जुन्नरमध्ये गॅस शवदाहीनीच्या कामास सुरुवात ,नगराध्यक्ष शाम पांडे यांची माहिती
जुन्नर /वार्ताहर
जुन्नर नगरपालिकेच्या वतीने सुमारे ९० लाख रुपये खर्चाच्या गॅस शवदाहीनीच्या कामास भास्कर घाट स्मशानभूमी येथे सुरुवात करण्यात आल्याची माहीती नगराध्यक्ष शाम पांडे यांनी दीली.
जिल्हानियोजन मंडळाकडुन शवदाहीनीच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात जुन्नर नगरपालिका ही गॅस शवदाहीनी बसविणारी पहिलीच नगरपालिका असल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सांगीतले.
पर्यावरणपुरक व कमी वेळात अंत्यसंस्कार हा गॅस शवदाहीनीचा फायदा आहे. जुन्नर शहरामध्ये सध्याची कोव्हीड ची परिस्थिती पाहता व भविष्याचा विचार करता सदरहू गॅस शवदाहीनी ही उपयुक्त ठरणार आहे.गॅस शवदाहीनी करीता
४८ सिलेंडर लागनार आहेत. एका सिलेंडर मध्ये २ मृतदेहांवर सुमारे ६५० अंश सेल्सिअस तापमानात साधारणतः १५ मिनिटांमध्ये अंत्यसंस्कार पूर्ण होतील .सर्व सोयींयुक्त गॅस शवदाहीनी ही शहरवासीयांसाठी भविष्याचा वेध घेता गरजेची आहे.मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप व शहर अभियंता विवेक देशमुख व सर्व पदाधीकारी यांनी शवदाहीनीच्या कामासाठी पाठपुरावा केला. *फ़ोटो ओळ - जुन्नर नगरपालिकेच्या वतीने शवदाहीनीच्या कामास सुरवात करताना नगराध्यक्ष शाम पांडे व आधीकारी वर्ग