Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी ०१, २०२१

अभिनेते अतुल कुलकर्णी केली निवृत्तीची घोषणा ! का घेतला हा निर्णय?




मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. क्वेस्ट (QUEST) या सामाजिक संस्थेतून निवृत्त होत आहेत. फेसबुकवर पोस्ट लिहीत त्यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.



त्यांना हे राम चित्रपटातील श्रीराम अभ्यंकर ही व्यक्तिरेखेच्या निरुपणाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय पेज थ्रीरंग दे बसंती या चित्रपटांतील त्यांच्या भुमिकांनाही चिकित्सकांकडून दाद मिळाली. विविध मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. मातीमाय हा त्यांचा चित्रपट टोरोंटो चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. रंग दे बसंती या चित्रपटामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी लाभली.

बेळगावमध्ये जन्मलेल्या अतुलने दहावीपर्यंतचे शिक्षण हरिभाई देवकरण हायस्कूल, सोलापूरमध्ये पूर्ण केले. त्यांचे आईवडिल सोलापूरला स्थिरस्थावर झाले. १२वी बेळगावमध्ये पूर्ण करून तेथील अभियांत्रीकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. पण आभियांत्रिकीमध्ये मन न रमल्यामुळे नंतर सोलापुरातील डी.ए.वी.महाविद्यालयातून इंग्रजी सहित्य या विषयात बी.ए. पूर्ण केले.


शालेय व महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी सांस्कृतीक कार्यक्रमातील नाटकात काम करणे सुरू केले होते. त्याचवेळी सोलापुरातील "नाट्य आराधाना" नावाच्या हौशी नाट्यसंस्थेचे सदस्यही बनले. दोन वर्षे पडद्यामागे काम केल्यानंतर त्यांना नट म्हणून काम करण्याची संधी मिळाली व त्याच्यातच कारकिर्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १९९२ मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली मध्ये प्रवेश घेतला. १९९५ साली पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ईन ड्रॅमाटीक आर्ट्स ही पदवी मिळवली

अभिनेत अतुल कुलकर्णी यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन 2007 रोजी शिक्षण क्षेत्रात काम करण्याच्या हेतूने ही संस्था स्थापन केली होती. स्थापनेपासून अतुल कुलकणी या संस्थेचे अध्यक्ष होते. पण आता त्यांनी या संस्थेतून निवृत्त होत असल्याचे जाहिर केले आहे.

‘गणितात एक सिग्मॉइड कर्व्ह नावाचा सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार, जेव्हा सर्व काही छान चाललेलं असतं आणि तुम्ही एखाद्या गोष्टीच्या शिखरावर असता, तेव्हाच तुम्ही ‘एक्झिट’ घ्यायला हवी. माझा या सिद्धांतावर विश्वास आहे. शिवाय आपल्या कडच्या ‘आश्रम’ या व्यवस्थेवरही माझा विश्वास आहे. सध्या मी हळूहळू माझ्या आयुष्याच्या वानप्रस्थाकडे प्रवास सुरू केला आहे, असे लिहित अतुल यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे.

नवे अध्यक्ष मनोज कार्येकर यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे!

मनापासून अभिनंदन आणि खूप, खूप शुभेच्छा !!!! Manoj Karyekar, President, QUEST ! Heartiest Congratulations and all the very BEST !!!

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.