Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट २०, २०२१

मेट्रो फेज टू का प्रस्ताव केंद्रीय कैबिनेट को मंजूरी के लिए भेजा गया है – केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी Ministry of Road Transport & Highways

महामेट्रोचे  झिरो माईल स्टेशन आणि फ्रिडम पार्क नागपूरच्या वैभवात भर टाकणा-या वास्तू 

- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी  यांचे प्रतिपादन 


 नागपूर मेट्रो   प्रकल्प   स्वच्छ  तसेच शाश्वत प्रारुप म्हणून सक्षम   

- केंद्रीय नगर विकास तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे मत 


नागपूर महा मेट्रोच्या सीताबर्डी-झिरो माईल-कस्तुरचंद पार्क मार्गाचे नवीन सेक्शन, फ्रिडम पार्कचे  नागपूरमध्ये लोकार्पण संपन्न  


 नागपूर 20   ऑगस्ट 2021


महामेट्रोने नागपूरात स्थापन केलेले सीताबर्डी-झिरो माईल-कस्तुरचंद पार्क मार्गिका तसेच फ्रीडम पार्क हे नागपूरच्या वैभवात  भर टाकतील.नागपूरमध्ये जागतिक दर्जाची बरीच कामे होत आहेत. पहिल्यांदाच आपल्या देशात टू टायर मेट्रोची उभारणी महामेट्रोतर्फे  करण्यात आली आहे, असे प्रतिपादन  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी  यांनी आज केले. मुख्यमंत्री   उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री   नितीन गडकरी आणि केंद्रीय गृह निर्माण, नागरी सुविधा  मंत्री  हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते महा मेट्रो नागपूरच्या सीताबर्डी-झिरो माईल-कस्तुरचंद पार्क या 1.6 किमी लांब मार्गाचे   उदघाटन  आज स्थानिक झिरो माईल  येथे  झाले .  त्यावेळी  गडकरी बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून  केंद्रीय मंत्र्यासोबत  या  मार्गिकेवर धावणाऱ्या पहिल्या मेट्रो रेलला झेंडा दाखवून रवाना केले . याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय नगर विकास  सचिव डी.एस. मिश्रा , नागपूरचे  पालकमंत्री आणि उर्जा मंत्री डॉ. नितिन राऊत, राज्याचे पशूसंवर्धन मंत्री सुनील केदार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित उपस्थित होते. 



झिरो माईल स्टेशन येथे कॉटन मार्केट या स्थानावरून ट्रफिक सिग्नलच्या अडथळ्याशिवाय  पोहचण्यासाठी केंद्रीय रस्ते निधी मधून एक  भूयारी मार्ग मंजूर करू असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी यावेळी दिले .नागपूर शहरातील तेलंखेडी तलाव तसेच उड्डाणपुलाच्या सौंदर्यीकरण यामध्ये महा मेट्रोची खूप मदत झाली असेही त्यांनी सांगितलं. मेट्रोच्या फेज दोनचा  प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे  असेही त्यांनी सांगितलं. नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला सोबत घेऊन चालू केला आहे . राज्याला आवश्‍यक तो सर्व निधी केंद्र सरकार तर्फे दिला जाईल मुंबई ठाण्याच्या विकासाकरिता अतिरिक्त १ लाख कोटी रुपयांचा निधी सुद्धा मुंबईच्या प्रस्तावित बैठकीमध्ये देण्याचं आश्वासन गडकरी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेना यावेळी दिले.

 नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाला 21 ऑगस्ट 2014 रोजी मंजुरी देण्यात आली आणि त्याची पायाभरणी त्याच दिवशी   पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी केली. नागपूरची माझी मेट्रो एक ग्रीन मेट्रो आहे, ज्यामध्ये एकूण ऊर्जेच्या 65%  सौर ऊर्जचा वापर , पाण्याचा 100% पुनर्वापर, पावसाच्या पाण्याचे संवर्धन होते . सर्व स्थानकांवर बायो डायजेस्टर्सही आहेत. मेट्रोला 60% हुन अधिक महसूल नॉन-फेअर-बॉक्समधून  प्राप्त होतो. नागपूर मेट्रो  हरित ऊर्जा वापरत असल्याने हा प्रकल्प  एक स्वच्छ  तसेच शाश्वत प्रारुप म्हणून सक्षम  असल्याचे  केंद्रीय नगर विकास तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी  यांनी यावेळी सांगितलं. नागपूर मेट्रोचा हा प्रकल्प  डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला . कस्तुरचंद पार्कची स्थापत्य कला पारंपरिक राजपूत पद्धतीने साकारली असून कस्तुरचंद पार्क मेट्रो स्थानकाचा दर्शनी भाग आणि त्याची स्थापत्य कला याच धर्तीवर साकारली आहे. राजपूत स्थापत्य कलेचे सांकेतिक भाग जसे छत्री, तोरण, राजपूत जाळी, कॉलमवरील नक्काशी मेट्रो स्थानकात दर्शवल्या गेली आहे. यामुळे शहरात एक अनोखी वास्तू निर्माण होण्यास मदत मिळाली आहे, असेही पुरी यांनी सांगितले.   


  जनतेच्या विकासाच्या कामात कुठेही  अ‍डथळा  येऊ देणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली . मेट्रो प्रकल्पाचे उन्नत -एलिव्हेटेड मार्ग तयार करताना या मार्गाच्या खाली सुद्धा सौंदर्यीकरण तसेच नागरिकांना काही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लक्ष द्या अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी   केली. विकास झाला पाहिजे पण त्यात कुठलीही उणीव किंवा कमतरता राहिली नाही पाहिजे याची खात्री आपण घेतली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तराव्या वर्षी सुद्धा पुढच्या 75 व्या वर्षापर्यंत टिकेल असे चांगलं काम आपण जनतेसाठी करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . 

मुंबई ते पुणे हे अंतर केवळ दोन तासात कापता येईल असा एक्सप्रेस हायवे नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत बांधला गेला. त्याचप्रमाणे  बाळासाहेब ठाकरे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा राज्याच्या समृद्धीला व विकासाला कारणीभूत ठरेल , असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले . मुंबई  आणि पुणे येथे देखील मेट्रोची ट्रायल रन सुरू झाली असल्याच शिंदे यांनी सांगितलं. 

      नागपूर मेट्रोने संविधान चौका पासून ते या झिरो माइल पर्यंत केलेलं हे मेट्रोच काम हेरिटेज वॉक म्हणून उदयास येईल .  सदरची मेट्रो सेवा ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना वाहतुकीची सुविधा मिळण्यासाठी लाभदायक ठरेल असे नागपूरचे  पालकमंत्री आणि उर्जा मंत्री डॉ. नितिन राऊत यांनी यावेळी सांगितलं .

नागपूर मेट्रोने हा प्रकल्प दळणवळणाची कुठलीही सुविधा बंद न करता वेळेच्या आत पुर्ण केले असल्याचं राज्याचे पशूसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी यावेळी सांगितलं . 

नागपूरचा झिरो माइल हे अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचे स्थळ असून 1907 साली ब्रिटिशांनी द ग्रेट ट्रिग्नोमेट्री सर्वेचा प्रारंभ झिरो माइल या नागपुरातल्या स्थळातून केला होता अशी माहिती महाराष्ट्रातील विधानसभेतील विरोधी पक्ष नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. मेट्रोचे हे झिरो माईल स्थानक २०   माळ्याचे राहणार असून या स्थानाच  महत्त्व अधोरेखित होणार असल्याचंही त्यांनी सांगितल .  

1.6  किलोमीटर लांब  या सीताबर्डी-कस्तुरचंद पार्क  मार्गिकेवरील मेट्रो प्रवास आज पासून  सुरु झाल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची मोठी निकड पूर्ण होईल आणि अतिशय गर्दीचे ठिकाण असलेले भाग जोडेल जातील.  हा मार्ग नागपूर शहरातील विधान भवन  , भारतीय रिझर्व्ह बँक, केंद्रीय संग्रहालय, संविधान चौक आणि मॉरीस कॉलेज.अशा अतिमहत्वाच्या वास्तू आणि कार्यालयांना जोडतो . नागपुरात स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण असलेले हे झिरो माईल फ्रिडम पार्क मेट्रो स्टेशन   हे देशातील अश्या प्रकारचे पहिले मेट्रो स्थानक असेल जे एका भव्य २० मजली इमारतीचा भाग असेल आणि ज्याच्या चौथ्या मजल्यावरून मेट्रो ट्रेन अवागमन करेल.

देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने, झिरो माईल स्थानकाच्या भोवताली ४०,००० चौरस फुट जागेवर फ्रीडम पार्कचे निर्माण झाले याचेही उद्घाटन आज पार पडले.   या स्थानकाचे नाव आता झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशन ठेवले आहे.  यात पब्लिक प्लाझा, हिस्ट्री वॉल सारख्या अनोख्या संकल्पना राबवल्या आहेत. युद्धात वापरलेला टी -55  रणगाडा देखील येथे नागपूरकरांना बघता यावे म्हणून स्थापित केला आहे. फ्रिडम पार्कच्या आत डाव्या बाजूला अँफी थियेटर आहे. येथील हिस्ट्री वॉल शाहिद स्मारक पर्यंत आहे.मेट्रो रेल्वे नागपूरच्या या मार्गाच्या उद्घाटनासह, भारताने 18 शहरांमध्ये 725 किलोमीटरचे मेट्रो रेल्वे कव्हरेज साध्य केले आहे, ज्यामध्ये दिल्ली मेट्रोचा मोठा वाटा आहे.


  याप्रसंगी सर्व मान्यवरांनी या नवीन मार्गिकेवर प्रवास करुन या मार्गिकेवर प्रवाशी सेवेचा शुभारंभ केला. या उद्‌घाटन सोहळ्यास स्थानिक लोकप्रतिनीधी , महामेट्रोचे, महाराष्ट्र तसेच नागपूर जिल्हा आणि महानगरपालिका   प्रशासनचे अधिकारी व पदाधिकारी  उपस्थित होते.      


New section of Sitabardi-Zero Mile-Kasturchand Park route of Nagpur Maha Metro, Freedom Park dedicated to the nation at a function in Nagpur

Mahametro's Zero Mile Station and Freedom Park add to the splendor of Nagpur: Union Minister Nitin Gadkari

Nagpur Metro project is capable of becoming a clean as well as sustainable model: Union Minister Hardeep Singh Puri

Posted On: 20 AUG 2021 5:00PM by PIB Mumbai

Nagpur / New Delhi, August 20, 2021

Union Minister for Road Transport and Highways Shri Nitin Gadkari has expressed confidence that the Sitabardi-Zero Mile-Kasturchand Park corridor established by Mahametro in Nagpur as well as the Freedom Park will add to the splendor of Nagpur. Addressing the inaugural function of the 1.6 km long Sitabardi-Zero Mile-Kasturchand Park route of Maha Metro Nagpur in the city today, he said: “A lot of world-class infrastructure is being built in Nagpur. For the first time in our country, a two-tier metro has been set up”. The route was inaugurated at the Zero Mile point, by Chief Minister of Maharashtra Uddhav Thackeray, Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari and Union Minister for Housing and Urban Affairs Hardeep Singh Puri. The Chief Minister, along with the Union Ministers, virtually flagged off the first metro train running on this route.

“Underpass connecting Zero Mile Station and Cotton Market to come up”

Union Road Transport Minister Nitin Gadkari promised funds from Central Roads Fund for an underpass to reach Zero Mile Station from Cotton Market without any hindrance of traffic signals. He also said that MahaMetro has helped a lot in beautification of Telangkhedi Lake and flyover in Nagpur city. He also informed that the proposal for Metro Phase II has been sent to the Union Cabinet for approval. “The work of Nagpur-Mumbai Samrudhi Highway has been started by the Union Ministry of Road Transport and Highways along with Maharashtra State Road Development Corporation. All the funds required by the state will be provided by the Central Government.”

Gadkari also promised to provide an additional Rs. 1 lakh crore for the development of Mumbai-Thane cities in the proposed meeting in Mumbai.

 The Nagpur Metro Rail project was approved on August 21, 2014 and its foundation stone was laid by Prime Minister Narendra Modi on the same day. My Metro in Nagpur is a Green Metro; 65% of its total energy need is met from solar energy. It also recycles 100% water used by it and is also equipped for harvesting rainwater. There are bio digesters at all stations. Metro receives more than 60% of its revenue from non-fair-box.

“Nagpur Metro Project to be completed by December 2021”

Union Minister for Urban Development and Petroleum Hardeep Singh Puri, who joined the event virtually, said that the project is capable of being a clean and sustainable project as Nagpur Metro uses green energy. He expressed confidence that the Nagpur Metro project would be completed by December 2021.  Traditional Rajput-style architecture is used in designing Kasturchand Park. The facade of Kasturchand Park Metro Station and its architecture have been done on the same lines. Symbolic parts of Rajput architecture like umbrellas, arcs, Rajput nets, carved-on columns are shown at the metro station. This has created a unique structure in the city, said Shri Puri.

Will not let development anywhere hinder: CM

Chief Minister Uddhav Thackeray assured that the development work will not be hindered anywhere. While constructing the elevated route of the metro project, the Chief Minister suggested to pay attention to beautification under this route as well as to provide some facilities to the citizens. He said that development should take place but we should make sure that there are no shortcomings in it. He expressed confidence that we will do such a good job for the people in the 75th year of independence that it will last for next 75 years.

 The Guardian Minister of Nagpur and Energy Minister, Dr. Nitin Raut expressed confidence that this metro service will be beneficial for smoothening the traffic as well as for providing transport facilities to the students.

 Historic importance of Zero Mile

The Leader of Opposition in the Maharashtra Legislative Assembly and former Chief Minister Devendra Fadnavis said, “Nagpur's Zero Mile is a very historic place and the Great Trigonometry Survey was started by the British in 1907 from Zero Mile, Nagpur”.

 The 1.6 km long Sitabardi-Kasturchand Park line will start operations from today, which will enhance the public transport system and connect the most congested areas. The road connects the Vidhan Bhavan, Reserve Bank of India, Central Museum, Sanvidhan Chowk and Morris College in Nagpur. The Zero Mile Freedom Park Metro Station, a masterpiece of architecture in Nagpur, will be the first of its kind in the country to be part of a magnificent 20-storey building with a metro train occupying the fourth floor.

 The inauguration of the 40,000-square-feet Freedom Park around the Zero Mile station also took place today, marking the 75th anniversary of the country's independence. The station is now called Zero Mile Freedom Park Station. It has unique concepts like Public Plaza and History Wall. The T-55 tank used in the war has also been installed here for Nagpurites to see. Inside Freedom Park is the Amphitheater on the left. The history Wall here stretches up to Shahid Smarak (Martyrs’ memorial).

***

Mahesh Chopade/DJM/DW/JW/PM




मेट्रो फेज टू का प्रस्ताव केंद्रीय कैबिनेट को मंजूरी के लिए भेजा गया है – 

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी

 

केंद्रीय सड़क परिवहन मंत्री नितिन गडकरी ने जीरो माइल स्टेशन पर कॉटन मार्केट तक पहुंचने के लिए सेंट्रल रोड फंड से अंडरग्राउंड टनल को मंजूरी देने का वादा किया है. उन्होंने यह भी कहा कि मेट्रो फेज टू का प्रस्ताव केंद्रीय कैबिनेट को मंजूरी के लिए भेजा गया है।

केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्रालय ने महाराष्ट्र राज्य सड़क विकास निगम के साथ मिलकर मुंबई समृद्धि हाईवे का काम शुरू कर दिया है. गडकरी ने लोक निर्माण मंत्री एकनाथ शिंदे को आश्वासन दिया कि मुंबई में प्रस्तावित बैठक में मुंबई ठाणे के विकास के लिए अतिरिक्त 1 लाख करोड़ रुपये प्रदान किए जाएंगे।जीरो माइल मेट्रो स्टेशन की 20 मंजिलों में से 13 मंजिलें व्यावसायिक उपयोग के लिए दी जाएंगी।गडकरी ने कहा कि यह भारत का एकमात्र ऐसा स्टेशन होगा।

राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने गवाही दी कि लोगों के विकास कार्यों में कहीं भी राजनीति की अनुमति नहीं दी जाएगी।

कें     द्रीय शहरी विकास और पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी ने कहा कि नागपुर मेट्रो हरित ऊर्जा का उपयोग करती हैइसलिए यह परियोजना एक स्वच्छ और टिकाऊ मॉडल बनने में सक्षम है। उन्होंने विश्वास व्यक्त किया कि नागपुर मेट्रो परियोजना दिसंबर 2021 तक पूरी हो जाएगी।

महाराष्ट्र विधानसभा में विपक्ष के नेता और पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि नागपुर का जीरो माइल एक बहुत ही ऐतिहासिक स्थान है और ग्रेट ट्रिगोनोमेट्री सर्वे की शुरुआत 1907 में जीरो माइलनागपुर से की गई थी। उन्होंने यह भी कहा कि मेट्रो के इस जीरो माइल स्टेशन में 20 गार्डन होंगे और इस जगह के महत्व को रेखांकित किया जाएगा. उन्होंने कहा कि केंद्रीय बजट में नागपुर महा मेट्रो के दूसरे चरण को भी मंजूरी दे दी गई है और यह भी शुरू हो जाएगा।

मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे ने मेट्रो परियोजना के एलिवेटेड रूट का निर्माण करते हुए इस मार्ग के सौंदर्यीकरण पर ध्यान देने के साथ ही नागरिकों को कुछ सुविधाएं उपलब्ध कराने के भी निर्देश दिए. उन्होंने कहा कि विकास होना चाहिए लेकिन हमें यह सुनिश्चित करना चाहिए कि इसमें कोई कमी न हो। उन्होंने विश्वास व्यक्त किया कि हम लोगों के लिए एक अच्छा काम करेंगे जो स्वतंत्रता के 75 वें वर्ष में भी अगले 75 वर्षों तक चलेगा।

राज्य के पशुपालन मंत्री सुनील केदार ने कहा कि नागपुर मेट्रो ने बिना किसी परिवहन सुविधा को बंद किए परियोजना को समय पर पूरा कर लिया है. नागपुर मेट्रो द्वारा कांस्टीट्यूशन चौक से इस जीरो माइल तक किया गया कार्य हेरिटेज वॉक के रूप में उभरेगा। नागपुर के संरक्षक मंत्री और ऊर्जा मंत्री डॉ. इस बार नितिन राउत ने कहा।

मुंबई-पुणे एक्सप्रेस हाईवे का निर्माण मुंबई में नितिन गडकरी के नेतृत्व में किया गया था। इसी तरह लोक निर्माण मंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि बालासाहेब ठाकरे नागपुरमुंबई समृद्धि राजमार्ग राज्य की समृद्धि और विकास में योगदान देगा। शिंदे ने कहा कि मुंबई और पुणे में भी मेट्रो का ट्रायल रन शुरू हो गया है।

 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.