Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च ०१, २०२३

ताडोबा सफारीत स्थानीकांना सुट...... | Tadoba Andhari TATR

ताडोबा सफारीत स्थानीकांना सुट देण्याची मागणी

अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदार संघातील विविध मुद्यांकडे वेधले सभागृहाचे लक्ष


औद्योगिक जिल्ह्याना 200 युनिट विज मोफत दया्,



चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. मात्र यातुन होणाऱ्या प्रदुषणामुळे येथील नागरिक त्रस्त आहे. त्यामुळे हे औद्योगीकरण अभिशाप न ठरता आमच्यासाठी वरदान ठरावे असे नियोजन करण्यात यावे, चंद्रपूर येथील ताडोबा अभ्यारण्यासह टायगर रिजर्व फाॅरेस्ट असणा-र्या जिल्ह्यातील नागरिकांना तेथील अभयारण्यात जाण्याकरीता सुट देण्यात यावी अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. Tadoba Andhari TATR




मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. काल या अधिवेशनाच्या दुस-र्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणाला समर्थन करतांना ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहु महाराज, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या थोरांच्या विचारांवर चालणारे हे राज्य आहे. महराष्ट्राला मोठी पंरपरा आहे. मात्र राज्यातील अनेक जिल्हात या महापूरुषांचे स्मारक नाहीत. त्यामुळे ही स्मारके या जिल्ह्यात उभारण्यात यावी. अशी मागणी यावेळी बोलतांना त्यांनी केली आहे. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर आणि चंद्रपूर या दोनच ठिकाणी दिक्षा दिली. या दोनही दिक्षाभुमींचा विकास करत दोनही ठिकाणी सुदंर स्मारक तयार करण्यात यावे, प्रधानमंत्री आवाज योजना ही उत्तम आहे. मात्र यात त्रृती आहे. चंद्रपूर शहरात नजुल च्या जागेवर राहणाऱ्या नागरिकांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या योजनेतील घर पट्टयाची अट रद्द करण्यात यावी, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक वनांसह वन्य प्राण्यांचे रक्षण करणारे आहे. पंरतु दुर्दैवाने येथील ताडोबा अभ्यराण्यातील महागड्या दरामुळे चंद्रपूरातील व्यक्ती येथे जाऊउ शकत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना यात सुट देण्यात यावी, चंद्रपूर जिल्ह्याला औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखल्या जात. मात्र यातुन होणारे प्रदूषण धोकादायक आहे. त्यामुळे राज्याच्या उत्पन्नात भर टाकणाऱ्या औद्योगिक जिल्ह्यांना सवलती, सुविधा देण्याची आवश्यकता आहे.




विज उत्पादक जिल्ह्यामध्ये विजेचे दर कमी असले पाहिजे. येथे सोयी सुविधा अधिक असल्या पाहिजे. पाणी कर कमी असला पाहिजे अशा योजना या जिल्हांना देण्यात याव्यात, औष्णिक विज निमिर्ती करत असतांना आम्हाला प्रदुषणाचा मोठा त्रास सहण करावा लागत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यासह विज उत्पादक जिल्ह्यांना घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी 3 हजार मोटर सायकलचा मोर्चा आम्ही नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर आणला होता. हे ही आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलतांना सभागृहाच्या लक्षात आणून दिले. पूरातत्व विभागाच्या वतीने येथील अनेक विकास कामांना अडविल्या जात आहे. माता महाकाली मंदिराच 500 हुन अधिक जुने मंदिर चंद्रपूरात आहे. मात्र येथील विकास कामांना पुरातत्व विभाग अडचण आणत आहे. याकडे सुध्दा यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले Tadoba Andhari TATR


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.