चंद्रपूर/प्रतिनिधी:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 2019 ची काँग्रेसच्या निवडणुकीची तयारी बघता राज्यकर्त्यांना राहुल गांधी यांची भिती वाटू लागली आहे.त्यामुळे राजीव गांधी यांच्या काळात बंद झालेल्या प्रकरणाची फाईली पुन्हा उगदून काढून काँग्रेसची प्रतिमा ऐन निवडणुकीच्या तोंडावर मलिन करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. ज्या इटालियन माणसावर ठपका होता तोही आता जिवंत नाही.राहुल गांधींवर बोफोर्स प्रकरणाचा ठपका ठेवण्याचा सीबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकार प्रयत्न करत आहे असा थेट आरोप पवार यांनी मेळाव्यात बोलताना केला.
शरद पवार हे दोन दिवसीय चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून स्थानिक नागपूर रोड वरील न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानात आयोजीत मेळाव्यात कार्यकर्तांना संबोधतांना म्हणाले.
पवार पुढे म्हणाले की इंदिरा गांधी यांना तुरुंगवास झाल्यानंतर फक्त 6 महिन्यात त्यांना जनतेने पुन्हा निवडून दिले. हा घड़लेला इतिहास नरेंद्र मोदी विसरले आहेत.त्यांनी हा ईतिहास आठवावा,चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतांनाही चंद्रपूर जिल्यात मोठया प्रमाणात दारू विक्री आजही होत आहे. दारूबंदी करायची होती तर त्या संबंधी ठोस कायदे निर्माण करून केलीस असती तर बंदीतल्या दारू बंदीचा काही फायदा झाला असता. मात्र, या सत्ताधाऱ्यांनी या बंदीच्या निमित्तानं भ्रष्टाचार वाढवले आहे. सध्याची परिस्थिती पाहता हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणार असे वाटत नाही