चंद्रपूर : रेल्वेमालगाडीच्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह |
चंद्रपूर : मंगळवारी सकाळी 6.30 च्या सुमारास घुघुस येथील डब्ल्यूसीएल वणी परिसरातील न्यू कोल रेल्वे साइडिंग येथील चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन येथून रेल्वे मालगाडीचे इंजिन (रेल्वे ट्रेन इंजिन Railway engine chandrapur) आले. या मालगाडीच्या इंजिनावर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने घुग्घुस रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे.
Read Breaking News : बल्लारपूर रेल्वे स्थानकावर मालगाडी रुळावरून घसरली Ballarpur railway station
प्राप्त माहितीनुसार मंगळवारी सकाळी 6.30 वाजता चंद्रपूर येथील सीएसटीपीएस पॉवर हाऊस येथून मालगाडी आली, त्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह दिसला. रेल्वेच्या हाय टेंशन इलेक्ट्रिक वायरच्या कचाट्यात येऊन या बिबट्याचा मृत्यू झाला. चंद्रपूरचे सीएसटीपीएस Chandrapur Super Thermal Power Station ताडोबाच्या TATR जंगलाला लागून आहे. येथे अनेक प्रकारचे वन्य प्राणी वावरत असतात. सीएसटीपीएस परिसरातही हा बिबट्या घुसला. याआधीही सीएसटीपीएसच्या गर्द जंगलात अनेक वन्य प्राणी दिसले होते. या घटनेच्या संदर्भात घुग्घुस रेल्वे स्थानकाचे अधिकारी राजेश सिंह यांनी माध्यम प्रतिनिधीकडे घटनेला दुजोरा दिला. Railway Train Engine #Chandrapur #LatestNews #Leopard
चंद्रपूर : रेल्वेमालगाडीच्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह Railway engine #Chandrapur #LatestNews #Leopard https://t.co/JSnQ2IKfV6 https://t.co/wyOXknDtBy
— खबरबात™ | 𝐊𝐡𝐚𝐛𝐚𝐫𝐛𝐚𝐭™ (@khabarbat) March 7, 2023
बल्लारपूर रेल्वे स्थानकावर मालगाडी रुळावरून घसरली A goods train derailed at Ballarpur railway station https://t.co/1dTZsox0sq https://t.co/xTSLcIekzf
— खबरबात™ | 𝐊𝐡𝐚𝐛𝐚𝐫𝐛𝐚𝐭™ (@khabarbat) March 6, 2023