चंद्रपूर/प्रतिनिधी:
कॉंग्रेसच्या अशोक चव्हाण व कार्यकर्त्यांच्या राजीनामा सत्रानंतर अखेर काँग्रेसने देशभरातील १० लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले असून त्यात महाराष्ट्रातील चार मतदारसंघाचा समावेश आहे. यापूर्वी चंद्रपूर मतदारसंघातून विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु, नव्या यादीत त्यांची उमेदवारी रद्द केली असून त्यांच्याजागी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेले सुरेश धानोरकर यांना चंद्रपूर मतदारसंघातून उमदेवारी देण्यात आली आहे. यासाठी वडेट्टीवार व अशोक चव्हाण यांना दिल्लीवारी कारवाई लागली.
मागील अनेक दिवसांपासून चंद्रपूर लोकसभा मतदार संघात काँग्रेस तर्फे उमेदवार देण्यासाठी बराच वेळ लागत होता. अशातच शुक्रवारी रात्री कधी लोकसभा निवडनुकीच्या शर्यतीत नसणारे उमेदवार विनायक बांगडे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली.मात्र या उमेदवारीला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा विरोध सुरू झाला. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची काँग्रेसचा उमेदवार हा शिवसेनेचे राजीनामा दिलेले आमदार बाळू धानोरकर यांना देण्यात यावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना फोनवरून एका कार्यकर्त्याने विचारणा केली.धानोरकर यांची सीट शुअर असतांना बांगडे यांना उमेदवारी दिलीच कशी ही विचारपूस करण्याची क्लिप चांगली व्हायरल झाली. व काँग्रेसच्या अडचणी वाढू लागल्या. त्यामुळे तत्काळ दिल्लीवारी करण्याच्या सूचना वरिष्ठांनी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्या व तत्काळ दिल्ली गाठून धानोरकर यांचे नाव जाहीर करण्यात आले व रविवारी दुपारी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बाळू धानोरकर यांचे नाव जाहीर करण्यात आले,
उमेदवारी मिळाल्यानंतर चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचा उमेदवारी अर्ज दि. २५ मार्च २०१९ ला सकाळी १०.०० वाजता सोमेश्वर मंदिर, कोहिनूर तलाव जवळ, जेलच्या मागे, चंद्रपूर येथून भव्य रॅली काढुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. तर गिरणार चौक येथून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचे कार्यकर्त्यांसोबत सकाळी दहा वाजता रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल करनार आहेत असे प्रसिद्ध पत्रकात सांगण्यात आले आहे
शरद पवार आणि शिवाजीराव मोघे मदतीला
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसला निवडणूक जिंकायची असेल तर बाळू धानोरकर हे दमदार उमेदयार आहेत. मात्र पक्षाने त्याना उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोधे त्यांच्या मदतीला धावले,ईतकेच नव्हे, तर त्यांनी ही बाब आघाडीचे नेते शरद पवार यांच्यापर्यत पोहचविली. त्यांनी ती पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कानावर घातली. यानंतर धानोरकरांची उमेदवारी जाहीर झाल्याचे बोलले जात आहे.
शरद पवार आणि शिवाजीराव मोघे मदतीला
त्यामुळे आता चंद्रपूर लोकसभा मतदार संघात चांगलीच रस्सा खेच बघायला मिळणार आहे.सोशल मीडियावर बाळू धानोरकर यांच्या नावाचा जास्तच गाजावाजा होत असल्याचे दिसून येत आहेत, त्यामुळे राज्यात सर्वात उशिरा उमेदवार जाहीर करणाऱ्या मतदार संघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले राहणार आहे. यात मतदार संघात आतापर्यंत भाजपचा गड होता केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हे या मतदार संघातून सलग चार वेळा निवडून आलेले आहेत मात्र सध्याचे वातावरण बघता काँग्रेसने बाळू धानोरकर यांना फायनल तिकीट घेऊन चंद्रपूर लोकसभा मतदार संघात धानोरकर विरुद्ध अहिर या रंजक सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.