Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जून २१, २०१४

रेल्वे मालधक्क्यावरील कंत्राट रद्द करा

प्रहार संघटनेची मांगणी

चंद्रपूर रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्यावर आलेले धान्याची पोती पाऊस सुरु असतांना जमिनीवर ठेवण्याचा प्रकार दि.१७ जून रोजी निर्देशनास आला. ओल्या धान्याची पोती गोदामात ठेवल्यानंतर हे धान्य सडते. गोर-गरिबांकरिता आलेले हे सडलेले धान्य चांगल्या धान्यात भेसळ करण्याचा गैरप्रकार यामुळे घडतो. या सर्व प्रकारासाठी धान्याची वाहतूक करणारा कंत्राटदार जबाबदार असल्यामुळे सदर कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात यावे अशी मांगणी प्रहार संघटनेने केलेली आहे.
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चे प्रादेशिक व्यवस्थापक यांना चंद्रपूर चे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे सदर मागणी केलेली आहे. सविस्तर माहिती अशी कि चंद्रपूर रेल्वे स्थानकावरील मालधक्क्यावर मालगाडी द्वारे धान्य आणण्यात येते. मालधक्क्यावर आलेले धान्य सरळ ट्रक मध्ये उतरवून एफसीआय च्या पडोली येथील गोदामात पोहोचविण्यात येते. या धान्य वाहतुकीचे कंत्राट घेतांना वाहतुकीचे पुरेसी क्षमता दाखवावी लागते. मात्र कागदोपत्री खोटी क्षमता दाखविल्यामुळे धान्य वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची शंका निर्माण झालेली आहे. त्यातूनच ओल्या जमिनीवर धान्याची पोती ठेवण्याचा नियामाबाध्य प्रकार वारंवार घडत असतो. सदर प्रकार थांबविण्याकरिता संबंधित कंत्राटदाराची चौकशी करून दोषी आढळल्यास कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात यावी अशी मागणी प्रहारच्या शिष्टमंडळाने केलेली आहे.
शिष्टमंडळामध्ये प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख, शहर अध्यक्ष सतीश खोब्रागडे, घनश्याम येरगुडे, कार्तिक जोया, इमदाद शेख, गणेश गौरकार, नजर खान पठाण इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.