Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै २७, २०१९

धारीवाल कंपणीच्या बैठकीला कंपणी व्यवस्थापणासह तहसीलदारांची दांडी

उपविभागीय अधिका-यांनी स्विकारले निवेदणसर्व विभागाशी स्वतंत्र बैठका लावण्याचे आश्वासन

चंद्रपूर /प्रतिनिधी:
विविध मागण्यांना घेऊन आज 26 जुलै ला तहसीलदारांच्या कार्यालयात धारीवाल कंपणी व्यवस्थापणाची बैठक लावण्याचे आश्वासन तहसिलदार यांनी यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांना दिले होते. मात्रबैठकीला तहसीलदार व कंपणी व्यवस्थाणातील अधिकारी उपस्थित नसल्याने बैठकीसाठी आलेल्या प्रकल्पग्रस्तांसह कामगारांमध्ये रोश निर्माण झाला. यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी मध्यस्ती करत किशोर जोरगेवार यांचे निवेदण स्विकारले व काही समस्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले. तसचेइतर प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी संबधीत विभागाच्या बैठका लावून देण्याचे आश्वासण दिले.

    प्रकल्पग्रस्ततांना योग्य जमीनीचा मोबदला व स्थानीक युवकांना रोजगार द्या या मागणीसह इतर मागण्यांसाठी  मार्च ला किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात धारीवाल कंपनीवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चा आक्रमक होताच तहसीलदार भास्करवार यांनी मध्यस्ती करत धारीवाल कंपनीच्या अधिका-यांसोबत बैठक लावून समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासण दिले होते. 

त्यानूसार १९ जुलैला तहसील कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. मात्रयावेळी बैठकीला उपस्थित धारीवाल कंपणीच्या अधिका-यांनी कोणतेही कागदपत्र सोबत न आणल्याने २६ जुलै ला दुसरी बैठक तहसील कार्यालयात बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात धारिवाल कंपनीविरोधात अनेक तक्रारी आल्यात. 

त्यानूसार शुक्रवारी बैठकी करीता किशोर जोरगेवार यांच्यासह कामगार व प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात एकत्रीत आले होते. मात्रश्वासन देउनही कंपनी व्यवस्थापनातले अधिकारी व तहसिलदार बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळेकाही वेळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र उपविभागीय अधिकारी यांनी मध्यस्ती करत निवेदण स्विकारले. 

तसेच यावेळी त्यांनी किशोर जोरगेवार व प्रगल्पग्रस्तांसह बैठक करुन त्यांच्या समस्या समजून घेतल्या यातील काही समस्या तात्काळ सोडवील्या जाईल असे ही त्यांनी यावेळी सांगीतले तसेच उर्वरीत समस्यांसाठी प्रत्येक विभागाशी स्वंतत्र बैठका लावण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी किशोर जोरगेवार यांना दिले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.