Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑक्टोबर १८, २०२१

भाजीमधील कडीपत्ता खाण्याचे फायदे काय?


भाजीमधील कडीपत्ता खाण्याचे फायदे काय?

हल्लीच्या काळात, प्रत्येक घरातील स्वयंपाकात कढीपत्त्याचा वापर आपल्याला सर्रास पाहायला मिळेल. डाळ, आमटी, भाजी, दह्याची कढी, ढोश्याची चटणी, सोबतच अनेक पदार्थात आपल्या प्रत्येकाच्या घरातील सर्वच स्त्रिया, जिरे, मोहरीसोबत, कडीपत्ता टाकून मस्त अशी खमंग फोडणी देऊन वेगवेगळे पदार्थ तयार करतात.

फोडणीत कढीपत्ता असेल जेवणाला एक वेगळीच चव लागते. तसं पाहिलं तर कढीपत्ता चवीला थोडंसं कडवट आणि उग्र वासाचं असतं.पण कढीपत्त्यमध्ये काही विशेष गुणधर्म असतात.

कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शियम, आर्यन, तसेच व्हिटामिन C, व्हिटामिन B, व्हिटामिन E, हे घटक भरपूर प्रमाणात असतात. जे आपल्या शरीराला अत्यंत फायदेशीर असतात.

फायदे :-

केसांसाठी फायदेशीर

कढीपत्त्यामध्ये लोह, 'क',आणि 'अ' जीवनसत्व तसचं आयोडिन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रुक्ष आणि गळणा-या केसांसाठी संजीवनीच ठरू शकते.गरजेपेक्षा जास्त केमिकल्सचा वापर आणि प्रदूषणामुळे केसांचे नुकसान होते. त्यावर कढीपत्त्याच्या पानांचा वाटून लेप करून केसांच्या मुळाशी लावल्यास खुप फायदा होतो.कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास केस काळे, लांब, आणि घनदाट होतात. तसेच कोंड्याची आणि कोरडे केस, पांढ-या केसांची समस्या ही दूर होते.कढीपत्त्याची पाने वाटून पेस्ट बनवून त्यात दही किंवा कांदा रस मिक्स करून केसांना २० ते २५ मिनिटं लावून नंतर शाम्पूने केस धुवावे. हा उपाय नियमित केल्यास, आपले केस काळे आणि घनदाट होतात.



कढीपत्त्याचे आणखीन फायदे :-

कढीपत्त्यात अँटी- ऑक्सिडेंट, अँटी बॅक्टेरीयल, अँटी-फंगल गुण आहेत. त्यामुळे फंगल इन्फेक्शन आणि पिंपल्स येण्यापासून बचाव होतो.कढीपत्त्यामुळे पदार्थाला चव येते. त्यामुळेच जिभेवरच्या चवची संवेदना वाढते.कढीपत्ता आयरन, आणि फॉलिक ॲसिडचा स्रोत आहे. त्यामुळे आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात आयरन आणि फॉलिक ॲसिड उपलब्ध होते.कढीपत्त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असते. त्यामुळे रक्तामधील इन्सुलिनला प्रभावित करून ब्लड-शुगर लेवल कमी करते.कढीपत्त्यामुळे पचनशक्ती वाढते. तसेच वेट लॉससाठी मदत करते. यासाठी जास्त वजन असलेल्या लोकांनी नियमित उपाशीपोटी कढीपत्ता खाल्ल्यास खुप फायदा होतो.कफचा त्रास असेल तर कढीपत्त्याची पावडर करून मध मिसळून नियमित चाटण केल्यास कफच्या त्रासातून मुक्ती मिळेल.ॲनिमिया दूर करते. आरोग्य सुधारते.कढीपत्त्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते. तसेच हृदयसंबंधीचे रोग आणि एनथेरोक्लेरोसीस रक्षण करते.

यकृतासाठी देखील कढीपत्त्याचं सेवन करणं खुप फायदेशीर आहे. आपले यकृत निरोगी ठेवते. त्यासाठी कढीपत्त्याच्या ज्युसात एक चमचा तूप, आणि कुटलेली मिरी घालून पिल्यास खुप फायदा होतो.

त्वचेवरील सुरकुत्या दूर होतात. त्वचा स्वच्छ करण्यास मदत करते. तसेच चेह-यावरील अतिरिक्त तेल काढण्यास मदत करते. गुलाब जलमध्ये कढीपत्त्याची पावडर मिक्स करुन चेह-यावर लेप केल्यास वरील फायदा होतो.उकललेल्या पाण्यात कढीपत्ता टाकून चेह-यावर वाफ घेतल्यास पोअर्स ओपन होतील आणि डाग देखील कमी होतील. आठवड्यातून दोनदा हा उपाय करावा.

अश्या रीतीने कढीपत्त्याचा वापर केल्यास आपल्याला अनेक फायदे होतात. आणि महात्वाचे म्हणजे कढीपत्त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे आपण बिनधास्त कढीपत्त्याचे सेवन करू शकता.


कढीपत्त्याची पानं स्वयंपाकात वापरण्यापू्र्वी स्वच्छ धुवून घ्यावी.
– अनेकजण आमटी, पोहे, कढी या आहारातील पदार्थांमधील कढीपत्ता वेचून बाहेर काढून टाकतात. उलट तो कढीपत्ता बारीक कु्स्करून आहारीय पदार्थांसोबत खाल्ला पाहिजे.
– गृहिणींनी कढीपत्त्याचे बारीक तुकडे करूनच ते पदार्थात वापरावे म्हणजे ते खाल्ले जातील.


What are the benefits of eating curry leaves in vegetables?

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.