गडचांदूर/प्रतिनिधी:
विद्युत महामंडळ तर्फे वीज बिल देयके भारायच्या तारखे नंतर मिळत असल्याने व जादा व्याजाचे पैसे ग्राहकांना भरावे लागत आहे.
म्हणून ग्राहकांनी वीज बिल न घेता परत केले त्यावर कार्यकारी अभियंता याना निवेदन देऊन वीज बिल च्या व्याजाचे पैसे कमी करून देने व सम्बंधित अधिकारी व ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा वीज बिलाची होळी करून बिलाची राख विद्युत कार्यालयाला भेट देण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला निवेदन देताना प्रहारचे सतिश बिडकर , शैलेश विरुटकर, गणेश ठावरी, पंकज माणूसमारे, शंकर झिलपे शेखर बंदरे ,सचिन कोंडेकर, देवानंद साळवे , प्रशांत पिंपळशेंडे, भाषाकर थेरे प्रतीक खेरे, व इतर नागरिक निवेदन द्यायला उपस्थित होते उपस्थित होते
कोणत्याही वीज ग्राहकास वीज बिल देयक भरायच्या तारखे नंतर आले असल्यास ते बिल स्वीकारू नये व त्याची तक्रार प्रहार कडे द्यावी असे आवाहन देखील सतिश द. बिडकर तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष यांनी केले आहे.