शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) :
भद्रावती शहरातून पाच कि मी अंतरावर वसलेल्या आयुध निर्मानी चांदा येथील सेक्टर ५ मध्ये सायंकाळच्या सुमारास फिरायला निघालेल्या एका महिलेवर हमला करून जखमी करणारा बीबट गुरुवार दि.२ मार्चच्या पहाटे पावणे ५ वाजताच्या सुमारास लाऊन ठेवलेल्या पिंजऱ्यात अखेर जेरबंद झाला. सदर बिबट्याला चंद्रपूरच्या सिटीसी केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचारानंतर त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याची कारवाई होईल.
दि.२० फेब्रुवारीला सायंकाळी आयुध निर्मानी चांदाच्या वसाहतीतील विमलादेवी टीकाराम या ४२ वर्षीय महिलेवर बिबट्याने हमला करून गंभीर जखमी केले होते.त्यासाठी वनविभागाने सेक्टर पाच मध्ये वेगवेगळ्या तीन ठिकाणी पिंजरे लावले होते.त्या महिलेवर हमला करणारा बिबत गुरुवार दि.२ मार्चच्या पहाटे ४:४५ वाजताच्या सुमारास अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाला. सदर बिबात हा दीड वर्षाचा असून मादा प्रजातीचा आहे.त्याला काही ठिकाणी जखमा असल्याने चंद्रपूरच्या सीटीसी केंद्रात उपचारासाठी रवाना केले.उपचारानंतर त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे.
सदरची कारवाई सहा.वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे,वनपरिक्षेत्र अधिकारी एच.पी.शेंडे,वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले,क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे,वनरक्षक धनराज गेडाम यांनी केली.