नागपूर, १४: नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या वर्धा मार्गावरील (रिच-१) जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशनचे कार्य पूर्ण झाले असून लवकरच सदर मेट्रो स्टेशन प्रवाश्यांसाठी सुरु करण्यात येणार आहे. जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन जवळचा संपूर्ण परिसर रहिवासी क्षेत्र, खाजगी हॉटेल्स, व्यावसायिक दुकाने इत्यादीने व्यापलेला आहे त्याशिवाय मिहान येथे कार्यरत असलेले कर्मचारी या परिसरातून मोठ्या प्रमाणात ये-जा करत असल्यामुळे सदर मेट्रो स्टेशन सुरू झाल्यास नागरिकांना नव्कीच मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशनवर प्रवाश्यांच्या दृष्टीने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहे. लिफ्ट, एस्केलेटर, दिव्यांगांसाठी प्लॅटफॉर्म व स्टेशन परिसरात विशेष सोय करण्यात आली आहे. उल्लेखनीय आहे की, नुकतेच रेल्वे बोर्डाने वर्धा मार्गावर (खापरी ते सीताबर्डी इंटरचेंज) ताशी ८० किमी'ची मंजुरी महा मेट्रोला दिली आहे. त्यामुळे आता लवकरच या मार्गावर ताशी ८० किमी वेगाने मेट्रोचा प्रवास नागरिकांना करता येणार आहे.
सध्या दर ३० मिनिटांनी मेट्रोची प्रवासी सेवा नागरीकांन करिता सुरु असून ताशी ८० किमी वेगाने मेट्रो धावणार असल्याने प्रवाश्यांना फायदा होणार आहे.