Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर १६, २०१७

मिनी मॅरेथान स्पर्धेत आदर्श विद्यार्थी युवक मंडळातील स्पर्धकांना यश


चंद्रपूर-  शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी चंद्रपूर द्वारा आयोजित राष्ट्रमाता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी जन्म शताब्दी महोत्सव या निमित्य नुकत्याच झालेल्या वयोगट ७ ते १२ वर्षातील मिनी मॅरेथान ( मुले ) स्पर्धेत आदर्श विद्यार्थी युवक मंडळातील धावपटू मोहन सावरकर याने द्वितीय क्रमांक तसेच गणेश मोरेश्वर पारशिवे याने तृतीय क्रमांक पटकावून मंडळाचे नावलौकिक केले.

झालेल्या स्पर्धेच्या यशाबद्दल सदर स्पर्धकांचे आदर्श विद्यार्थी युवक मंडळाच्या मैदानावर मा. प्रा. सुनिल डाखोळे, मा. महादेवभाऊ कुंभारे, विजू खाडिलकर, कैलाश किरडे व प्रा. विक्की पेटकर यांच्या हस्ते हार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात मंडळातील कबड्डी खेडाळू सुनील झोडे, पदमवीर यादव, तन्मय तोडसे, सुरज परसूटकर, संग्राम डाखोळे, कैलाश कामातवार, भारत कामतवार, नयन कुंभारे, मनोज जसराम, शुभम ठाकूर, हर्षल क्षीरसागर, प्रसाद चट्टे, आशिष कायरकर इत्यादी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.