Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शनिवार, ऑक्टोबर २७, २०१८
रविवार, डिसेंबर १०, २०१७
लाटणे मोर्चा घेऊन मुन्ना यादवला पकडून देऊ
#हल्लाबोल पदयात्रेच्या नवव्या दिवशी बुटीबोरीकडे मार्गक्रमण करताना आसोलाजवळ #धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. खासदार @supriya_sule यांना शाल-श्रीफळ भेट देत धनगर समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी त्यांनी केली. |
बुटिबोरी सभा- राष्ट्रवादी हल्लाबोल
बुटिबोर/ प्रतिनिधी -
मुन्ना यादवला अटक होत नाही याला जबाबदार
मा. शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा मी दरवर्षी हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरला येत असे. मी लहान होते तरीही नागपूरमध्ये फिरताना कधीच भीती वाटली नव्हती. पण आता नागपूरमध्ये महिलांना सुरक्षित वातावरण वाटत नाही, असेही त्या म्हणाल्या
या सरकारने शिवस्मारकाच्या भूमिपूजनावर पाच कोटी खर्च केले. तेच पैसे जर स्मारकासाठी खर्च केले असते तर आतापर्यंत काम चालू झाले असते.
राज्य सरकार जाहिरातींवर वारेमाप खर्च करत असल्याची बाब समोर आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील स्मारकाची जाहिरात जोरात केली. मात्र दोन्ही स्मारकांचे काम सुरू झालेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका गोष्टीसाठी दाद द्यावी लागेल. ते सफाईनं खोटं बोलतात. 'मी लाभार्थी'च्या कॅम्पेनमध्ये सर्व खोट्या जाहिराती केल्या गेल्या होत्या. त्यामुळेच ते कॅम्पेन बंद करावे लागले. विदर्भात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. इथल्या महिलांची पांढरी कपाळं पाहून पोटाला पिळ बसतो. मला प्रश्न पडलाय इतकं सगळं विदर्भात होत असताना मुख्यमंत्र्यांना झोप तरी कशी लागते, असा हल्ला त्यांनी चढविला.
हल्लाबोल पदयात्रेच्या निमित्ताने गेले नऊ दिवस आम्ही विदर्भाचे हाल पाहत आहोत. दुष्काळ, अवकाळी पाऊस यामुळे झालेले नुकसान नैसर्गिक असते. मात्र विदर्भात सरकारच्या नाकर्त्या वृत्तीमुळे अनेक संकटे उभी राहिली आहेत.
-@supriya_sule#हल्लाबोल बुटिबोरी सभा
फसव्या योजना आणि@narendramodi यांचा फोटो जनतेला दाखवण्यासाठी@BJP4India ने साडेतीन हजार कोटी खर्च केले आहेत.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis यांनीही ३५० कोटी जाहिरातींवर खर्च केले.
-@Jayant_R_Patil#हल्लाबोल बुटिबोरी सभा
नोटाबंदीनंतर जीएसटीचा झटका सरकारने दिला. सुरुवातीला जीएसटी कसा भरायचा हे व्यापाऱ्यांना न कळल्यामुळे व्यवहार करणेच त्यांनी बंद केले होते. -
बोंड अळीचे संकट नैसर्गिक असले तरी हा प्रश्न सोडवता आला असता. योग्य वेळीच बियाणे तपासून बदलले गेले असते तर आज विदर्भातील जनतेला अश्रू ढाळण्याची परिस्थिती आली नसती.
कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न आहे. ज्यांच्यावर रक्षण करण्याची जबाबदारी आहे ते पोलिसच माणसांना जाळून मारत असतील तर सामान्य जनतेने कुणाकडे न्याय मागायचा? त्यामुळे जनतेने आता १२ डिसेंबर रोजी नागपूर येथे
विदर्भातील लोकांचा भ्रमनिरास झालाय. शेतकरी देशोधडीला लागलाय. बेरोजगारी वाढली. जुन्याजाणत्या लोकांना माझं सांगणं आहे की विदर्भातील जनता एकटी नाही. सर्व महाराष्ट्र विदर्भातील जनतेच्या पाठीशी उभी आहे. त्यासाठीच हा
मंगळवार, डिसेंबर ०५, २०१७
भाजपने जनतेचा विश्वासघात केला
विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे*
वर्धा/प्रतिनिधी - विश्वासाने जनतेने भाजपला निवडून दिले परंतु या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहेच शिवाय शेतकरी राजाही उध्वस्त करण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सेलसुरा जिल्हा वर्धा येथील सभेत केला.
विदर्भामध्ये पदयात्रेमधून जात असताना जनता या सरकावर रोष व्यक्त करत आहेत. कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीने त्रस्त झाला आहे. मोदी सरकारने जाहीर केलेल्या मुद्रा योजनेचा लाभही इथल्या जनतेला मिळालेला नाही. सगळयाच बाबतीत सरकार अपयशी ठरत असून सर्वसामान्य जनता असंतोष व्यक्त करताना दिसत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेवर होणारा अन्याय सहन करणार नाही.सरकारला जाब विचारण्यासाठीच आम्ही हा एल्गार पुकारला असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार विदया चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, सुरेखा ठाकरे आदींसह स्थानिक ग्रामस्थ,शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. आज एकूण 14 किलोमीटर प्रवास करून संध्याकाळी यात्रा वर्धा येथे जाणार आहे.
#हल्लाबोल मोर्चाच्या आजच्या पाचव्या दिवसाची सुरुवात देवली येथून झाली. एका जिनिंग मध्ये जाऊन शेतक-यांशी संवाद साधला. सरकारची कापूस खरेदी केंद्र आणखी सुरू झाली नसल्याने बेभावाने व्यापा-यांना कापूस विकावा लागत असल्याच्या तक्रारी शेतक-यांनी केल्या.
गुरुवार, नोव्हेंबर ३०, २०१७
शुक्रवारपासून हल्लाबोल पदयात्रा
यवतमाळ - नाकर्त्या सरकारविरुद्ध जनतेचा रोष व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 1 डिसेंबर पासून सुरु होत असलेल्या यवतमाळ ते नागपूर हल्लाबोल पदयात्रेची माहिती देण्यासाठी आज यवतमाळ येथे आदरणीय खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्यासह पत्रकारांशी संवाद साधला. ही यात्रा विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर या 3 जिल्ह्यातून जाऊन 12 डिसेंबर रोजी नागपूरच्या विधानभवनावावर धडकणार आहे.
राज्याचे कृषी खाते झोपले आहे. बोंडअळीच्या संकटासंदर्भात सरकारला कळवूनही दखल घेतली नाही. या संकटास राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री हेच जबाबदार आहेत.
बोंडअळीच्या संकटामुळे मराठवाडा आणि विदर्भात कापूस उत्पादक शेतक-यांचे 25 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या भरपाई पोटी शेतक-यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे.
गुरुवार, नोव्हेंबर १६, २०१७
सत्ताधाऱ्यांना काँग्रेसची भीती वाटत आहे: शरद पवार
चंद्रपूर/प्रतिनिधी: