Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सांगली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सांगली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, जुलै ०७, २०२२

शशांक कुलकर्णी यांना प्रतिष्ठित गांधी सेवारत्न पुरस्कार घोषित Distinguished Gandhi Sevaratna Award announced to Shashank Kulkarni

शशांक कुलकर्णी यांना प्रतिष्ठित गांधी सेवारत्न पुरस्कार घोषित Distinguished Gandhi Sevaratna Award announced to Shashank Kulkarni



शशांक कुलकर्णी यांना प्रतिष्ठित गांधी सेवारत्न पुरस्कार घोषित



विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना रोखण्यासाठी महत्वपूर्ण संशोधन करणारे आंतरराष्ट्रीय खाती प्राप्त कृषी धोरण शास्त्रज्ञ शशांक कुलकर्णी यांना यावर्षीचा गांधी सेवारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. 



वेक पीपल कौन्सिलतर्फे दरवर्षी दिला जाणारा हा सन्मान सेवा क्षेत्रात महत्त्वाचा मानला जातो. ही परिषद संयुक्त राष्ट्रांशी संलग्न राहून कार्य करते.  हा पुरस्कार त्यांना २४ जुलै रोजी भोपाळ येथे प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जगभरातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.

शशांक कुलकर्णी यांना पत्राद्वारे पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ.विजय बजाज यांनी दिली. ते म्हणाले की, कुलकर्णी हे गेल्या काही वर्षांपासून जम्मू-काश्मीरमधील संवेदनशील भागात महत्त्वाचे सामाजिक कार्य करत आहेत. समाजासोबत राहून समाजाचे प्रश्न सोडवणारे ते संशोधक आहेत.

शशांक कुलकर्णी हे प्रख्यात कवी, लेखक, वक्ता आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी धोरण शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म १९९० साली महाराष्ट्रातील साखराळे (जिल्हा सांगली) गावात झाला. त्यांनी जम्मू केंद्रीय विद्यापीठाच्या लोकनिती व लोकप्रशासन विभागात   विद्यापीठ अनुदान आयोगाचे सीनिअर रिसर्च फेलो या नात्याने विशेष कार्य केले आहे. त्यांच्या संशोधन आणि लेखन कार्यासाठी जगातील विविध देशांनी त्यांचा गौरव केला आहे. 



विविध विषयांवर त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये दहाहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नल्समध्ये लेखन केले आहे. पूज्य द्वारकानाथ शास्त्री राष्ट्रीय संशोधन केंद्राच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांना 'बाबा लक्ष्मण दास राष्ट्रीय स्मारक निर्माण सेवा समिती'चे प्रवर्तक म्हणूनही ओळखले जाते, ही जम्मू आणि काश्मीरची एक अभिनव सामाजिक आणि आध्यात्मिक चळवळ आहे. भारताच्या शेतकरी धोरणाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या मूलभूत संशोधन कार्याची दखल घेऊन दक्षिण अमेरिकेतील प्रसिद्ध स्वाहिली विद्यापीठाने त्यांना सन्मानित केले आहे.


This year's Gandhi Sewaratna award has been announced to Shashank Kulkarni, an internationally acclaimed agricultural policy scientist who has done significant research to prevent farmer suicides in Vidarbha. 

शनिवार, मार्च २६, २०२२

आधुनिक रस्ते जोडणीमध्ये पश्चिम महाराष्ट्राला अग्रेसर...nitin gadkari

आधुनिक रस्ते जोडणीमध्ये पश्चिम महाराष्ट्राला अग्रेसर...nitin gadkari

"आधुनिक रस्ते जोडणीमध्ये पश्चिम महाराष्ट्राला अग्रेसर बनवण्यासाठी आज सांगलीमध्ये २,३३४.०१ कोटी रुपये किंमतीच्या व ९७.७८ किमी लांबीच्या २ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे राज्याचे मंत्री श्री जयंत पाटील,…

सांगली, महाराष्ट्र में 2,334 करोड़ रुपए की लागत वाली 2 राष्ट्रीय राजमार्ग परियोजनाओं का उद्घाटन। #PragatiKaHighway #GatiShakti
play
.





कू Koo अँप डाउनलोड करा - लाखो लोक आणि प्रमुख सेलिब्रिटींशी जोडले जा:
https://www.kooapp.com/dnld

मंगळवार, ऑगस्ट १७, २०२१

जत तालुक्याला ६ टीएमसी पाणी; पालकमंत्री जयंतराव पाटील यांचा सर्वपक्षीय सत्कार |

जत तालुक्याला ६ टीएमसी पाणी; पालकमंत्री जयंतराव पाटील यांचा सर्वपक्षीय सत्कार |



सांगली - प्रतिनिधी

जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जत  तालुक्याला म्हैसाळ विस्तारीकरण योजनेच्या माध्यमातून वारणा प्रकल्पातील ६ टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले बद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंतराव  पाटील यांचा सांगली येथे सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने सत्कार करणेत आला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना पाटील म्हणाले की, आपल्या जिल्ह्यात अनेक योजना झाल्या मात्र जत तालुक्यातील ६५ गावांचा पाण्याचा प्रश्न काही सुटला नाही. या गावापर्यंत पाणी पोहोचविणे मोठे जिकिरीचे होते. उमदीपर्यंत पाणी गेले होते मात्र पुढे पाणी गेले नव्हते. त्यामुळे या गावांना पाणी मिळावे  ही मागणी तीव्र होत चालली होती.

या भागाला पाणी मिळावे म्हणून  कर्नाटक राज्याशी चर्चा केली मात्र त्यांनी अधिकृत नकार दिला होता. त्यामुळे आपल्यालाच काही नियोजन करायला हवे अशी इथल्या प्रमुख लोकांनी मागणी केली. महिने दिड महिने याबाबत अभ्यास करत, अधिकांऱ्यांशी चर्चा करत या  ६५ गावांना ६ टीएमसी पाणी उपलब्ध करण्यात आले आहे. 

या भागांना पाणी उपलब्ध व्हावे हे स्व. राजारामबापू यांचे स्वप्न होते. त्यांनी या भागांना पाणी मिळावे यासाठी पदयात्राही काढली होती. 

याप्रसंगी माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले की, आम्ही केलेल्या मागणीचा गांभीर्याने विचार करून मंत्री जयंतराव  पाटील यांनी जत तालुक्यासाठी ६ टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले. त्यासाठी जत तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीने आभार मानतो. पाण्याची उपलब्धता ही महत्वाची होती. ती आज पूर्ण झाली. पाणी उपलब्ध करणे हे काम कठीण होते ते मंत्री महोदयांनी साध्य केले. पक्षीय मतभेद विसरून आम्ही आपल्या सत्काराला आलो आहोत. स्व. राजारामबापू पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण अर्थ संकल्पात भरीव तरतूद करून जत तालुक्याला भाग्योदय आणण्यासाठी आपण आपली सर्व शक्ती पणाला लावाल. असा मला विश्वास आहे. जत तालुक्यातील प्रत्येक गाव सिंचनाखाली येण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. जत भाजपा पक्षीय जोडे बाजूला ठेवून या योजने साठी आपल्या सोबत असेल.

यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासो मुळीक, बाळासाहेब पाटील, उमेश सावंत, तालुकाध्यक्ष रमेश पाटील, चन्नाप्पा होर्तीकर, सिद्धु शिरसाठ, उत्तम चव्हाण, शिवाजी शिंदे, आप्पासाहेब पवार, भरत देशमुख, आण्णासाहेब कोडग आदी उपस्थित होते प्रसंगी उमेश सावंत, रमेश पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच गीता कोडग यांनी आभार मानले...!


TMC Water jat Jayant Patil

रविवार, जुलै २५, २०२१

पुन्हा ना. जयंतराव पाटील ऑन ग्राऊंड...  आज दिवसभर सांगलीतील पूरग्रस्त गावांची पाहणी.. sangita news

पुन्हा ना. जयंतराव पाटील ऑन ग्राऊंड... आज दिवसभर सांगलीतील पूरग्रस्त गावांची पाहणी.. sangita news




*घेतला हा महत्वाचा निर्णय...

सांगली दि. २४ जुलै - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील२०१९ च्या महापूरादरम्यान ज्यापद्धतीने पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेल्याचे दिसले होते आज त्याच पद्धतीने जयंतराव पाटील पूरग्रस्त भागात ऑन ग्राऊंड उतरले आहेत.

ना. जयंतराव पाटील आज सकाळपासूनच पूरग्रस्त गावांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेत आहेत सकाळी वाळवा तालुक्यातील बहे, हुबालवाडी, बोरगाव या गावांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

परवापासून हाहाकार माजवलेल्या पावसाने आज उसंत घेतली आहे. मात्र अजूनही पाण्याचा निचरा झालेला नाही असे मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी सांगितले.


स्थलांतरित नागरिकांची होणार अँटीजन टेस्ट

सांगली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे. जीवितहानी होऊ नये, नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने लोकांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता. खबरदारी म्हणून या स्थलांतरीतांची अँटीजन टेस्टही केली जात आहे. पूराच्या काळात कोविडचा संसर्ग वाढू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले.

सोमवार, मे १३, २०१९

जनावरांची संख्या लक्षात घेऊन चारा छावण्या सुरु कराव्यात

जनावरांची संख्या लक्षात घेऊन चारा छावण्या सुरु कराव्यात



- मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. 13 : सांगली जिल्ह्यात एकूण 10 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाय योजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. सध्या सांगलीत एकूण 4 चारा छावण्या सुरु असल्या तरी जनावरांची संख्या लक्षात घेऊन वाढीव चारा छावण्या सुरु कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज ऑडिओ ब्रिजच्या प्रणालीद्वारे सांगली जिल्ह्यातील प्रामुख्याने जत, तासगाव,कवठेमहांकाळ, खानापूर -विटा या दुष्काळी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला. सरपंचांनी केलेल्या चारा छावण्या, टँकर, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती आदी बाबींच्या तक्रारींची तसेच जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या व्हॉटसअपवर येणाऱ्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी व त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला यावेळी दिले. सांगली जिल्ह्यातील जनावरांची संख्या लक्षात घेता चारा छावण्या सुरु कराव्यात तसेच ज्या तालुक्यांमध्ये पाण्याच्या गरजेनुसार तेथे टँकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनास दिले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी सध्याची स्थिती पाहून चारा छावणी, टँकर पुरवठा,तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती आदी तातडीच्या उपायांवर भर द्यावा. त्याचबरोबर ज्या गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना नाहीत, अशा ठिकाणी या योजना सुरू करण्यासंदर्भातील अहवाल तयार करावे. टँकरची मागणी असल्यास पाहणी करून तहसीलदारांनी तत्काळ प्रस्ताव मंजूर करावेत. जनावरांसाठीही टँकरद्वारे पाणी पुरविण्यात यावे. सिंचन विहिरी अथवा तलावामधील पाण्याच्या स्त्रोताचा वापर करण्यासंदर्भात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाचे अहवाल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कार्यवाही करावी.
पिण्याच्या पाण्यास प्राधान्य द्यावे
पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ सांगली जिल्ह्यात आजअखेर 16 विंधण विहिरीद्वारे आणि 96 विहिरींचे अधिग्रहण करुन पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयकाची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आली असून, सर्व नळ पाणी पुरवठांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. याशिवाय  पाणी पुरवठा योजनांना नियमित विद्युत पुरवठा होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. तसेच पिण्याच्या पाणी पुरवठ्यास प्राधान्य द्यावेअशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
चारा छावण्या सुरु करण्यास प्राधान्य द्यावे
सध्या सांगली जिल्ह्यात एकूण शासकीय 3 आणि सेवाभावी संस्थेमार्फत 1 अशा 4 चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. या चारा छावण्यांमध्ये मोठी जनावरे 1 हजार 418 तर लहान 322 अशी 1 हजार 740 जनावरे आहेत. आणखी चारा छावण्यांची गरज असल्यास चारा छावण्या सुरु करण्यास प्राधान्य द्यावेअसेही त्यांनी सांगितले.
रोहयोअंतर्गत जिल्ह्यात  कामे सुरू
सांगली जिल्ह्यातील 10 पैकी 5 तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील 10 तालुक्यांपैकी 6 तालुक्यांमधील 176  गावे व 1 हजार 83 वाड्या-वस्त्यांमध्ये एकूण 183  टँकर सुरु आहेत. सर्वाधिक जत तालुक्यात 107 तर सर्वात कमी मिरज तालुक्यात 6 टँकर सुरू आहेत.  


तालुका
टँकर्सची संख्या
1. जत
107
2. आटपाडी
34
3. कवठेमहांकाळ
13
4. तासगाव
12
5. खानापूर -विटा
12
6. मिरज
6
सांगली
एकूण टँकर्स 183

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात 357 कामे सुरु असून त्यावर 2 हजार 666 मजूर उपस्थित आहेत. जिल्ह्यामध्ये 10 हजार 150 कामे शेल्फवर आहेत.
पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणासाठी जिल्ह्यात आजअखेर 16 विंधन विहिरी96 विहिरींचे अधिग्रहण करुन पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात येत आहे. थकित विद्युत देयकामुळे बंद पडलेल्या नळ पाणी पुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी 3.88 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून या योजनांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील 277 गावातील शेतकऱ्यांना मदत
सांगली जिल्ह्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 5 तालुक्यातील 277 गावातील 2 लाख 18 हजार 868 शेतकऱ्यांना 116.11 कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील एकूण 81 हजार 846 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसान भरपाईपोटी 26.83 कोटी इतकी रक्कम 41 हजार 100 पात्र शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यातील 1.99 लक्ष शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 59 हजार 371 शेतकऱ्यांना 2000 रुपये प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण 11.88 कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे.
दुष्काळ आढावा बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहतापाणी पुरवठा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्यामलाल गोयल,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणीप्रधान सचिव अनुपकुमारजलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवलेमदत व  पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.