नागपूर/प्रतिनिधी:
अंडय़ाच्या दरात झालेली घसरण आणि कच्च्या मालाच्या दरात झालेली एकतर्फी वाढ यामुळे राज्यातील ‘पोल्ट्री’ व्यवसाय सण २०१९ पासून आर्थिक अडचणीत सापडला आहे. औषधे, मिनरल्स, मका, सोयाबीन यांच्या दरात झालेली वाढ ‘पोल्ट्री’ व्यवसायाच्या मुळावर उठली आहे. जानेवारी २०१९ पासून पोल्ट्री खाद्याच्या किमतीत एकूण ३५० रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे,२०१९ वर्ष सरताच खाद्य कंपन्यांना अजून एकदा आपल्या खाद्याच्या किमतीत ५० ते ६० रुपयाची दरवाढ करावी लागत आहे. कच्या मालाच्या सततची होणारी दरवाढ यामुळे हा व्यवसाय चालवणेही अवघड होणार असल्याची भीती व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. कुक्कुटपालनासाठी आणि दुग्धोत्पादनात ओले-कोरडे पशुखाद्य म्हणून वापरल्या जाणाऱ्या मक्याला अळीने लक्ष्य केले.ऊस व ज्वारीवरही तिचा प्रादुर्भाव आढळला आहे.याचा थेट परिणाम कुक्कुटपालन व डेअरी व्यवसायावर थेट परिणाम होत आहे.
राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन ते प्रतिक्विंटल ३९०० ते ४००० रुपयांपर्यंत गेले आहेत. इराणकडून वाढलेली मागणी, मक्याचे भडकलेले दर आणि मध्य प्रदेशात भावांतर भुगतान योजनेची सांगता यामुळे सोयाबीनचे दर वधारले आहेत. शेतकऱ्यांनी आपला माल विकण्यासाठी ही योग्य दरपातळी आहे, किमान निम्मा माल या किमतीला विकून टाकणे शेतकऱ्यांसाठी ते फायद्याचे ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
शेतीपूरक व्यवसाय म्हमून कुक्कुटपालनाचा प्रसार अनेक ठिकाणी झाला आहे. रोख उत्पन्न देणारा व्यवसाय असल्याने अनेक बेरोजगार तरुणांनी कर्ज काढून या व्यवसायासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र गेल्या दोन-तीन महिन्यांत मका,सोयाबीन,डी-ऑईल्ड राईस ब्रान (डीओआरबी), औषधे, मिनरल्स या सर्व प्रकारच्या कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. या तुलनेत दुसऱ्या बाजूला अंडय़ाच्या दरात मात्र घसरण झाली आहे. या दुहेरी संकटामुळे हा व्यवसाय सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून या व्यवसायासाठी लागणाऱ्या मालाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कोंबडय़ांच्या खाद्यात मिसळला जाणारा ‘डीओआरबी’ या घटकाची तब्बल ५० टक्के दरवाढ झाली आहे. मक्याचे दर वाढत २५ रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. एका बाजूला मक्याचे दर वाढत असताना बाजारात मक्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
कोंबडी खाद्यामध्ये मक्याचा वापर मोठय़ा प्रमाणावर करावा लागत असल्याने कोंबडी खाद्य निर्मितीचा उत्पादन खर्च खूपच वाढला असून मक्याच्या टंचाईमुळे त्यात आणखी भर पडत आहे. मक्याची साठेबाजी करुन कृत्रिम टंचाई केली गेली असावी, अशी व्यावसायिकांना शंका असून शासनाने याबाबत साठेबाजांवर कारवाई करून मका रास्त दरात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
पोल्ट्री व्यवसायात कोंबड्या मोठ्या झाल्यावरचा विक्री भाव आणि संपूर्ण खाद्य,देखरेख,औषध,यावर केलेला खर्च हा पोल्ट्री व्यवसायिकांना परवडणारा नसल्याने पोल्ट्रीफार्मिंग बंद होण्याच्या स्थितीत आहेत.सध्या महाराष्ट्रात कुक्कुटपालन पशुखाद्य बनवणारी "न्युट्रीक्राफ्ट" कंपनीच्या फार्मर्सची चिंता मात्र मिटलेली दिसत आहे. गेल्या काही दिवसात बाजारात जरी पशुखाद्य बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या असतील तरी मात्र "न्युट्रीक्राफ्ट" या कंपनीने आपल्या पशुखाद्याचा दर्जा घसरवला नाही,पहिले पासून शेवट परियंत पोल्ट्री व्यवसायिकांना एकाच प्रकारचे खाद्य पुरवीत असल्याने फार्मर्स ५० रुपये अधिक रक्कम जादा दराने देऊन न्युट्रीक्राफ्ट कंपनीचेच फीड घेत आहेत,याचा दुसरा फायदा फार्मर्सला संपूर्ण लागणारा खर्च वगळता बऱ्यापैकी फायदा होतो. त्यामुळे न्युट्रीक्राफ्ट खाद्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
पोल्ट्री फार्मर हे वारंवार फीड कंपनीला नफा कमवायच्या मागे लागले आहेत व यातून डीलर जास्त नफा कमविणार असल्याचे आरोप करतात.मात्र या संपूर्ण प्रकारावरून पोल्ट्रीफीड का महाग झाले याचे कारण समजू लागले आहे. त्यामुळे पोल्ट्री फार्मर्सनी चांगल्या कंपनीचे खाद्य वापरावे व आपल्या उत्पन्नात वाढ करावी अशी परिस्थिती सध्याच्या एकूणच भाव वाडीवरून समोर येत आहे.
न्युट्रीक्राफ्ट खाद्यासाठी संपर्क:9175937925