Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर १६, २०१७

राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर बॉल बॅडमिंटन स्पर्धेत यश


चंद्रपूर :  गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बॉल बटमिंटन (मुले) या स्पर्धेचे आयोजन दिनांक १४ ते १६ नोव्हेबर २०१७ रोजी सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत विविध महाविद्यालयांनी सहभाग दर्शविला होता. सदर स्पर्धेत राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर बॉल बॅडमिंटन मुलांचा संघ तृतीय क्रमांक पटकाविला.
या संघाला प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूरचे प्राध्यापक  विक्की तुळशीराम पेटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. बॉल बटमिंटन मुलांच्या संघात सुरज परसुटकर (कर्णधार), हर्षल क्षिरसागर, मयूर बोनमपल्लीवर, सुमेध जांभूळे, ब्रींदर सिह, आफताफ अहमद व सागर वर्मा  या खेडाळूचा समावेश होता.
     या संघाच्या यशाबद्दल राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूरचे प्राचार्य डॉ. दिलीप टिकाराम जयस्वाल शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. विक्की तुळशीराम पेटकर तसेच आदी प्राधापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.