मूल (गौरव शामकुळे):
मूल तालुक्यातील डोंगरगाव जवळील नदीतून दररोज 50-60 हायवा ट्रकद्वारे रात्री रेतीचा उपसा करून तस्करी केली जात आहे.
रेतीसाठी परवानगी घ्यायची आणि त्यावरून रेती तस्करी करायची असा प्रकार डोंगरगाव येथे सुरू असून या रेती तस्करांवर कारवाई करावी अशी मागणी युवानेते गौरव शामकुळे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
रेतीचा उपसा करण्याची परवाने 30 सप्टेंबर रोजी संपले, मात्र काही कंत्राटदारांनी रेती साठ्याची जिल्हाधिका—यांकडून परवानगी घेतली आणि हा साठा दाखवून रात्री मोठ्या प्रमाणावर नदीतून अवैधरित्या रेती उपसा केली जात आहे आणि ती तस्करीच्या मार्गाने नेली जात आहे. डोंगरगाव येथे रोज सायंकाळी 30 ते 40 हा वाटर कुठे असतात आणि रात्रभर उमा नदीतून रेती उपसा केली जाते व तस्करी केली जाते या तस्करांवर कारवाई करावी अशी मागणी गौरव शामकुळे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदन देतांना गौरव शामकुळे, आशिष वाळके, प्रशिक दुर्गे, महेष दुधबळे, पियुष रामटेके होते.