Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शरद पवार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शरद पवार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, नोव्हेंबर २२, २०१७

 पवार व सुप्रिया सुळेंवर अश्‍लील ट्विट

पवार व सुप्रिया सुळेंवर अश्‍लील ट्विट

नागपूरच्या तरुणाला अटक - आ. जितेंद्र आव्हाडांची तक्रार


नागपूर-  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अश्‍लील भाषेत ट्‌विट करणाऱ्या नागपूरच्या युवकास पोलिसांनी अटक केली.  आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील वर्तकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.






रविवार, नोव्हेंबर १९, २०१७

पवार - पाटलात बंददार चर्चा

पवार - पाटलात बंददार चर्चा

वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात वर्धा येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी (18 नोव्हेंबर) सकाळी अर्धा तासापेक्षा अधिक वेळ बंद दारा आड चर्चा झाली. या चर्चेचा अधिक तपशील मिळू शकला नसला तरी शरद पवार मागील चार दिवसांपासून विदर्भाच्या दौ-यावर असल्याने या संदर्भात पाटील यांनी पवारांशी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे. चंद्रकांत पाटील शुक्रवारी (17 नोव्हेंबर) रात्री 11 वाजता विश्रामगृहात पोहोचले. त्यानंतर शनिवारी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची आढावा बैठक घेतली. शिवाय जिल्ह्यातील अनेक नागरिकांची निवेदनेही स्वीकारली.
सकाळी शरद पवार आणि चंद्रकांत पाटील एकाच विश्रामगृहात मुक्कामी असल्याने दोघांचीही भेट झाली. यावेळी पाटील यांनी शरद पवारांशी दीर्घकाळ चर्चा केली. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात सत्ताधारी पक्षाचे लोकही चार दिवसांत आपल्याला भेटले. आपण त्यांना शेतक-यांच्या प्रश्नाबाबत बोललो, पण त्यांनी आमच्या लोकांना शेतीचे काही कळत नाही, असे सूचक उत्तर दिल्याचे जाहीर सभेत सांगितले.

गुरुवार, नोव्हेंबर १६, २०१७

धनगर समाजाला ST आरक्षण मिळवून देण्यास तटस्थ - शरद पवार

धनगर समाजाला ST आरक्षण मिळवून देण्यास तटस्थ - शरद पवार



चंद्रपूर/ प्रतिनिधी:
निवडणुका आल्या की विविध राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे प्रसिध्दीकरण होते आणि विविध राजकीय पक्ष जनतेपर्यंत पोहचुन जनतेला खूष करणारी आश्‍वासने देण्याची स्पर्धा सुरू करतात. अर्थात आपण सत्तेवर आल्यानंतर काय करू हे सांगण्यात गैर करत नाही. शरद पवारांनी देखील धनगर समाजाला प्रश्न पडेल असा प्रश्न  करत आश्वासनही दिले आहे.भाजपला तुम्ही धनगर समाजाने मत दिले मात्र आश्वासनाव्यतीरीक्त तुम्हाला क़ाय मिळाले?अशी प्रतिक्रिया धनगर समाजाचे निवेदन स्वीकारताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

शरद पवार हे दोनदिवसीय चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी विविध पक्षांकडून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सोबतच धनगर समाजानेही समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी त्यांनी धनगर समाजाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुसूचित जमातीत आरक्षण मिळवून देण्यास पूर्ण तत्पर आहे व आम्ही तुम्हाला आरक्षण मिळवुन देणार आहोत. असे आश्वासनही धनगर समाजाचा पदाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी निवेदन व बैठकीस धनगर समाजाचे देवराव ठमके, प्रा. अमित ठमके, शिरीष उगे, दिनेश चामाटे, पी.जे. टोंगे, प्रामुख्याने उपस्थित होते.

मात्र पवारांनी दिलेले हे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यावर पूर्ण करेल काय की हे ही हवेतच विरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.
सत्ताधाऱ्यांना काँग्रेसची भीती वाटत आहे: शरद पवार

सत्ताधाऱ्यांना काँग्रेसची भीती वाटत आहे: शरद पवार


चंद्रपूर/प्रतिनिधी:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 2019 ची काँग्रेसच्या निवडणुकीची तयारी बघता राज्यकर्त्यांना राहुल गांधी यांची भिती वाटू लागली आहे.त्यामुळे राजीव गांधी यांच्या काळात बंद झालेल्या प्रकरणाची फाईली पुन्हा उगदून काढून काँग्रेसची प्रतिमा ऐन निवडणुकीच्या तोंडावर मलिन करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे.  ज्या इटालियन माणसावर ठपका होता तोही आता जिवंत नाही.राहुल गांधींवर बोफोर्स प्रकरणाचा ठपका ठेवण्याचा सीबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकार प्रयत्न करत आहे असा थेट आरोप पवार यांनी मेळाव्यात बोलताना केला.


शरद पवार हे दोन दिवसीय चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून स्थानिक नागपूर रोड वरील न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानात आयोजीत मेळाव्यात कार्यकर्तांना संबोधतांना म्हणाले.
पवार पुढे म्हणाले की इंदिरा गांधी यांना तुरुंगवास झाल्यानंतर  फक्त 6 महिन्यात त्यांना जनतेने पुन्हा निवडून दिले. हा घड़लेला इतिहास नरेंद्र मोदी विसरले आहेत.त्यांनी हा ईतिहास आठवावा,चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतांनाही चंद्रपूर जिल्यात मोठया प्रमाणात दारू विक्री आजही होत आहे. दारूबंदी करायची होती तर त्या संबंधी ठोस कायदे निर्माण करून केलीस असती तर बंदीतल्या दारू बंदीचा काही फायदा झाला असता. मात्र, या सत्ताधाऱ्यांनी या बंदीच्या निमित्तानं भ्रष्टाचार वाढवले आहे. सध्याची परिस्थिती पाहता हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणार असे वाटत नाही



शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर न केल्यास हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही - शरद पवार

शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर न केल्यास हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही - शरद पवार

चंद्रपूर -राज्य सरकारने फसवी कर्जमाफी केली असून रोज नवनवीन सूचना ते करत आहेत. राज्यातील सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेपूर्वी भाजपाने अनेक आश्वासने दिली. मात्र या आश्वासनांची पूर्तता करण्याऐवजी दिशाभूल करण्याचे प्रकार सुरू आहेत. असे माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 
चंद्रपूर हा कामगार व कष्टकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.    जिल्ह्यातील एकूण उद्योगांपैकी अनेक उद्योग बंद पडलेले दिसत आहेत. या समस्येकडे राज्यकर्त्यांनी वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात ही परिस्थिती अधिक बिकट होईल असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केले. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला व नंतर न्यू इंग्लिश ग्राऊंडवर त्यांचा कार्यकर्ता मेळावा पार पडला.
                        महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना ७२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. यासाठी अतिशय सोपी पद्धत वापरून शेतकºयांना न्याय दिला. मात्र भाजप सरकारने कर्जमाफीसाठी वारंवार निर्णय बदलविले. चुकीची पद्धत स्वीकारून शेतकºयांची अडचण केली. नोटाबंदी करून देशाच्या अर्थव्यवस्थेला तडा दिला. त्याचे परिणाम जनता भोगत आहे. त्यामुळे भाजपा सरकारविरूद्ध आता जनआक्रोश निर्माण होत असून या सरकारला जनता धडा शिकविणार आहे.
                      शेतकºयांच्या कर्जमाफीसंदर्भात भाजपा सरकारने अन्याय केला. कर्जमाफीचा लाभ किती शेतकºयांना झाला, हे सरकारलाच माहीत नाही. कर्जमाफीच्या प्रश्नावरून येत्या हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारण्यात येणार आहे. शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेतले नाही तर अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही खा. शरद पवार यांनी यावेळी दिला.