Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
गुरुवार, एप्रिल ०१, २०२१
गुरुवार, मार्च २५, २०२१
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
My heart felt gratitude to the people of Maharashtra for conferring upon me the highest level of honour the state can award to an individual - the Maharashtra Bhushan Award.
— ashabhosle (@ashabhosle) March 25, 2021
Eternally grateful 🙏🏼
Jai hind. Jai Maharashtra pic.twitter.com/1WWejGSSiQ
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आशा भोसले यांचं संगीत क्षेत्रात मोठं योगदान आहे. त्यांनी असंख्य मराठी आणि हिंदी गाणी गायली आहेत. प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समितीची बैठक झाली. मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले
आशा भोसले (८ सप्टेंबर, इ.स. १९३३ - हयात) या लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह हिंदी आणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे.
सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही; तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही: त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही असे म्हटले जाते.
बालपण
आशा भोसले यांचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असून त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला. ते कलाकार आणि गायक होते.[१] लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आदी भावंडांचे मार्गदर्शन व त्यांची साथ या सगळ्यांतून आशाताईंचा गळा घडत गेला. दीनानाथ मंगेशकरांचे वडील कऱ्हाडे ब्राह्मण आणि आई देवदासी होत्या. अशा अपत्यांना आता गोमंतक मराठा म्हणतात.
कारकीर्द[संपादन]
आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या चित्रपटातून केली. १९५० च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक गाणी गायली खरी, पण ते चित्रपट विशेष गाजले नाहीत. त्या काळात हिंदी चित्रपटसंगीतावर लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका राज्य करत होत्या. त्यामुळे आशाताईंना संधी मिळणे अवघड होते. या गायिकांच्या राज्यात राहून, गाऊन, आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचे, स्वतःला सिद्ध करण्याचे फार मोठे आव्हान आशाताईंपुढे होते. या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी, मुलांची जबाबदारी, प्रतिकूल परिस्थिती या सगळ्या विपरीत घटकांशी सामना करत करत आशाताईंनी ते आव्हान स्वीकारले आणि ते स्वबळावर, आत्मविश्वासाने यशस्वीपणे पेलून दाखवले.
इ.स. १९५७- इ.स. १९५८ हे वर्ष आशा भोसले यांचेच होते. सचिन देव बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. कालाबाजार, लाजवंती, नौ दो ग्यारह, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे असंख्य चित्रपट त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले. पुढची पाच दशके आशाताईंनी गाजवली. अनेक संगीतकारांबरोबर काम केले. अनेक कवींच्या काव्यरचनांना सुरांचे कोंदण दिले. एवढेच नाही तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना, त्यांतल्या अभिनेत्रींनादेखील अजरामर केले.
ओ. पी. नय्यर आणि आशाताई एक अफलातून जोडी होती. इ.स. १९६० च्या सुमारास नय्यर यांचे संगीत असणारे ‘ऑखोसे जो उतरी है दिलमे’ (फिर वही दिल लाया हूॅं ) हे गाणे; इ.स. १९६५ चे जाइये आप कहॉं (मेरे सनम); इ.स. १९६८ मधील वो हसीन दर्द देदो (हम साया); चैन से हमको कभी - अशी अनेक प्रसिद्ध गाणी त्यांनी गायली.
राहुल देव बर्मन यांच्याबरोबर काम करताना पिया तू अब तो आजा हे इ.स. १९७१ चे कारवॉं चित्रपटातील गीत, इ.स. १९७१ चेच फिल्मफेअर पुरस्कार विजेते ‘दम मारो दम’; ‘जाने जा’ हे इ.स. १९७२ चे जवानी दिवानीतले गाणे, ही गाणी आशा भोसलेंच्या आवाजाचा नवा बाज दाखवून गेली. इ.स. १९८१ चा ‘उमराव जान’ हा चित्रपट आशाताईंमधली गझल गायिका रसिकांसमोर घेऊन आला. आशाताईंचा आवाज, खय्याम यांचे संगीत आणि दिल चीज क्या है, इन ऑंखोंकी मस्तीसारखी शब्दरचना हे सगळेच जमून आले. ‘दिल चीज क्या है’ या गीताला इ.स. १९८१ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे ‘इजाजत’ चित्रपटातल्या ‘मेरा कुछ सामान’ या त्यांच्या गाण्यालाही इ.स. १९८६ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
हिंदीबरोबर आशा भोसलेंची मराठी गाण्यांची कारकीर्द बहरतच होती. सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा गायक-गायिकांबरोबरची गाणी मराठी रसिकमनात घर करून राहिली आहेत. बा. भ. बोरकर, आरती प्रभू, ग. दि. माडगुळकर, शांता शेळके, सुरेश भट, सुधीर मोघे यांच्या कवितांबरोबर सौमित्रसारख्या नव्या दमाच्या कवींच्या कविताही आशाताईंच्याच आवाजात रसिकांपुढे आल्या. सर्व कवींच्या शब्दांना आशाताईंनी सुरेल न्याय दिला. तरुण आहे रात्र अजुनी, जिवलगा राहिले रे दूर, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे, गेले द्यायचे राहूनी, गंध फुलांचा गेला सांगून, आज कुणीतरी यावे, एका तळ्यात होती - अशा लोकप्रिय गीतांची यादी प्रचंड आहे. ‘रेशमाच्या रेघांनी’तला लावणीचा ठसका, ‘सैनिक हो तुमच्यासाठी’तला कृतज्ञता भाव, ‘केव्हा तरी पहाटे’तली हुरहुर, ‘जे वेड मजला लागले’ची गोडी, सगळेच विलक्षण!
त्यांनी ज्यांच्यासाठी गाणी गायली ते संगीतकार, ते गीतकार, त्या अभिनेत्री आणि आशा भोसलेंचा आवाज - या सर्वांच्या परस्परसंबंधांचे संख्यात्मक व गुणात्मकदृष्ट्या वर्णन करणे हे एक अशक्यप्राय काम आहे. त्याचबरोबर आशाताईंनी गायलेली चित्रपटगीते (मराठी, हिंदी व अन्य भाषांतील), भावगीते, गझल, भजने-भक्तिगीते इत्यादी गाण्यांची व संबंधित चित्रपटांची केवळ यादी करायची ठरवली, तरी ते एक आव्हानात्मक काम आहे.
हिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशा भोसले यांनी एस.डी.बर्मन यांच्यापासून ते ए.आर. रहमानपर्यंतच्या विविध कालखंडांतील, अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले आहे. मराठीतही दत्ता डावजेकर-श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साज चढवला आहे. मधुबाला-मीनाकुमारीपासून ते अलीकडच्या तब्बू-उर्मिला मातोंडकर-ऐश्वर्या रायपर्यंतच्या अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांनी मोहम्मद रफी, किशोर कुमार व सुधीर फडके यांच्याबरोबरचा काळ तर गाजवला आहेच, तसेच त्या आज हृषीकेश रानडे सारख्या तरुण गायकाबरोबरही गात आहेत. आशाताई आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांशी गायिका म्हणून जोडल्या गेल्या आहेत. तसेच त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत.
नाच रे मोरा, आईए मेहेरबॉं, दिव्य स्वातंत्र्य रवी (नाट्यगीत), तनहा तनहा यहॉं पे जीना, जिवलगा राहिले रे दूर घर माझे, रंग दे मुझे रंग दे, सांज ये गोकुळी, जानम समझा करो, मागे उभा मंगेश... ही ‘रेंज’च अफाट आहे, हा आवाकाच अविश्वसनीय आहे. उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीते, मराठी-हिंदी चित्रपट गीत्गे, नाट्यगीते, गझली, लावण्या, डिस्को-रॉक-पॉप गाणी, अन्य भाषांतील गाणी - अशा सर्वच प्रकारच्या संगीतामध्ये आशाताई आजही तेवढ्याच ताकदीने गाऊ शकतात.
कॅनडा, इंग्लंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, स्वीडन आदि अनेक देशांत झालेले कार्यक्रम, परकीय संगीतकारांबरोबर केलेले काम, ‘राहुल ॲंड आय’ सारखा अल्बम, लेस्ली लुईसबरोबरचे काम असे अनेक नवनवे प्रयोग आशाताई आजही करतात. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली, अभिनेता संजय दत्त यांच्याबरोबर गाण्याचा प्रयोग केला. ‘आशा ॲंड फ्रेन्ड्स’ या अल्बमचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. अभिजात संगीत कलेला जसे स्थळ-काळ-वेळाचे बंधन नाही, तसेच आशाताईंच्या आवाजालाही या कशाचेच बंधन नाही.
आशा भोसले या मंचावरून एक ‘उत्कृष्ट परफॉर्मर’ म्हणून रसिकांसमोर येतातच, पण त्या स्वयंपाकाची आवड असलेल्या, मुलांना सांभाळणार्या एक परिपूर्ण गृहिणी आहेत; क्रिकेटच्या दर्दी रसिक असलेल्या भारतीय नागरिक आहेत. एवढे यश, मानसन्मान मिळूनही पाय घट्टपणे जमिनीवरच असलेल्या, साधी राहणी असलेल्या स्त्री-कलाकार आहेत. इतर मंगेशकर भावंडांप्रमाणेच त्यांना वडिलांचा (दीनानाथांचा) अभिमान आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जुना काळ, प्रचंड कष्ट, धडपड, जुने सहकारी (सहगायक, संगीतकार, गीतकार, सहवादक, स्टुडिओतील कर्मचारी ... इत्यादी) या गोष्टी न विसरणाऱ्या, किंबहुना आवर्जून लक्षात ठेवणाऱ्या आशाताई ह्या एक ‘संवेदनशील माणूस’ आहेत.
पुरस्कार
राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार आणि नुकताच इ.स. २००८ मध्ये मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार- हे पुरस्कार आशा भोसलेंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये देण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला.
रविवार, मार्च २१, २०२१
राजस्थान सरकारने जपलाय शिवरायांचा "हा" अमूल्य ऐतिहासिक ठेवा
मंगळवार, फेब्रुवारी ०९, २०२१
बांगलादेशच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट
‘बंगाबंधू’ सिनेमामुळे महाराष्ट्र आणि बांग्लादेशमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होणार
- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
मुंबई दि. 8: बांग्लादेशाचे राष्ट्रपिता श्री. शेख मुजिबुर रेहमान यांच्या जीवनावर आधारीत 'बंगाबंधू' सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. या सिनेमाचे चित्रीकरण सध्या दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे सुरु असूनन या सिनेमाच्या निर्मितीमुळे महाराष्ट्र आणि बांग्लादेशमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला.
बांग्लादेशचे माहिती मंत्री डॉ. हसन महमूद यांनी गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट दिली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासह बांग्लादेशचे शिष्टमंडळ उपस्थित होते. या शिष्टमंडळात बांग्लादेशचे खासदार शाल्मुम सरवर कमाल, बांग्लादेशचे भारतातील उप उच्चायुक्त मु. लुत्फर उपस्थित होते. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन.के.व्यास, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा, सह व्यवस्थापकीय संचालक आंचल गोयल यांच्यासह दादासाहेब फाळके चित्रनगरीचे अधिकारी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, दादासाहेब फाळके चित्रनगरीत सध्या 'बंगाबंधू' या सिनेमाचे चित्रीकरण सुरु असून या सिनेमामध्ये बांग्लादेशचा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यनंतरचा इतिहास दाखविला जाणार असून या सिनेमाचे दिग्दर्शन श्याम बेनेगल करीत आहे. विशेष म्हणजे भारत आणि बांग्लादेश यांच्या संयुक्त विद्यमाने या सिनेमाची निर्मिती करण्यात येत असून राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ हे या सिनेमाची निर्मिती करीत आहेत.या सिनेमाचे चित्रीकरण कोलकाता आणि मुंबई येथे होत असून या सिनेमामुळे महाराष्ट्र आणि बांग्लादेशमधील सांस्कृतिक संबंध दृढ होण्यास मदत होणार आहे.
‘बंगाबंधू’मुळे महाराष्ट्राबरोबरची घनिष्ठता वाढेल -- डॉ. हसन महमूद
भारत आणि बांग्लादेश यांची नैसर्गिक मैत्री असून दोन्ही देशांना ऐतिहासिक वारसा आहे. भारत आणि बांग्लादेश दरम्यान उद्योग, सांस्कृतिक आणि वाणिज्यिक चांगले संबंध आहेत. 'बंगाबंधू'सिनेमामुळे बांग्लादेशची महाराष्ट्राबरोबरची घनिष्ठता वाढेल असा विश्वास यावेळी डॉ.हसन महूमूद यांनी व्यक्त केला. या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या चित्रनगरी येथे कार्यरत असलेल्या एक खिडकी प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आल्याचा आनंदही डॉ. महमूद यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्र भेटीवर आलेल्या बांग्लादेश शिष्टमंडळाने यावेळी 'बंगाबंधू' सिनेमाचे दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि या सिनेमाच्या कलाकारांसमवेत संवाद साधला. याशिवाय चित्रनगरी येथे उभारण्यात आलेल्या अद्ययावत मेकअप रुम संकुलाचा शुभारंभ केला तसेच चित्रनगरी येथील मंदिर आणि काही चित्रीकरण स्थळे पाहिली.
गुरुवार, फेब्रुवारी ०४, २०२१
त्यात्या विंचूला 'ओम भट स्वाहा' महामृत्युंजय मंत्र देणारे बाबा चमत्कार देवाघरी
झपाटलेला चित्रपटात ‘बाबा चमत्कार’ ही भूमिका साकारणारे अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
बाबा चमत्कारने त्यात्या विंचूला दिलेला 'ओम भट स्वाहा' हा मृत्यूंजय मंत्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
राघवेंद्र कडकोळ यांनी ब्लक अँड व्हाईट, गौरी, सखी, कुठे शोधू मी तिला, पळवापळवी, वाजवू का?, पंढरीची वारी या चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. तसेच करायला गेलो एक, धोंडी, देवदासी, हसुया पण कायद्याच्या कचाट्यात, रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकांत काम केले आहे.
राघवेंद्र कडकोळ यांनी तीस वर्षे मराठी नाटक-चित्रपट, मालिकांतून काम केले. राघवेंद्र यांनी कृष्णधवल चित्रपटांपासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. कर्नाटकी लहजा काढत बोलणाऱ्या भूमिकाच त्यांच्या वाटेला अधिक आल्या.
बालगंधर्व जीवन पुरस्काराने गौरव
राघवेंद्र कडकोळ यांना बालगंधर्व जीवन पुरस्कार आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे 'नटवर्य केशवराव दाते पुरस्काराने' गौरवण्यात आले होतं. त्यांनी गोल्ड मेडल नावाचे पुस्तक लिहिले आहे.
मंगळवार, फेब्रुवारी ०२, २०२१
लक्ष्मीकांत बेर्डेच्या मुलीने त्या मुलासोबतचे फोटो केले डिलीट; ‘लक्ष्या’ची मुलगी सध्या करते तरी काय?
सगळ्यांना खळखळून हसविणाऱ्या या विनोदाच्या बादशहाने १६ डिसेंबर २००४ साली जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानामुळे आजही ते साऱ्यांच्या स्मरणात आहेत. ‘अशी ही बनवा बनवी’पासून ते अगदी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटापर्यंत आपल्याला लक्ष्मीकांत बेर्डे यांची वेगळी रुपं पाहण्याची संधी मिळाली. मुख्य म्हणजे आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता कधी सर्वांचा आवडता ‘लक्ष्या’ झाला हे लक्षातही आलं नाही.
- अभिनेत्री प्रिया बेर्डेंसोबत लक्ष्मीकांत यांनी दुसरे लग्न केले. या जोडीने अनेक मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते. तसेच हिंदी चित्रपटातसुद्धा हे दोघे एकत्र झळकले होते.
- अभिनय आणि स्वानंदी ही प्रिया-लक्ष्मीकांत यांच्या मुलांची नावे आहेत. अभिनयने ती सध्या काय करते या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. तर धाकटी मुलगी स्वानंदी 17 वर्षांची असून तिचे महाविद्यालयीन शिक्षण सुरु आहे.
सोमवार, फेब्रुवारी ०१, २०२१
अभिनेते अतुल कुलकर्णी केली निवृत्तीची घोषणा ! का घेतला हा निर्णय?
मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. क्वेस्ट (QUEST) या सामाजिक संस्थेतून निवृत्त होत आहेत. फेसबुकवर पोस्ट लिहीत त्यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.
त्यांना हे राम चित्रपटातील श्रीराम अभ्यंकर ही व्यक्तिरेखेच्या निरुपणाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय पेज थ्री व रंग दे बसंती या चित्रपटांतील त्यांच्या भुमिकांनाही चिकित्सकांकडून दाद मिळाली. विविध मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. मातीमाय हा त्यांचा चित्रपट टोरोंटो चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. रंग दे बसंती या चित्रपटामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी लाभली.
बेळगावमध्ये जन्मलेल्या अतुलने दहावीपर्यंतचे शिक्षण हरिभाई देवकरण हायस्कूल, सोलापूरमध्ये पूर्ण केले. त्यांचे आईवडिल सोलापूरला स्थिरस्थावर झाले. १२वी बेळगावमध्ये पूर्ण करून तेथील अभियांत्रीकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. पण आभियांत्रिकीमध्ये मन न रमल्यामुळे नंतर सोलापुरातील डी.ए.वी.महाविद्यालयातून इंग्रजी सहित्य या विषयात बी.ए. पूर्ण केले.
शालेय व महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी सांस्कृतीक कार्यक्रमातील नाटकात काम करणे सुरू केले होते. त्याचवेळी सोलापुरातील "नाट्य आराधाना" नावाच्या हौशी नाट्यसंस्थेचे सदस्यही बनले. दोन वर्षे पडद्यामागे काम केल्यानंतर त्यांना नट म्हणून काम करण्याची संधी मिळाली व त्याच्यातच कारकिर्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १९९२ मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली मध्ये प्रवेश घेतला. १९९५ साली पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ईन ड्रॅमाटीक आर्ट्स ही पदवी मिळवली
अभिनेत अतुल कुलकर्णी यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन 2007 रोजी शिक्षण क्षेत्रात काम करण्याच्या हेतूने ही संस्था स्थापन केली होती. स्थापनेपासून अतुल कुलकणी या संस्थेचे अध्यक्ष होते. पण आता त्यांनी या संस्थेतून निवृत्त होत असल्याचे जाहिर केले आहे.
‘गणितात एक सिग्मॉइड कर्व्ह नावाचा सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार, जेव्हा सर्व काही छान चाललेलं असतं आणि तुम्ही एखाद्या गोष्टीच्या शिखरावर असता, तेव्हाच तुम्ही ‘एक्झिट’ घ्यायला हवी. माझा या सिद्धांतावर विश्वास आहे. शिवाय आपल्या कडच्या ‘आश्रम’ या व्यवस्थेवरही माझा विश्वास आहे. सध्या मी हळूहळू माझ्या आयुष्याच्या वानप्रस्थाकडे प्रवास सुरू केला आहे, असे लिहित अतुल यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे.
नवे अध्यक्ष मनोज कार्येकर यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे!
मनापासून अभिनंदन आणि खूप, खूप शुभेच्छा !!!! Manoj Karyekar, President, QUEST ! Heartiest Congratulations and all the very BEST !!!शनिवार, जानेवारी १६, २०२१
#GOVA : FESTIVAL ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विश्वजीत चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर पुरस्काराची घोषणा
पणजी, 16 जानेवारी 2021
गोवा इथल्या 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, हिंदी आणि बंगाली चित्रपटांचे गायक विश्वजीत चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर पुरस्काराने गौरवण्यात येईल असे माहिती प्रसारण मंत्री श्री प्रकाश जावडेकर म्हणाले.
मार्च 2021 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
बीस साल बाद चित्रपटातल्या कुमार विजय सिंग,कोहरा मधल्या राजा अमित कुमार सिंग,एप्रिल फुल मधल्या अशोक, मेरे सनम मधल्या रमेशकुमार, नाईट इन लंडन मधला जीवन, दो कलिया मधल्या शेखर आणि किस्मतमध्ये त्यांनी साकारलेल्या विकीच्या भूमिकेला रसिकांची मोठी पसंती मिळाली. आशा पारेख, वहिदा रेहमान, मुमताज,माला सिन्हा आणि राजश्री या प्रख्यात अभिनेत्रीसमवेत त्यांनी चित्रपटात भूमिका केल्या. त्यांच्या बंगाली चित्रपटांमध्ये चौरीन्घी (1968), उत्तम कुमार यांच्यासमवेत गढ नसीमपूर, कुहेली आणि त्यानंतर श्रीमान पृथ्वीराज (1973),जय बाबा तारकनाथ (1977) आणि अमर गीती (1983) यांचा समावेश आहे. 1975 मध्ये विश्वजीत यांनी ‘कहते है मुझको राजा’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिगदर्शन त्यांनी केले. अभिनय आणि दिग्दर्शनाबरोबरच गायक आणि निर्माता म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
#GOVA मनोवेधक सांस्कृतिक कार्यक्रमांसह 51 व्या इफ्फीचा गोव्यात शानदार शुभारंभ
शेख मुजीबूर रेहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित, भारत आणि बांगलादेशकडून एकत्रितरीत्या ‘बंगबंधू’ या विशेष चित्रपटाची निर्मिती : केंद्रीय मंत्री प्रकश जावडेकर
‘आपल्या कामावर प्रेम करा, आपण जर एखाद्या गोष्टीवर प्रेम केले आणि विश्वास ठेवला तरच आपण ते ध्येय साध्य करू शकतो’- इफ्फी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यावर इटालियन सिनेमॅटोग्राफ्रर व्हिक्टोरियो स्टोरारो यांचा संदेश
पणजी, 16 जानेवारी 2021
चित्रपट रसिक आणि समीक्षक दरवर्षी ज्याची आतुरतेने वाट बघत असतात, असा बहुप्रतीक्षित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फीचा आज पणजीत शुभारंभ झाला. इफ्फीचे हे 51 वे वर्ष असून, चित्रपटांच्या मनोरंजनाची रेलचेल असलेल्या या महोत्सवाची सुरुवात, चित्रपटसृष्टीतील नामवंतांच्या उपस्थितीत मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली. गोव्यातील पणजी इथल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडीयमवर आज जगभरातील चित्रपट कलावंत, निर्माते आणि चोखंदळ रसिकांच्या मांदियाळीत या महोत्सवाचा नाद, पुन्हा एकदा दुमदुमला.
आशियातील सर्वात जुन्या महोत्सवांपैकी एक आणि भारतातील सर्वात मोठ्या अशा या चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालक सुप्रसिध्द अभिनेत्री तिस्का चोप्रा यांनी केले. चित्रपट निर्माते प्रियदर्शन नायर यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते सुदीप यांनी सोहळ्याची शोभा वाढवली. त्याशिवाय, इतर अनेक सिने कलाकारांनी देखील सोहळ्याला खास उपस्थिती लावत रसिकांचा आनंद द्विगुणीत केला. भारतीय पॅनोरामाच्या ज्युरीचे अध्यक्ष प्रियदर्शन नायर आणि आंतरराष्ट्रीय सिनेमा ज्युरीचे अध्यक्ष पाबलो सीझर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
‘भारत ही एक अत्यंत विलोभनीय, आश्चर्यकारक भूमी असून इथे आपण कोणतीही स्वप्ने बघू शकतो, कारण भारतात काहीही शक्य आहे.”अशी प्रतीक्रिया,आंतरराष्ट्रीय सिनेमा ज्युरीचे अध्यक्ष पाबलो सीझर यांनी व्हिडीओ संदेशातून व्यक्त केली.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची या उद्घाटन सोहळ्याला विशेष उपस्थिती होती. त्याशिवाय, माहिती आणि प्रसारण विभागाच्या अतिरिक्त सचिव, नीरजा शेखर, इफ्फीचे संचालक चैतन्य प्रसाद यांच्यासह भारत सरकारचे अनेक अधिकारी आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या सोहळ्याला बांगलादेशचे महावाणिज्य दूत मोहम्मद इम्रानही उपस्थित होते. यंदाच्या इफ्फीमध्ये बांगलादेशची फोकस कंट्री म्हणून निवड करण्यात आली आहे. या महोत्सवात, बांगलादेशातील निवडक दर्जेदार दहा चित्रपट दाखवले जाणार आहेत. अशा आव्हानात्मक काळातही इफ्फीचे आयोजन करण्याचा सरकारचा निर्णय, भारताची आव्हाने पार करण्याची धाडसी वृत्ती आणि कटीबद्धता दर्शवणारा तसेच कला आणि संस्कृतीविषयी असलेली आत्मीयता प्रकट करणारा आहे, अशा भावना बांगलादेशचे महावाणिज्य दूत मोहम्मद इम्रान यांनी यावेळी व्यक्त केल्या.
2020 मध्ये आलेल्या आजारावर आपण 2021 मध्ये लस निर्माण केली आहे हे आपल्या लढाऊ वृत्तीचे द्योतक आहे भारतातील 190 चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येतील
जावडेकर पुढे म्हणाले की भारत आणि बांगलादेश यांच्या मजबूत संबंधांचे प्रतीक असलेल्या बंगबंधू या चित्रपटाची निर्मिती भारत आणि बांगलादेश मिळून करतील शेख मुजीब उर रहमान यांच्या जीवनावर तो चित्रपट आधारित आहे.
चित्रपटांच्या शूटिंग साठी शेकडो स्थळे असलेल्या भारतामध्ये चित्रपट व्यवसाय आणखी विकसित करण्यासाठी फिल्म बजार ची संकल्पना आणली गेली आहे यामध्ये शूटिंग, पोस्ट प्रोडक्शन व इतर सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतात लोकप्रिय झालेल्या केबल टीव्ही चा उल्लेख करून माहिती प्रसारण मंत्री पुढे म्हणाले की दूरदर्शनची फ्री डिश प्रेक्षकांना 104 वाहिन्यांचे मोफत प्रक्षेपण देते.
इफ्फी कार्यक्रमाला केवळ भारत सरकार आणि गोवा सरकार यांच्यापुरते मर्यादित न ठेवता पुढच्या वर्षीच्या 52 व्या इफ्फी मध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग असेल अशी घोषणा जावडेकर यांनी यावेळी केली.
सिनेमाची अनुभूती भाषेच्या पलिकडची असते आणि इफ्फी ही सिनेमाची जादू अनुभवायला देणारे, केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील सिनेमानिर्मितीचा उत्सव साजरा करणारे अत्यंत सशक्त व्यासपीठ आहे, असे जावडेकर यावेळी म्हणाले.
51 वा इफ्फी पहिल्यांदाच मिश्र स्वरूपात म्हणजे प्रत्यक्ष आणी आभासी स्वरूपात होत आहे. विशेष म्हणजे, ऑनलाईन प्रसारणासाठी इफ्फीचा स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म असणार आहे. पहिल्यांदाच हा महोत्सव ऑनलाईन होत असल्याने जगभरातील सिनेरसिक प्रतिनिधी या महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. या सुविधेमुळे यंदा नेहमीपेक्षा जास्त लोक ऑनलाईन माध्यमातून, महोत्सवात सहभागी होऊ शकतील, अशी अपेक्षा जावडेकर यांनी व्यक्त केली.
जागतिक कीर्तीचे चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्याशिवाय कुठलाही सिनेउत्सव अपूर्ण असल्याचे सांगत, जावडेकर म्हणाले की इफ्फीमध्येही त्यांना विशेष अभिवादन म्हणून रेट्रो विभागात त्यांचे अत्यंत नावाजलेले चित्रपट- ‘पथेर पांचाली’, ‘शतरंज के खिलाडी’, ‘चारुलता’ , ‘घरे बाइरे’ आणि ‘सोनार केला’ दाखवले जाणार आहेत.
भारतीय तसेच जागतिक चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट निर्मितीसाठी गोव्याला यावे असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले. इफ्फीमुळे जगभरातल्या चित्रपट निर्मात्यांना भारताच्या समुद्र किनाऱ्यावरच्या या निसर्गसंपन्न राज्यातले सौदर्य अनुभवण्याची संधी मिळते, असे सावंत म्हणाले.
इटालियन सिनेमॅटोग्राफर, व्हिक्टोरियो स्टोरारो यांना या सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र व्हिक्टोरियो स्टोरारो प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्यामुळे त्यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या...... त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाची दखल घेतल्याबद्दल व्हिक्टोरियो स्टोरारो यांनी इफ्फीचे आभार मानले, अनेक नामवंत दिग्दर्शकांनी दिलेल्या उत्तमोत्तम संधींमुळेच आपण इथवर पोहचू शकलो, असे ते म्हणाले. जगभरातील सिनेमॅटोग्राफ्रर्सन सल्ला देताना त्यांनी सांगितले- “अभ्यास करा, संशोधन करा, स्वतःला तयार करा.आपल्या कामावर प्रेम करा, आपण जर कशावर प्रेम केले आणि विश्वास ठेवला तरच आपण ते ध्येय साध्य करू शकतो”
कोविड मुळे निर्माण झालेल्या परीस्थितीमुळे भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार या सोहळ्याला प्रत्यक्षात उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून ते ही या महोत्सवात आभासीरूपाने सहभागी झाले होते.
“इफ्फीमधील सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा –अनुपम खेर
-“जगभरातील उत्तमोत्तम चित्रपटांचा समावेश असलेल्या या महोत्सवाने 2021 ची मस्त सुरुवात होत आहे-आयुष्मान खुराना
-इफ्फी महोत्सवाकडे आम्हा सर्व सिनेप्रेमींचे विशेष लक्ष असते. हा देशातील प्रतिष्ठीत चित्रपट महोत्सवापैकी एक महोत्सव आहे. –अनिल कपूर
याशिवाय, माधुरी दीक्षित, रणवीर सिंग, सिद्धांत चतुर्वेदी, विद्या बालन, मोहनलाल अशा दिग्गज कलावंतानी व्हिडीओ संदेशातून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ- एनएफडीसी च्या चौदाव्या फिल्म बाजारचे ही आभासी उद्घाटन करण्यात आले. एनएफडीसी फिल्म बाजार देखील यंदा मिश्र स्वरुपात, प्रत्यक्ष आणि ऑनलाईन प्रकारे होणार आहे. जरी हा फिल्म बाजार आभासी असला, तरीही त्यात आधीच्या इफ्फीप्रमाणेच यंदाही सर्वच विभाग समाविष्ट करण्यात आले आहेत. फिल्म बाजार ही आशियातील सर्वात मोठे चित्रपट मार्केट आहे. दक्षिण आशियाई आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट समुदायांमध्ये वित्तीय सहकार्य निर्माण करण्यास हा फिलं बाजार प्रोत्साहन देतो.
या उद्घाटन सोहळ्यानंतर दाखवल्या जाणाऱ्या ‘अनादर राउंड’ या डॅनिश चित्रपटाचे ट्रेलर यावेळी दाखवण्यात आले.
डॅनिश निर्माते थॉमस विंटरबर्ग यांचा हा चित्रपट मद्याचे समर्थन करत सुरु होतो परंतु जीवनाचे महत्त्व सांगतो. डेन्मार्क कडून हा चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन देण्यात आले आहे. कान महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळावलेले मॅड्स मिकेल्सन यांची या चित्रपटात विशेष भूमिका आहे
शनिवार, जुलै २७, २०१९
राष्ट्रीय पुरस्कार विजेता शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या चमूत गायक प्रणय गोमाशे यांची निवड
मंगळवार, मे १४, २०१९
एक दिवशीय मोफत चित्रपट कार्यशाळेचे आयोजन
चंद्रपूर - शहरात पहिल्यांदाचन मोफत चित्रपट दिग्दर्शन, पटकथा लेखन आणि चित्रपट आस्वाद ह्यावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ह्या एक दिवशीय कार्यशाळेत चित्रपट दिग्दर्शन, पटकथा लेखन, लघुपट, माहितीपट, वेब सिरीज, सिनेमा बनवण्याची कला आणि तंत्रज्ञान ह्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
ह्या एक दिवशीय कार्यशाळेला शैलेश भीमराव दुपारे ह्याचे मार्गदर्शन मिळणार आहे. शैलेश भीमराव दुपारे हे ‘भारतीय फिल्म आणि टेलिवीजन संस्थान,FTII) पुणे येथील विद्यार्थी असून त्यांनी सचिन खेडेकर अभिनित ‘तार्यांचे बेट’ हा मराठी सिनेमा लिहिला असून ‘का रे दुरावा’ ह्या मराठी मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. तसेच चंद्रपूरचा स्थानिक कलावंताना घेवून चंद्रपूर मध्ये ‘नूर’ तसेच मराठी अभिनेत्री सई ताम्हनकर ह्यांचा सोबत ‘नो स्मोकिंग प्लीज’ हे लघुपट तयार केले आहेत.
कार्यशाळा १९ मे, रविवार, सकाळी १० ते ६ ह्या वेळेत ‘वासनिक सर एकाडमी’, जुबिली शाळेचा बाजूला, शासकीय वाचनालयाजवळ, लक्ष्मी डिजिटल लँबचा पुढे, कस्तुरबा रोड, चंद्रपूर इथे आयोजित केली आहे.
ह्या कार्यशाळेत कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात येणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्याचा फायदा घ्यावा असे आव्हान वासनिक सर अकादमीचे संचालक श्री संजय वासनिक ह्यांनी केले आहे.






