मुंबई/प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या निमीत्ताने आयोजित राष्ट्रीय पुरस्कार विजेता शास्त्रीय गायक महेश काळे यांचा "अभंगवारी" या कार्यक्रम मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात 20जुलै रोजी पार पडला.अभिजात संगीत व वारकरी संप्रदायाच्या वारस्याला पुढच्या पिढी पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न गायक महेश काळे हे सातत्याने करत आहेत. यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले असुन कलर्स मराठी वरील रियालिटी शो सुर नवा ध्यास नवा कार्यक्रमात त्यांनी परीक्षकाची भुमीका बजावली आहे.
महेश काळे यांच्या मुंबई येथील "अभंगवारी" या कार्यक्रमात साथसंगत म्हणून गायनासाठी प्रणय गोमाशे यांची निवड करण्यात आली करण्यात आली. गायक प्रणय गोमाशे हे मूळचे आपल्या विदर्भातील चंद्रपूर चे असून स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य पदवीउत्तर शिक्षण पूर्ण केले, त्या दरम्यान ते नागपूर विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे पुढे संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली,पुढे मुंबई विद्यापीठ संगीत विभाग माजी विद्यापीठ प्रमुख व जयपूर घराण्याचे जेष्ठ गायक पंडित मुरलीमनोहर शुक्ला गुरुजी यांच्या कडे गायकी ची तालीम घेत सुप्रसिद्ध गायक डॉ. सुरेश वाडकर,राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे इ.यांच्या मार्गदर्शन त्यांना लाभले. आणि मुख्य म्हणजे प्रणय ने नुकताच संगीत विषय घेऊन पदविका पुर्ण केलीय(MA music). विविध राज्य स्तरीय गायन स्पर्धा,जागतिक सांस्कृतिक महोत्सव,विविध राज्यात गायनाचे कार्यक्रम इ.ठिकाणी आपली कला सादर करून नाव कमावून विविध सामाजिक संघटना मार्फत देण्यात येणारे "युवा पुरस्काराने" सन्मानीत आहेत. मुंबई येथील प्रसिध्द PRANAY G MUSICIANS AND BAND चे मुख्य गायक आहेत मुंबई च्या व इतर स्थानिक कलाकारांनी मिळून मराठी, हिंदी, वेस्टर्न, संगीताच्या वेगवेगळ्या तर्हा लोकांसमोर नव्याने सादर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. जुण्या गाण्यांच्या संयोजनाला धक्का न लावता आधुनिक वाद्यांचा वापर,त्यांच्या बॅन्ड ला युनिक बनवते, म्हणूनच कमीत कमीम वेळेत जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवणारा हा एकमेव संगीत संच आहे.
साध्यावत मुंबई मधील असे कोणतेच व्यासपीठ नाही जिथे PRANAY G बॅंड ने सादरीकरण केले नसेल,संपूर्ण मुंबईतच नवे तर विदर्भातील अनेक शहरात, महाराष्ट्रातील नाशिक,पुणे, देशातील इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर बंगलोर येथे आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक गुरू श्री श्री रवि शंकर यांच्या पुढे गाण्याची संधी मिळाली ,गोवा सरकार आयोजित "गोवा महोत्सव" मध्ये सुद्धा यांनी प्रसिद्धी मीळवलीय अश्या अनेक मेट्रो शहरात यांची हॉउसफ़ुल्ल कार्यक्रम आजवर झालेली आहेत. त्याव्यतिरिक्त प्रणय गोमाशे हे मुंबईच्या समाजभारती या त्रैमासिक अंकाचे प्रसिध्दी प्रमुख असून मुंबई मध्ये विदर्भातून येणाऱ्या होतकरू लोकांसाठी ४० वर्षापासून समाजसेवेचं कार्य करणाऱ्या "विदर्भ युवक मंडळ कल्याण" चे ते सह कोषाध्यक्ष व अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ शाखा कल्याण चे सहसंघटन सचिव म्हणून कार्यरत आहेत. या संपूर्ण कामाची दखल घेत गायक महेश काळे यांनी प्रणय गोमाशे यांची सहगायक म्हणून निवड केली.