नागपूर: एक्वा आणि ऑरेंज लाईन या दोन्ही मार्गावरील मेट्रो सेवा या रविवार (२९ मे २०२२) पासून वाढवण्यात येत आहे. सुधारित वेळापत्रकानुसार या दोन्ही मार्गिकेवरील टर्मिनल स्टेशन येथून शेवटची मेट्रो ट्रेन रात्री ९.३० ऐवजी रात्री १० वाजता पर्यंत उपलब्ध असेल.
नागरिकांची सातत्याने होणारी मागणी बघता वेळेमध्ये बदल करण्यात आले आहेत. प्रवासी रविवार सुट्टीचा दिवस बघता खरेदी किंवा अन्य कार्य ठिकाणी जात असून मेट्रो प्रवाश्याची मागणी होती, त्यामुळे या मेट्रो सेवा रात्री ९.३० वाजताच्या ऐवजी रात्री १० वाजता पर्यंत सुरु राहणार.
*आत्तापर्यंत, प्रवासी सेवा सकाळी ६.३० वाजता पासून रविवारसह सर्व दिवस रात्री ९.३० पर्यंत सुरू असते, परंतु आता रविवार या दिवशी मेट्रो सेवा रात्री १० वाजता पर्यंत असेल. मेट्रो सेवा रविवारी सकाळी ६.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत दर २० मिनिटांनी उपलब्ध असेल, तसेच दुपारी १२ ते रात्री ९ वाजता पर्यंत दर १५ मिनिटांनी आणि रात्री ९ ते १० या दरम्यान मेट्रो सेवा दर २० मिनिटांनी उपलब्ध असेल.*
सर्वानी नोंद घेण्यात यावी कि, मेट्रो सेवेमध्ये सदर बदल फक्त रविवार या दिवसा करता करण्यात आलेले असून इतर दिवशी मेट्रो सेवा आणि वेळ पूर्वीप्रमाणेच राहतील, वर नमूद केल्याप्रमाणे प्रवाशांची गरजा लक्षात घेता मेट्रो ट्रेनच्या वेळ मध्ये बदल करण्यात आले आहेत. नागपूरकरांनी मेट्रो सेवेच्या वाढलेल्या वेळेचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन महा मेट्रो करित आहे. या वाढीव फेऱ्यांचा नागपूरकरांना नक्कीच फायदा होणार आहे.
· *Metro Timetable Set to Change*
· *Services till 10 pm on Sunday*
NAGPUR: Metro services on both the Aqua and Orange Line are set to be extended beginning this Sunday (29th May). As per the revised timetable, the last train on the terminal stations on these two lines would be at 10 pm instead of 9.30 pm.
The decision to this effect has been taken after receiving demands to that effect from the commuters. The commuter on Sunday, who essentially represents those going out for shopping, roaming or even sightseeing wanted passenger services to be extended till 10 pm. After taking into considerations demands made to that effect and passengers’ flow during the day, the decision to extend services beyond 9.30 pm on Sunday was taken.
*As of now, the passenger services start at 6.30 am and continue till 9.30 pm on all days, including Sunday. In addition to extending the services till 10 pm on Sunday, the frequency of metro trains on Sunday from 6.30 am to 12 noon has been fixed at 20 minutes. The frequency of trains between 12 noon and 9 pm remains unchanged at 15 minutes. The frequency of metro trains between 9 pm to 10 pm would be 20 minutes.*
It must be noted here that all the changes are applicable for services on Sunday only. The train timings and frequency on the other days remains unchanged. As mentioned above, the changes in train timings and frequency have been made keeping in mind the need of the commuters. It is expected that Nagpurians take full advantage of the extended train timings.