कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत व त्याबाबत नगर परिषदेकडून वेळोवेळी जनजागृती करण्यात येते.
सुक्या कचऱ्याचे EPRद्वारे व्यवस्थापन करण्यात येत आहे व जैव वैद्यकीय कचऱ्याचे बाहेरील एजन्सी मार्फत व्यवस्थापन करण्यात येत आहे. जुन्नर शहरातील ई कचरा बाबत स्वच्छ संस्थेशी करारनामा करण्यात येत आहे.
जुन्नर शहरातील कचरा डेपो येथे असणाऱ्या १९००० क्युबिक मीटर ५० वर्षांहून जुन्या कचऱ्यावर बायो मायनिंग प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून सुमारे १ हेक्टर जागा पुन्हा प्राप्त करण्यात आली आहे. सदरच्या जागेत जुन्नर नगरपरिषदेची रोप वाटिका बनविण्याचे काम प्रगती पथावर आहे
पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्या करिता शहरामध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले होते. जुन्नर नगरपरिषद सभागृहात सर्व कुंभार बांधवांची कार्यशाळा घेवून शाडू मातीच्या मूर्तींचे महत्व सांगण्यात आले व गणेश मूर्ती बनवियाचे प्रशिक्षण फेसबुक च्या माध्यमातून कार्यशाळा घेण्यात आली " तसेच पर्यावरण पूरक गणराया स्पर्धा" आयोजित करण्यात आली होती. त्याच बरोबर ५ नदी घाटावर कृत्रिम विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती.
अभियानाच्या व स्वच्छ सर्वेक्षण अभियान प्रचार प्रसिद्धीसाठी शहरामध्ये पथनाट्य, चित्रकला स्पर्धा, चारोळी स्पर्धा घेण्यात आल्या व चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
सिंगल युज प्लास्टिक वापरावरील बंदी तसेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन करण्याकरिता पथविक्रेता दिनाचे औचित्य साधून शहरातील व्यापारी यांची जनजागृती कार्यक्रम तसेच शहरामध्ये पथनाट्ये व इतर कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर २५ हजार पेक्षा जास्त दंडाची वसुली आठवडा बाजारातून करण्यात आली आहे.
स्वछ भारत अभियानाच्या व स्वच्छ सर्वेक्षण अभियान प्रचार प्रसिद्धीसाठी शहरामध्ये पथनाट्य, चित्रकला स्पर्धा, चारोळी स्पर्धा घेण्यात आल्या व चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. शहरामध्ये ठिकठिकाणी भिंती रंगवून बोलक्या भिंती तयार करण्यात आल्या आहेत.
शहरातील शाळा, महाविद्यालये, रहिवासी व व्यापारी अशा सर्व ठिकाणी जनजागृती करण्यात येत असून नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्यात येत आहे.
जुन्नर नगरपरिषदेने ६ घंटागाड्यांची खरेदी करून शहरात घरोघरी कचरा संकलन करून नागरिकांची सोय केलेली आहे. त्याबरोबर नव्याने अग्निशामक गाडीचीही खरेदी करण्यात आलेली असून नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर ठेवण्यात आलेली आहे.
सिंगल युज प्लास्टिक वापरावरील बंदी तसेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन करण्याकरिता पथविक्रेता दिनाचे औचित्य साधून शहरातील व्यापारी यांची जनजागृती कार्यक्रम तसेच शहरामध्ये पथनाट्ये व इतर कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली व त्याचबरोबर २५ हजार पेक्षा जास्त दंडाची वसुली आठवडा बाजारातून करण्यात आली आहे असे आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत खत्री यांनी सांगितले .
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत जुन्नर शहरात मोठ्या प्रमाणावर झालेल्या कामांमुळेच पुरस्कार मिळाल्याचे मुख्याधिकारी श्री. मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले व स्वच्छतेबाबत नागरिकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे जुन्नर नगरपरिषदेने राष्ट्रीय स्तरावर हे यश संपादन केले असल्याने नगराध्यक्ष श्री. शाम सुधाकर पांडे यांनी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले.