Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

नागपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नागपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ऑगस्ट २३, २०२३

दिलीप पनकुले यांची चंद्रपूर (ग्रामीण)चे निरीक्षकपदी नियुक्ती

दिलीप पनकुले यांची चंद्रपूर (ग्रामीण)चे निरीक्षकपदी नियुक्ती




प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिटणीस दिलीप पनकुले यांची प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी चंद्रपूर (ग्रामीण)चे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी त्यांनी अमरावती व भंडारा जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. दिलीप पनकुले यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय माजी गृहमंत्री मा. आमदार अनिल देशमुख व माजी मंत्री रमेशचंद्र यांना देऊन त्यांचे व सर्वच पक्षश्रेष्ठींचे मनःपूर्वक आभार मानले. या नियुक्तीच्या संदर्भात बोलताना, "पक्षाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाची परतफेड मजबूत पक्षबांधणी करून व माझी सर्व शक्ती एकवटून पक्षाचे सशक्त संघटन उभे करूनच मी करणार" असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

येत्या २४ ऑगस्ट २०२३ रोजी ते चंद्रपूर येथे जाणार असून तेथील पदाधिकाऱ्यांशी व कार्यकर्त्यांशी या संदर्भात चर्चा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. चंद्रपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजू वैद्य व इतर सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या नियुक्तीबद्दल दिलीप पनकुले यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना संपूर्ण सहकार्य करणार अशी ग्वाही दिली.


शुक्रवार, ऑगस्ट १८, २०२३

 तरुणीसह चार मित्रांचा नदी पात्रात बुडून मृत्यू । Four Drowned In River

तरुणीसह चार मित्रांचा नदी पात्रात बुडून मृत्यू । Four Drowned In River

तरुणीसह चार मित्रांचा नदी पात्रात बुडून मृत्यू ।
Four Drowned In Kanhan River

Four Drowned In Kanhan River


नागपूर । जिल्ह्यातील वाकी परिसरात सहलीला गेलेल्या चार मित्रांना नदी पात्रात (Four Drowned In Kanhan River) पोहण्याचा मोह जीवावर बेतला. वाकी परिसरात फिरायला गेलेल्या सहा जणांपैकी चाैघे कन्हान नदीच्या डाेहात बुडाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. विजय ठाकरे (१८), साेनिया मरसकाेल्हे (१७, दाेघेही रा. नारा, नागपूर), अंकुश बघेल (१७) व अर्पित पहाळे (१९, दाेघेही रा. कामठी) अशी बुडालेल्यांची तर साक्षी कनाेजे (१८, रा. पाटणकर चौक, नागपूर) व मुस्कान राणा (१८, रा. जरीपटका, नागपूर) अशी बचावलेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत. हे सहाही जण मित्र असून, ते दाेन माेटारसायकलींनी ट्रिपल सीट गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वाकी येथे फिरायला आले हाेते. त्यांनी ताजुद्दीनबाबांच्या दर्ग्यात दर्शन घेतले आणि कन्हान नदीच्या काठावर फिरायला गेले.

LATEST POSTS

कन्हान नदीपात्रातील (Four Drowned In Kanhan River) खोल डोहात बुडाल्याने या 4 जणांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये तीन तरूण आणि एक तरूणी आहे. घटनेची माहिती मिळताच खापा पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांचे शाेधकार्य सुरू करण्यात आले.अंधार हाेईपर्यंत शाेधकर्त्यांच्या हाती काहीही गवसले नाही.पोलिसांनी एसडीआरएफ व स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने चौघांच्याही मृतदेहाचा शोध सुरू केला. मात्र सायंकाळी अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली. मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफची टिम, एक पीआय, दोन पीएसआय, 22 पोलिस शिपायी आले आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार नागपूर आणि कामठी येथील सहा जणांचा ग्रुप वाकी (Four Drowned In Kanhan River) येथे सहलीसाठी आला होता. यामध्ये तीन मुले आणि तीन मुलींचा समावेश होता. विजय ठाकरे, सोनिया मरसकोल्हे, अंकुश बघेल, अर्पीत पहाले ही मृतकांची नावे आहे.कामठी व नागपूर येथील हे सहा मित्र कन्हान नदीच्या पात्रात फिरायला आले. नदीजवळ पोहोचताच चौघांना पोहायचा मोह आवरला नाही. त्यातील सहा पैकी हे चौघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, चौघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. खोल पाण्यात गेल्याने ते बुडू लागले. सोबतच्या अन्य मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यांचा जीव वाचवता आला नाही.

वर्धा नदीत बुडालेल्या चौघाचे मृतदेह सापडले


वणी : दोन वेगवेगळ्या घटनेत नदीवर पोहण्यासाठी गेलेले चार तरुण वाहून गेले. ही घटना मंगळवारी स्वातंत्र्य दिनी सायंकाळी वणी तालुक्यातील नायगाव (खु.) व जुनाडा येथे घडली. ही दोनही गावे वर्धा नदीच्या काठावर आहेत. पैकी जुनाडा येथून वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह तसेच नायगाव येथून वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सापडले असल्याने वणी तालुका या घटनेने हादरून गेला आहे.


रितेश नत्थू वानखडे (१८) व आदर्श देवानंद नरवाडे (२०) दोघेही रा. भद्रावती (जि. चंद्रपूर) अशी येथून वर्धा नदीत वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहेत. या दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. नायगाव खुर्द येथील प्रविण सोमलकर (३६) दिलीप कोसरकर (४०) हे दोघे वर्धा नदीत वाहून गेले. असून याचा शोध घेतला दिलीप याचा मृतदेह हा माजरी इथे सापडला असून तर प्रविणचा मृतदेह कोणा येथे वर्धा नदी काठावर आढळून आले आहे .याघटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी सुटी असल्याने अनेकजण पर्यटनासाठी नदी तसेच धबधब्यावर जातात. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने नदीच्या जलपातळीत चांगलीच वाढली आहे. या प्रवाहात पोहण्याचा मोह न आवरता आल्याने ही दुर्घटना घडली.ब्युरो रिपोट प्रतिनिधी हिंगणघाट वर्धा


माओवादी नेता मल्ला राजिरेड्डी यांचे निधन?

माओवादी नेता आणि केंद्रीय समिती सदस्य मल्ला राजिरेड्डी (70) उर्फ ​​सायन्ना यांचे निधन झाल्याचे समजते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. राजा रेड्डी यांच्या मृत्यूबाबत माओवादी पक्षाने अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

मल्ल राजिरेड्डी यांचे मूळ गाव पेड्डापल्ली जिल्ह्यातील मंथनी मंडळातील एगलसपूर अंतर्गत शास्त्रुलापल्ली आहे. छत्तीसगड आणि ओडिशा दंडकारण्यममध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संग्राम, सायन्ना, मीसला सायन्ना, आलोक, उर्फ ​​देशपांडे, सटेना यांना ओळख मिळाली.

गुरुवार, ऑगस्ट १७, २०२३

टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर सपासप वार; जीव वाचविण्यासाठी....

टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर सपासप वार; जीव वाचविण्यासाठी....



नागपूर : एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत राजीवनगर बसस्टॉपजवळ पान टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. (Nagpur news)


कारमध्ये बसून आलेल्या शस्त्राने हल्ला करुन पळून गेले. ही घटना बुधवारी (16 ऑगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. सात ते आठ अज्ञात हल्लेखोरांनी धारदार राकेश मिश्रा (वय 27 वर्षे) आणि रवी जयस्वाल (वय 28 वर्षे) दोघेही रा. राजीवनगर, हिंगणा रोड नागपूर अशी जखमी झाले आहेत. मात्र खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान राकेशचा मृत्यू झाला. दोघेही या भागात आरटीओशी कागदपत्रे तयार करण्याचे काम करत होते अशी माहिती आहे. Nagpur news


दररोज सायंकाळी ते बसस्टॉपवर येऊन बाजूला एका टपरीवर बसायचे. रात्री पण तिथे बसून असताना काही अंतरावर कारमधून 6 ते 7 जण उतरले. त्यांनी तोंडाला दुपटे बांधले होते. राकेश आणि रवीच्या जवळ येऊन त्यांनी धारदार हत्याराने सपासप वार सुरु केले. राकेश हा जखमी होऊन जागीच निपचित पडला. 
Nagpur news



तर रवी हा जीव वाचवण्यासाठी बाजूला असलेल्या एका महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये घुसला आणि काचेचे केबिन आतून बंद करुन घेतले. आरोपी त्याचा पाठलाग करत तिथे पोहोचले. त्यांनी काचेची केबिन फोडून आतमध्ये घुसून रुग्ण आणि डॉक्टर समोरच त्यालाही गंभीर जखमी केले आणि कारमध्ये बसून फरार झाले.

Nagpur news


 एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार भीमा नरके आणि स्टाफ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. हा हल्ला नेमका कशासाठी झाला हे कळू शकलेलं नाही. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. <

मंगळवार, ऑगस्ट १५, २०२३

उपमुख्यमंत्र्यांनी दिली 'नागपूर शार्क टँक' घेण्याची आयडिया Deputy Chief Minister gave the idea of ​​'Nagpur Shark Tank'

उपमुख्यमंत्र्यांनी दिली 'नागपूर शार्क टँक' घेण्याची आयडिया Deputy Chief Minister gave the idea of ​​'Nagpur Shark Tank'

आता पेटंट फेस्ट नंतर 'नागपूर शार्क टँक' हा कार्यक्रम घ्या - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- पेटंट फेस्टचा थाटात समारोप




नागपूर :- सगळ्या नव्या संकल्पना पेटंट झाल्या पाहिजेत आणि त्यानंतर त्यांना व्यावसायिक आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचे स्वरूप देखील दिले पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यानंतर त्यांनी, पेटंट फेस्टच्या
यशस्वी आयोजनानंतर या कार्यक्रमाची पुढची आवृत्ती म्हणून 'नागपूर शार्क टँक' हा कार्यक्रम घेण्याची 'आयडिया' देखील आयोजकांना दिली. ते सुरेश भट सभागृहात आयोजित पेटंट आणि आयडिया फेस्टच्या पुरस्कार समारोहात बोलत होते. यावेळी मंचावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा सदस्य आ. कृष्णा खोपडे, व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि माजी महापौर संदीप जोशी, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशनचे सचिव मनोज चव्हाण आणि कोषाध्यक्ष डॉ. योगिता कस्तुरे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री आपल्या संबोधनात म्हणाले की, जगातील तिसऱ्या क्रमांकाचे स्टार्टअप हब म्हणून भारताकडे पाहिले जाते. हल्दी घाटीची लढाई आणि अमेरिकेसोबतची हळदीच्या पेटंटची लढाई दोन्ही महत्वाचे आहेत. ती लढाई जेव्हा आपण जिंकलो तेव्हा आपल्याला पेटंटचे महत्व लक्षात आले. १६००० startups एकट्या भारताचे आहेत. वेळ वाचविणे खूप महत्वाचे आहे. प्रवासाचा वेळ आणि माहितीचा वेग हा यांचे महत्व मोठे आहे. यांतून पैशांची बचत होते. विचारांचे पंख असणाऱ्या तरुणाईच्या बळावरच आज आपले पंतप्रधान ६ जी सर्वप्रथम भारतात आणण्याबद्दल ठामपणे सांगतात. चॅट-जीपीटी सारख्या ए आय प्लॅटफॉर्म मुळे माहितीच्या जगात मोठी क्रांती झाली आहे. जगातील सर्व बुध्दीमत्ता सार घेऊन ते आपल्याला हवा असलेली माहिती क्षणात उपलब्ध करून देते. लोकांच्या जीवनात ease of living आणण्याचं आहे आणि या नव्या संकल्पना आणि पेटंटस आदींना बळ देण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. लर्न, अनलर्न आणि रीलर्न या पद्धतीने आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या संबोधनात सांगितले की, Intellectual property rights मुळे नव्या संकल्पनांतून होणारा फायदा जगभरात पोहोचतो आहे. पेटंट हे संकल्पना आणि संशोधन यांना प्रोत्साहन देण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. नवे उद्योजक, तसेच अन्य क्षेत्रातील लोक यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा नवा प्रयत्न आपल्याला करायलाच पाहिजे. या विषयात कायदा सुध्दा बनला पाहिजे. नवनव्या आयडियाज आणि संशोधन यांना प्रोत्साहन दिलेच पाहिजे आणि ते या प्रयोगाने होईल यात शंका नाही असे मत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले.

तत्पूर्वी व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि माजी महापौर संदीप जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, पेटंट महोत्सवाची व्याप्ती इतकी होईल याचा विचार केला नव्हता. १२०० हून अधिक ४५० पेक्षा अधिक पेटंटस् आलेत. १०+ पेटंट नावावर असलेल्यांना जेव्हा शोधायला गेलो तेव्हा लक्षात आले की नागपूर शहरात एक व्यक्ती असे आहेत की ज्यांच्या नावावर ५२ पेटंट आहेत, त्याखालोखाल ३५ आहेत. त्यांनी पेटंट फेस्टच्या संपूर्ण उपक्रमाचा आढावा घेतला.

मुख्य कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘पेटंट फेस्ट’ या उपक्रमाला सहकार्य करण्याऱ्या सर्व प्रायोजकांचा मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये नागपूर महानगर पालिका, विश्वराज एन्व्हायर्नमेंट प्रायव्हेट लिमिटेड, वर्ल्ड ट्रेंड सेन्टर - नागपूर, हॉटेल अशोका, दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड, झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अश्मी समूह, गोएलगंगा समूह, 'एन्लायटन द सोल' चे राजकुमार चावला, पीआर टाइम्सचे निखिलेश सावरकर यांचा समावेश होता.

विशेष पुरस्कार डॉ. नितीन लाभसेटवार (जेष्ठ वैज्ञानिक, नीरी, नागपूर), ज्ञानेश्वर कांबळे (आयपीआर कन्सलटन्ट, टीसीएस) यांना सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते व्हिजन नेक्स्टच्या ‘पेटंट फेस्ट’ वरील सचित्र अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

यानंतर पुरस्कार प्रदान सोहळ्याला सुरुवात झाली. सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक दृष्टिकोन, नव्या संकल्पना आणि संशोधन यांकरिता ५ शैक्षणिक संस्थांना पुरस्कृत करण्यात आले. यामध्ये दत्ता मेघे महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागपूर, व्हीएसपीएम दंत महाविद्यालय, राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजनिअरिंग यांचा समावेश होता. 

नागपूर शहरातील १०+ पेटंट्स धारकांना देखील येथे गौरवण्यात आले. यामध्ये डॉ. अजय गदीछा, डॉ. पद्मनाभ गाडगे, निलेश आवटे, अजिंक्य कोटावार, संजय ढोबळे, विजय उपाध्ये, डॉ. जी. के. आवारी, डॉ. एस. ए. तेलंग, डॉ. एस. डी. ठाकरे, संदीप खेडकर, डॉ. राहुल पेठे, डॉ. भालचंद्र हरदास, डॉ. संदीप जोशी, डॉ. लोकेश हेडा यांचा सन्मान करण्यात आला.
तर सर्वोत्कृष्ट १० पेटंटसमध्ये
डॉ. अभय कोलते आणि चमू (इम्प्लांट प्लेसमेंट ड्राईव्ह), वेदांत पुल्लिवार (कॉम्पॅक्ट स्कूटर), शुभेंद्रसिंग ठाकूर (अर्ली डिटेक्शन ऑफ ओरल कॅन्सर), गणेश शेठ या अंड हरीश (बॅकवॉश+ क्लॉगिंग वॉटर), आकाश पोटे व मकरंद लोखंडे (सोलार कुकर), डॉक्टर नितीन लुटे व अंकुश (मायक्रोवेव्ह मेकॅनिकल फिबो), डॉक्टर अनिल ओंकार अप्रेटस ऑफ बेडरिडन, डॉक्टर अजित श्रीवास्तव (ग्राफाईन फ्रॉम वेस्ट बॅटरी), आलोक पाठक आणि सतीश कुलकर्णी केमिकल फ्री मेडिकल डिस्पोजेबल डॉक्टर आशिष बढिया आणि डॉक्टर नीती (फॉरेन्सिक बरण्ट डाटा एक्स्ट्रॅक्ट), डॉक्टर सचिन मरडागावणे, डॉक्टर रोशन साखरकर (फ्लेक्झिबल बर) यांना सर्वोत्कृष्ट आयडियाज विभागात तर डॉक्टर वृंदा कोलते (सुथर्स मटेरियल), डॉक्टर धनंजय तुटकाने (इंडक्शन मोटर फॉर फॅन), प्रज्वल ढोले (बायोडिग्रेडेबल वेस्ट ऑरेंज पिल्स), शुभम पाटील (युनिकनेक्ट), अमन पाटील आणि चमू (बियोंड ब्रेल मोबिलिटी जॅकेट), पवन कुमार (पोलाराइज्ड लाईट), शिरीष गवई (सक्शन बॅग दिस्पोजेबल), डॉ. अपूर्वा मिश्रा ( antiseptick dispensing surgical glow), देवयानी धोगोडे (३ d प्रिंटेड paws bone tissue), गरुडा-सार्थक,  पिंकी गंगवाणी (English to language special translator), मिस आर्या डगवार (एअर pollution) यांचा समावेश होता. ही सर्व बक्षिसे वेदिक (सेंटर ऑफ एक्सलंस फॉर स्किल डेव्हलपमेंट) यांच्याद्वारे प्रायोजित होती.

उपस्थित मान्यवर पाहुणे आणि बुद्धिवंत आणि दर्शकांचे आभार व्हिजन नेक्स्ट फाउंडेशनचे सचिव मनोज चव्हाण यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

शनिवार, ऑगस्ट १२, २०२३

 विजया बोरकर बनल्या महानिर्मितीच्या प्रथम महिला मुख्य अभियंता

विजया बोरकर बनल्या महानिर्मितीच्या प्रथम महिला मुख्य अभियंता

नागपूर:  विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्या रहिवाशी असलेल्या विजया रवींद्र बोरकर यांची महानिर्मितीच्या मुख्य अभियंता पदी निवड झाली असून महानिर्मितीमध्ये मुख्य अभियंता पदी महिला विराजमान होण्याची ही प्रथमच वेळ आहे. यापूर्वी उप मुख्य अभियंता या पदापर्यंत महिला अधिकाऱ्यानी काम केले आहे मात्र आता हा बहुमान प्रथमच विजया रवींद्र बोरकर यांनी पटकावला आहे. मुख्यालय मुंबई येथे मुख्य अभियंता(प्रकल्प व्यवस्थापन गट) येथे त्यांची पदस्थापना झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

विजया बोरकर यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून बी.ई.(इलेक्ट्रिकल्स) परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर नागपूर विद्यापीठातून ऊर्जा व्यवस्थापन प्रणालीत एम.टेक. परीक्षेत गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक पटकावला.

तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात सन १९९३ मध्ये कनिष्ठ अभियंता या पदी रुजू झाल्यानंतर कधी थेट भरतीद्वारे तर कधी पदोन्नतीवर महानिर्मिती कंपनीत विविध पदे भूषवित कोराडी आणि चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात त्यांनी विद्युत परिरक्षण, चाचणी, उपकरण व नियंत्रण विभागात विशेषतः वसाहत, २१० मेगावाट, ५०० मेगावाट येथे काम केले. वीज उत्पादन क्षेत्रातील संचलन व सुव्यवस्था विषयक तांत्रिक कामांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. मागील सुमारे दोन वर्षांपासून चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात उप मुख्य अभियंता २१० मेगावाट या पदाची धुरा त्यांनी यशस्वी सांभाळली आहे.

वीज क्षेत्रातील अग्रगण्य अश्या महानिर्मिती कंपनीमध्ये काम करीत असल्याचा त्यांना सार्थ अभिमान असून दररोज नवनवीन गोष्टी शिकायला मिळत असल्याने महानिर्मिती हे ज्ञानाचे विद्यापीठ असल्याचे विजया बोरकर यांनी सांगितले. त्यांना गायनाची आणि वाचनाची विलक्षण आवड आहे.

महिलांमध्ये काम करण्याची प्रचंड क्षमता आहे. सातत्य कधीही सोडू नका, कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, सहकारी पुरुष कर्मचाऱ्यांपासून स्वत:ला वेगळे समजण्याची गरज नाही. जर तुम्ही कष्टाळू असाल, स्वप्रेरित असाल तर यश तुमचेच आहे असा व्यक्तिगत संदेश त्यांनी महानिर्मितीमध्ये कार्यरत महिला भगिनींना या निमित्ताने दिला आहे.
वसंतवादी साहित्य संमेलन म्हणजे काय? आजपासून नागपुरात आयोजन |  Vasantist Gor Banjara Sahitya Sangh

वसंतवादी साहित्य संमेलन म्हणजे काय? आजपासून नागपुरात आयोजन | Vasantist Gor Banjara Sahitya Sangh

गोर बंजारा साहित्य संघाच्या वतीने तिसरे वसंतीवादी साहित्य संमेलन आज

नागपूरात तिसरे वसंतवादी साहित्य संमेलन होणार



नागपूर : गोर बंजारा साहित्य संघ, भारत च्यावतीने शनिवार दि.१२ ऑगष्ट रोजी राष्ट्रभाषा कार्यालय, अंबाझरी रोड, वोक्हार्ट हॉस्पीटलच्या मागे, (शंकर नगर चौक) नागपूर येथे या वर्षीचे तिसरे वसंतवादी साहित्य संमेलन संमेलनाध्यक्ष प्रा.जे.डी.जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, संमेलनाचे उद्घाटक दिनबंधू सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितिनदादा सरदार करणार आहे.
3rd Vasantist Literary Conference today on behalf of Gor Banjara Sahitya Sangh


तर प्रथमच साहित्य संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाशभाऊ जाधव या साहित्य संमेलनाची बीजभूमिका मांडणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॅनियल राणा विचारमंचावर माजी खा.हरिभाऊ राठोड,गोर बंजारा साहित्य संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवलकिशोर ऊर्फ नामा नायक, अड. राकेशभाऊ राठोड, नंदू पवार, महंत संजय महाराज, नागपूर नगरीचे नायक आत्माराम चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते प्रा.टि.व्ही.राठोड, भाजप नेत्या जयश्रीताई राठोड, साहित्य संघाचे राष्ट्रीय महासचिव सिताराम राठोड, राष्ट्रीय कोषाध्यक्ष शेषराव चव्हाण, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एन.डी.राठोड, अमरावती विभागीय अध्यक्ष डॉ. मनोजभाऊ राठोड, शेतकरी नेते मनोहर राठोड उपस्थित राहणार आहेत. नाईक साहेबाचे शिक्षण नागपूरातच झाले, तसेच वैवाहिक जिवनाची सुरुवात सुद्धा त्यांनी नागपूरातूनच केली. नाईक साहेबांचे कार्य बंजारा समाजापुरतेच मर्यादित नसुन; तर सर्वच समाज घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य हे एक अनमोल ठेवाच आहे. नाईक साहेबांच्या कार्याला उजाळा मिळण्यासाठी आणि समाजातील नवतरुण व नव साहित्यिकांना प्रेरणा मिळण्यासाठी गोर बंजारा साहित्य संघ भारत च्या वतीने महाराष्ट्रात दरवर्षी वसंतवादी साहित्य संमेलनाचे आयोजन केल्या जाते. सदर संमेलन हे तीन सत्रात संपन्न होणार आहे. पहिल्या सत्रात उदघाटनासह, संमेलनाध्यक्षाचे मार्गदर्शन लाभणार आहे. दुसऱ्या सत्रात गोर शिकवाडी साहित्य दळाचे संयोजक रतनकुमार राठोड, राहूल सिंधू पालतीया, प्रा.रवि राठोड, अशोक पवार,सायरे सर वसंतरावजी नाईक साहेबांच्या सामाजिक, राजकिय कार्यावर प्रकाश टाकणार आहे. तर तिसरे सत्रात हास्यकवि सुरेशभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 'कवी संमेलन' पार पडणार आहे. गोर बंजारा साहित्य संघातर्फे आता पर्यंत तीन राष्ट्रीय स्तरावरील संमेलने झाली असून राज्यस्तरावरील हे साहित्य संघाचे तिसरे संमेलन आहे. साहित्य क्षेत्रात बंजारा समाजात काम करणारी गोर बंजारा साहित्य संघ,भारत ह्या संघटनेचे कार्य व्यापक स्वरूपात असून या संघटनेद्वारे राष्ट्रीय स्तरावर भारतभर साहित्य संमेलने आयोजित केली जातात. शानिवारी होणाऱ्या या संमेलनात लातूर, नांदेड, औरंगाबाद, यवतमाळ, अकोला, नंदूरबार,पुणे, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली तसेच नागपूरचे साहित्य प्रेमी, प्रतिनिधी हजर राहतील. या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी साहित्य संघाचे राष्ट्रीय संघटक पत्रकार मनोहर चव्हाण जल्लोषपूर्ण वातावरणात करीत आहे. असे संमेलनाचे मुख्य संयोजक पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.
👆🏾

बुधवार, ऑगस्ट ०९, २०२३

क्रांतीदिनी राष्ट्रसंतांच्या या कार्याची झाली आठवण | Tukdoji maharaj krantidin

क्रांतीदिनी राष्ट्रसंतांच्या या कार्याची झाली आठवण | Tukdoji maharaj krantidin

९ ऑगस्ट क्रांतीदिन श्री गुरुदेव सेवाश्रम साजरा




श्री गुरुदेव सेवाश्रम, नागपूर येथे ९ आँगस्ट क्रांतीदिन निमित्याने क्रांती लढ्याचे रणशिंग या कार्यक्रमाचे आयोजन करुन क्रांतीविरांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सुरेंद्र बुराडे होते त्यांनी ९ आँगस्ट १९४२ च्या स्वातंत्र लढ्यामधे सामील होऊन सर्व सामान्य शेतकरी, कष्टकरी समाजाला लढ्यासाठी प्रेरित केले. अब काहे धुम मचाते, आते है नाथ हमारे पथ्थर सारे बॉम्ब बनेगे भक्त बनेगी सेना असा ईग्रंज सरकारला ईशारा दिला.महाराजांच्या प्रेरणेने गावोगावी आंदोलने झाली परिणामस्वरुप महाराजांना अटक होऊन नागपूर व नंतर रायपुर जेलला रवानगी झाली. माजी पोलीस निरीक्षक श्रीराम सरोदे यांनी त्यांचे वडील सुद्धा महारांजांच्या प्रेरणेने घर दाराची कुटुंबाची पर्वा न करता स्वातंत्र लढ्यात सामील झाले त्यामुळेच पोलीस खात्याची नौकरी स्विकारुन जनतेची सेवा केली.अशी माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड.अशोक यावले यांनी तुकडोजी महाराज क्रांतीकारी संत होते.त्यांच्या राष्ट्रीय क्रांतीकारी भजनामुळे सर्वसामान्य जनता लढ्यात सामील झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपराव वाघ यांनी तर संचलन राजेश कुंभलकर व आभार सीयाराम चावके यांनी मानले. कार्यक्रमाला राजेंद्र पवार, विठ्टलराव तळवेकर, पाडुरंग कडु,मुरलीधर नरड, अशोक काकडे, नंदु लेकुरवाळे, गणराज बसेशंकर, रामचंद्र राऊतउपस्थित होते.
PM किसानमध्ये रजिस्ट्रेशन करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा | PM-Kisan Samman Nidhi

PM किसानमध्ये रजिस्ट्रेशन करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा | PM-Kisan Samman Nidhi

PM किसानमध्ये रजिस्ट्रेशन करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा | PM-Kisan Samman Nidhi 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-नोंदणी सुरू 

7 ते 15 ऑगस्ट या कालावधीत गावपातळीवर विशेष मोहीमेचे आयोजन



प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रति हप्ता प्रमाणे सहा हजार रुपये प्रति वर्षी लाभ देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्याकरिता तत्काळ ई-केवायसी व बँक खाते आधार लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

या योजनेच्या 15व्या हप्त्याचा लाभ ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023 मध्ये जमा होणार आहे. केंद्र शासनाने 15व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थीनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणे व ईकेवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या करीता 7 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत गावपातळीवर विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. 

यासाठी लाभार्थीचे खाते असलेल्या बँकेत आधार व मोबाइल क्रमांकाच्या आधारे बँक खाते आधार क्रमांकास जोडून घ्यावे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत (IPPB) मार्फत विनामुल्य बँक खाती उघडण्याची सुविधा गावातच उपलब्ध आहे. लाभार्थीनी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्राच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडीया पोस्ट पेमेंट्स बँकेत खाते उघडावे. पी.एम किसान ई-केवायसी प्रमाणीकरणासाठी पी.एम किसान पोर्टलवरील ‘Farmer Cornerʼ पर्यायावर जाऊन मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीच्या आधारे लाभार्थी स्वत. ईकेवायसी करू शकतात किंवा जवळच्या सामायिक सुविधा केंद्रावर जाऊन ई-केवायसी करु शकतात. केंद्र शासनाचे "PMKISAN GOI" या नावाचे गुगल प्लेस्टोअर वर उपलब्ध असलेले ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून चेहरा प्रमाणीकरण करून लाभार्थीना स्वत:चे ई-केवायसी करता येणार आहे. 15व्या हत्याचा लाभ घेणेकरीता लाभार्थी शेतकऱ्यांनी केंद्र शासनाने बंधनकारक केलेल्या सर्व बाबींची पूर्तता करून घ्यावी. प्रलंबित यादी प्रत्येक ग्रामपंचयात येथे दर्शविण्यात येणार आहे. काही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन नागपूर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक राजेंद्र साबळे यांनी केले आहे. 

पीएम किसान सम्मान निधि चेक मोबाइल नंबर पीएम किसान आधार नंबर किसान सम्मान निधि योजना लिस्ट किसान सम्मान निधि का पैसा प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना कब शुरू हुई पीएम किसान सम्मान निधि योजना अप्लाई किसान सम्मान निधि योजना लिस्ट 2023 pm kisan.gov.in registration

मंगळवार, ऑगस्ट ०८, २०२३

नागपूरात पहिल्यांदाच होणार महायोगोत्सव; वाचा काय काय कार्यक्रम होणार Mahayogotsava

नागपूरात पहिल्यांदाच होणार महायोगोत्सव; वाचा काय काय कार्यक्रम होणार Mahayogotsava

*नागपूरत पहिल्यांदाच होणार राज्यस्तरीय महायोगोत्सव संमेलन ऑक्टोबर ला*

*२०२३ च्या महायोगोत्सव संमेलनात राज्यातील योगशिक्षकांचा सहभाग..




नागपूर : योगा फाउंडेशन, महाराष्ट्र संचालित महाराष्ट्र राज्य योगशिक्षक संघ आयोजित बहुप्रतीक्षेत असलेले दुसरे राज्यस्तरीय योगशिक्षक संमेलन 'महायोगोत्सव २०२३' चे नागपूर येथे होणार असल्याचे आवाहन राज्य संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष डा. मनोज निलपवार यांनी केले.Mahayogotsava


नाशिक येथे १० व ११ डिसेंबरला पहिले संमेलन नुकतेच पार पडले. तर नागपूर येथे होऊ घातलेले २०२३ चे दुसरे संम्मेलनात राज्यातील शेकडो योगशिक्षकांच्या उपस्थितीत महायोगोत्सव २०२३ चे संमेलन नागपूरकरांसाठी सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्हयांमधील हजार पेक्षा अधिक साधक उपस्थित राहणार आहेत. योगाचा प्रचार व प्रसारच्या हेतूने प्रथमच अशाप्रकारचे राज्यस्तरीय संमेलन नागपूर शहरात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नियोजन समितीचे अध्यक्ष विनायक बारापात्रे यांनी दिली.Mahayogotsava


२०२३ च्या संमेलनात योगाच्या शास्त्रीय ज्ञानाचा प्रचार व प्रसार व्हावा, जास्तीत जास्त योगशिक्षक तयार व्हावेत, समाजामध्ये आरोग्यासंबंधी जाणीव जागृती निर्माण व्हावी, योगशिक्षकांच्या अडीअडचणी शासन दरबारी पोहोचवून त्यांचे निराकरण व्हावे, या बहुविध उद्देशाने हा महायोगोत्सव मेळावा घेण्यात येत आहे. यामध्ये तज्ज्ञांची व्याख्याने, योगाशी संबंधित प्रात्यक्षिके, संशोधनपर निबंध, संगीत रजनी या संमेलनात भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. अशी माहिती योगा फाउंडेशन, महाराष्ट्र संचालित, महाराष्ट्र योगशिक्षक संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष डाॕ मनोज निलपवार यांच्या प्रेरणेने, राज्य नियोजन समितिचे अध्यक्ष विनायक बारापत्रे, सदस्य शरद बजाज, प्रसाद कुलकर्णी, चंद्रकांत अवचार, राहुल येवला, कृणाल महाजन, संतोष खरटमोल, अंजली देशपांडे, चंद्रज्योती दळवी, मनिषा चौधरी, अनुराधा इंगळे, प्रांजली लागू, राज्य मिडिया प्रभारी दिलीप ठाकरे, महासचिव अमित मिश्रा नागपूर नियोजन समितीचे अध्यक्ष लता होलगरे यांनी दिली. स्थानिक नियोजन समिती,नागपूर जिल्ह्य़ा अध्यक्ष पुरुषोत्तम थोटे,महासचिव राजेश यादव, कोषाध्यक्ष उषा हिंदारिया,छगन ढोबळे (योग मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य), तानाजी कडवे (नागपूर शहर अध्यक्ष), शंकरजांभुळकर (उपाध्यक्ष), संगीता मिश्रा (उपाध्यक्ष), मनोहर पाल (नियोजन कर्ता), राजेश धरमठोक (सचिव) वैशाली श्रिगीरवार (संघटन सचिव) अनिल मोहगांवकर (आंतरराष्ट्रीय योगासन परिक्षक) भुषन टाके (योगासन परिक्षक) सुनील मोहड (जिल्हा मिडिया प्रभारी )
वंजारी फाऊंडेशनच्या जॉब कार्ड विषयी माहिती आहे का? नोकरीसाठी होणार फायदा | Job Card

वंजारी फाऊंडेशनच्या जॉब कार्ड विषयी माहिती आहे का? नोकरीसाठी होणार फायदा | Job Card



नागपूर: गुरूवार दि.10 ऑगष्ट 2023 रोजी नागपूर विभागांतर्गत सर्व जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाखेतील पदवीधर युवकांसाठी गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने जॉब कार्ड वितरणाचा कार्यक्रम होऊ घातला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊजी पटोले यांच्या शुभहस्ते होणार असून मुख्य अतिथी म्हणून नागपूर शहर कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, नागपुरचे जिल्हाधिकारी डॉ. नितीन इटनकर तसेच पोलीस आयुक्त अमितेशकुमारजी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

Job Card Distribution Program on behalf of Govindrao Vanjari Foundation

स्व.आमदार गोविंदरावजी वंजारी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार अँड.अभिजित गो. वंजारी यांची आहे. तसेच याप्रसंगी देशातील सर्व प्रकारच्या युपीएससी, एमपीएससी, बँकीग, रेल्वे, सहकार क्षेत्र, तत्सम प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची अचूक व महत्वपूर्ण माहिती असणान्या अभ्यासिकेचे विमोचन सुध्दा याप्रसंगी होणार आहे. गोविंदराव वंजारी फाऊंडेशन व पुण्यातील जॉब फेअर इंडियाच्या संयुक्त विद्यमाने जॉब कार्ड वितरणाचा कार्यक्रम आयोजित कैलेला आहे. यामध्ये राज्यातील व देशातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकरीची संधी बेरोजगार पदवीधरांना उपलब्ध होणार असून यामध्ये सर्व प्रकारचे पदवीधर त्यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, लॉ, बी.ए., बी.कॉम., बी.एससी, बीबीए, बीसीसीए, बीसीएस तसेच अनेक प्रकारच्या पदवीधरांचा समावेश करण्यात आलेला आहे.

या जॉब कार्डच्या माध्यमातून कार्ड अक्टीवेट झाल्यानंतर त्या पदवीधर युवकाला वर्षाच्या 365 दिवसापैकी किमान दोनशेपेक्षा अधिक दिवस दररोज एसएमएस द्वारे वेगवेगळ्या कंपनीतील नोकरीची माहितीची उपलब्धता होणार असून या माध्यमातून होतकरू अशा पदवीधर युवकांना योग्य ठिकाणी सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. आतापर्यंत या जॉब कार्डकरिता 10000 पेक्षा अधिक युवक-युवतींनी Abhijitwanjarri.jobfairindia.in या लिंकवर रजिस्ट्रेशन केलेले आहे. तसेच अजूनही या लिंकद्वारे विद्यार्थ्यांना या सुवर्णसंधीमध्ये सहभाग घेता येईल. असे आवाहन पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी केले आहे.

सोमवार, ऑगस्ट ०७, २०२३

कौतुकास्पद : प्रा. डॉ. रोहित गुप्ता यांना केंब्रिज विद्यापीठाची पीएचडी Commendable : Prof. Dr. Rohit Gupta holds a PhD from Cambridge University

कौतुकास्पद : प्रा. डॉ. रोहित गुप्ता यांना केंब्रिज विद्यापीठाची पीएचडी Commendable : Prof. Dr. Rohit Gupta holds a PhD from Cambridge University

दादासाहेब बालपांडे महाविद्यालयातील प्रा.डॉ. रोहित गुप्ता यांना प्रतिष्ठित केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी पदवी




नागपूर : दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी, बेसा, नागपूर येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. रोहित गुप्ता, यांनी प्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठातून प्रतिष्ठित डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएचडी) पदवी मिळवून एक विलक्षण शैक्षणिक टप्पा गाठला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी डॉ. गुप्ता यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात अतुट समर्पण, चिकाटी आणि बौद्धिक तेज यांचा पुरावा आहे. 2018 मध्ये डॉ. गुप्ता यांनी प्रतिष्ठित डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएचडी) कार्यक्रमाला स्वीकृती दिली. भारताचे पहिले पंतप्रधान श्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाखाली प्रतिष्ठित केंब्रिज ट्रस्टने याकरिता पूर्णपणे निधी उपलब्ध करून दिले आहे. डॉ. गुप्ता यांनी अथक प्रयत्न करून आपली उत्कृष्टतेचा प्रदर्शन केला आहे. डॉ. गुप्ता यांनी हाती घेतलेल्या संशोधन प्रकल्पाला यूकेच्या आघाडीच्या फार्मास्युटिकल उद्योगांनी, म्हणजे SoseiHeptares आणि GlaxoSmithKline (GSK) द्वारे पाठबळ दिले आणि त्यांच्या कार्यात लक्षणीय भर घातली.
डॉ. गुप्ता यांनी वर्ष २००९ पासून दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी, बेसा, नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. येथे डॉ. गुप्ता यांनी आपल्या जीवनातील आठ मौल्यवान वर्षे समर्पित करून पुढच्या पिढीच्या विद्वानांना मार्गदर्शन केले आणि त्यांना प्रेरणा दिली.

केंब्रिज युनिव्हर्सिटीत असताना, डॉ. गुप्ता यांनी त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रासाठी अतुलनीय वचनबद्धता आणि उत्कटता दाखवून, इन्फ्लेमेटरी बोवेल डिसीज (IBD) आणि इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) असलेल्या रूग्णांमध्ये वेदना उपचारांवर लक्ष केंद्रित करून अत्याधुनिक संशोधनात स्वतःला मग्न केले. डॉ. गुप्ता यांनी लिहिलेले शोधनिबंध, प्रतिष्ठित जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आणि कॉन्फरन्समध्ये सादर केले गेले, त्यांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण अंतर्दृष्टीसाठी प्रशंसा मिळविली आहे. केंब्रिज विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करणे हे डॉ. गुप्ता यांच्या अथक परिश्रमांचे पराकाष्ठेचे प्रतिनिधित्व करते आणि एक विचारवंत आणि नवोदित म्हणून आशादायक कारकीर्दीची सुरुवात करते. डॉ. गुप्ता यांनी जटिल वैद्यकीय आव्हानांना तोंड देऊन आणि फार्मास्युटिकल संशोधन क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपाय शोधून समुदायाची सेवा करण्याची योजना आखली आहे.

दादासाहेब बालपांडे कॉलेजचे संस्थाप्रमुख श्री मनोजजी बालपांडे यांनी डॉ. रोहित गुप्ता यांचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उज्वला महाजन व पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन दूमोरे यांनी डॉ. रोहित गुप्ता यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

शनिवार, ऑगस्ट ०५, २०२३

 सावधान! वीजबिलासंदर्भातील बनावट एसएमएस | MSEDCL | cybercrime

सावधान! वीजबिलासंदर्भातील बनावट एसएमएस | MSEDCL | cybercrime

सावधान! वीजबिलासंदर्भातील बनावट एसएमएस | MSEDCL | cybercrime


नागपूरदि. 5 ऑगस्ट 2023: गेल्या महिन्याचे वीज बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट मेसेज नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. यात वीज बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगितले जाते. त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाइल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी अशा बनावट मेसेजकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

 

महावितरणकडून केवळ मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टमद्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीतांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कमस्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहनमीटर रीडिंग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्यावीजबिलाची रक्कम देय दिनांकवीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती एसएमएसद्वारे पाठविण्यात येते. तसेच अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाइलवर संपर्क करण्याबाबत कळवत नाही. वीज बिलाबाबत काही शंका व तक्रारी असल्यास किंवा याबाबत काही एसएमएस आल्यास वीजग्राहकांनी 24 तास सुरु असलेल्या टोल फ्री क्रमांक किया नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावाअसे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

 

काळजी घ्याफ़सवणूक टाळा:

 

·       महावितरण तुम्हाला कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगत नाही

·       महावितरण केवळ VM-MSEDCL/VK-MSEDCL/AM-MSEDCL/JM-MSEDCL सारख्या SENDER ID वरून एसएमएस पाठवते आणि कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून एसएमएस व व्हॉटस्अॅप मेसेजइ-मेल पाठविण्यात येत नाहीत.

·        (SENDER ID मधील पहिली 2 अक्षरे ऑपरेटर आणि स्थान दर्शवितात जिथून संदेश पाठवला जात आहे आणि तो MSEDCL वर समाप्त होतो.)

·       बिलाच्या पेमेंटसाठी लिक किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाउनलोड करू नये.

·       मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधू नये.

·       ऑनलाइन पेमेंट करताना कोणत्याही परिस्थितीत तुमचा मोबाइल किंवा डेस्कटॉप स्क्रीन किंवा तुम्हाला मिळालेला OTP शेअर करू नका. ग्राहक जवळच्या सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार / एफआयआर नोंदवू शकतो किंवा राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टल "https://cybercrime.gov.inवर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतो.

·       अधिक माहिती / प्रश्नांसाठीग्राहक 1912/19120/1800-201-3435/1800-233- या अधिकृत टोल फ्री नंबरवर संपर्क करू शकतात.



 

 भरकोर्टात न्यायधिशानी दिला राजीनामा; कारण वाचून.... | Nagpur Justice Rohit Dev

भरकोर्टात न्यायधिशानी दिला राजीनामा; कारण वाचून.... | Nagpur Justice Rohit Dev

Nagpur Justice Rohit Dev  | नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश रोहित देव यांनी कोर्टरूममध्येच दिला राजीनामा

rohit deo nagpur highcourt

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश रोहित देव ( Justice Rohit Dev ) यांनी भर कोर्टरूममधे राजीनामा दिल्याची घटना घडली आहे. आज सकाळी नागपुरातील खंडपीठात कोर्टरूममधे आल्यानंतर त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. गुरूवारी त्यांची मुंबई उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली कऱण्यासंदर्भात सूचना प्राप्त झाली होती. त्यावर व्यथित होऊन रोहित देव यांनी राजीनामा दिला असावा अशी चर्चा आहे.


न्यायमूर्ती रोहित देव हे (Justice Rohit Dev) शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणेच नागपूर खंडपीठाच्या कोर्ट रूममध्ये आले आणि त्यांनी कोर्टरूममधल्या उपस्थितांसमोर आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या घोषणेनंतर कोर्टरूममधील सर्वजण आश्चर्यचकित झाले. मी कोर्ट रूममधल्या उपस्थितांची दिलगिरी व्यक्त करतो, माझ्या वागण्यामुळं कुणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असं म्हणून न्यायमूर्ती रोहित देव तिथून निघून गेले. 


एका वकिलाच्या म्हणण्यानुसार, न्यायमूर्ती देव म्हणाले, “न्यायालयात उपस्थित असलेल्या तुम्हा सर्वांची मी माफी मागतो. मी तुमाला शिव्या देतो कारण तू सुधारावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही सर्वजण माझ्या कुटुंबासारखे आहात म्हणून मला तुमच्यापैकी कोणाचेही मन दुखवायचे नाही परंतु मी माझा राजीनामा सादर केला आहे हे कळविण्यास मला खेद होत आहे. मी माझ्या स्वाभिमानाच्या विरोधात काम करू शकत नाही. तुम्ही लोक खूप मेहनत करा."


न्यायमूर्ती देव rohit deo nagpur highcourt यांनी नंतर पत्रकारांना सांगितले की, मी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला आहे आणि त्यांचे राजीनामा पत्र राष्ट्रपतींना पाठवले आहे. 

गेल्या वर्षी न्यायमूर्ती देव यांनी दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबा यांची कथित माओवादी संबंधांच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती.  सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती देत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला या प्रकरणी नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते.

न्यायमूर्ती देव यांनी महाराष्ट्र सरकारच्या ३ जानेवारीच्या शासन निर्णयाच्या (जीआर) अंमलबजावणीला स्थगिती दिली होती. या प्रस्तावाद्वारे नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या बांधकाम किंवा अंमलबजावणीच्या कामात गुंतलेल्या कंत्राटदारांकडून गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी महसूल विभागाची दंडात्मक कारवाई रद्द करण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्यात आले. rohit deo nagpur highcourt

न्यायमूर्ती देव यांची जून 2017 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि डिसेंबर 2025 मध्ये ते निवृत्त होणार होते.


#nagpur #highcourt #justice #rohitdev #courtroom

सोमवार, जुलै ३१, २०२३

इंग्लिश खाडी पोहून आशियाई साहसी जलतरणात  विक्रम; जयंत दुबळेचे स्वागत

इंग्लिश खाडी पोहून आशियाई साहसी जलतरणात विक्रम; जयंत दुबळेचे स्वागत




दिनांक 18 व 19 जुलै 2023 या दरम्यान इंग्लंडची जगप्रसिद्ध असलेली इंग्लंडची इंग्लिश खाडी- इंग्लंड ते फ्रान्स व फ्रान्स ते इंग्लंड असे टू वे 70 किलोमीटरचे अंतर 31 तास 29 मिनिटांमध्ये जयंत व त्याच्या टीमने पोहून नागपूरचे नाव आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणामध्ये अंकित केले आहे.
     रेल्वे स्थानकावर जयंत जयप्रकाश दुबळे चे8 आज आगमन झाले. याप्रसंगी द्रोणाचार्य अवार्डी विजय  मुनीश्वर प्राचार्य डॉ. विजय दातारकर, डॉ. संभाजी भोसले , प्रा. शाम फाळके,मंगेश जी  डुके, निखिलेश सावरकर,  डॉ. सुरेश चांडक, ॲड. अर्चना मेंडुले,  क्रीडा अधिकारी माया दुबळे,  ॲड. भूमीता  सावरकर, श्री संजीव गरजे, विलास शिंदे, राहुल सलामे, श्री सुभाष लांडे, रामेश्वर लिखार,   सुशील  दूरगकर, ऐश्वर्या दुबळे, प्राजक्ता दुबळे, आशिष आढाव व शेकडो  जलतरणपटू, खेळाडू , क्रीडा संघटक यांन रेल्वे स्टेशनवर ढोल ताशा सह जयंत व भारतीय संघाचे स्विमिंग कोच डॉ. जयप्रकाश दुबळे यांचे  भव्य स्वागत केले.

       इंग्लिश खाडी  पोहण्याची तयारी गेल्या तीन वर्षापासून सुरू होती , आज ही इंग्लिश खाडी पोहून मला  अतिशय आनंद होत आहे, नागपूर मधूनही असे सागरी जलतरणपटू तयार व्हावेत, त्याकरिता  मी प्रयत्नशील राहणार आहे , असे  जयंतने याप्रसंगी सांगितले .

      नागपूर जिल्हा हौशी जलतरण संघटना ,मोहता स्पोर्ट्स अकॅडमी, भोसले व्यायाम शाळा, डॉल्फिन स्विमिंग क्लब जेडी स्पोर्ट्स फाउंडेशन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्विमिंग व सर्व उपस्थित  त्यांचे   आभार आंतरराष्ट्रीय स्विमिंग कोच डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी  मानले.

सोमवार, जुलै १७, २०२३

नागपुरातील "हा" पूल होणार इतिहासजमा; 19 पासून "या" मार्गात वाहतूक बंद  Railway Station Flyover Demolitio

नागपुरातील "हा" पूल होणार इतिहासजमा; 19 पासून "या" मार्गात वाहतूक बंद Railway Station Flyover Demolitio



नागपूर : बहुप्रतिक्षित टेकडी उड्डाणपूल पाडण्याचे कार्य महा मेट्रो 19 जुलै 2023 (बुधवार) पासून हाती घेणार आहे. उड्डाणपुलाखालील दुकाने रिकामी करून स्थलांतरित करण्यात आली असून नागपूर महानगरपालिकेने बांधकाम पाडण्यास महा मेट्रोला परवानगी प्रदान केली आहे.

उड्डाणपूल पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात असून विशिष्ट ठिकाणी डायव्हर्शन बोर्ड आणि बॅरिकेड्स महा मेट्रोच्या वतीने लावण्यात आले आहेत. नागपूर पोलिस, वाहतूक विभागाने वाहनांची वाहतूक वळवण्यासाठी आवश्यक परवानगी दिली आहे. उड्डाणपूल पाडण्याच्या कार्या दरम्यान या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातील.

812-मीटर-लांब आणि 10.5 मीटर रुंद टेकडी उड्डाणपूल 2008 मध्ये 16.23 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला होता. उड्डाणपुलाखाली एकूण १७५ दुकाने बांधण्यात आली होती, परंतु जयस्तंभ चौक परिसरातील वाहतूक कोंडी लक्षात घेता व वाहतुकीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जयस्तंभ चौकाच्या आजूबाजूच्या रस्त्याच्या परिसरात योग्य ते बदल करण्याचे प्रस्तावित करत योजना आखण्यात आली ज्यामध्ये किंग्जवे येथे वाय शेप उड्डाणपूल आणि सध्याच्या लोहा पुलाजवळ रेल्वे-अंडर-ब्रिज (RuB) प्रस्तावित करण्यात आला. या दोघांसह उड्डाणपूल पाडून या ठिकाणी रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल टेक्नॉलॉजी (VNIT) द्वारे संपूर्ण प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली.

सदर विकास कार्याचा अहवाल 2018 मध्ये सादर करण्यात आला आणि त्यानंतर संपूर्ण काम महा मेट्रो मेट्रोला डिपॉझिट वर्क तत्त्वावर देण्यात आले. त्यानुसार किंग्जवे फ्लायओव्हर आणि आरयूबी बांधण्यात आले व 1 एप्रिल २०२३ रोजी उद्घाटन करण्यात आले. व्हीएनआयटीच्या अहवालानुसार, जयस्तंभ आणि मानस चौकला जोडणारा रेल्वे स्थानकासमोरील सध्याचा उड्डाणपूल एट-ग्रेड सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यासाठी पाडणे आवश्यक आहे.

उड्डाणपूलखाली काम करणाऱ्या दुकानदारांना सामावून घेण्यासाठी महा मेट्रोने 111 दुकाने बांधली आणि ती त्यांना वाटपासाठी महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आली. दुकानदारांनी कायदेशीर हस्तक्षेपाची मागणी केली होती ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यास विलंब झाला मात्र, उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या दुकानदारांनी आता आपले कामकाज वळवल्या नंतर महापालिकेने उड्डाणपूल पाडण्याची तयारी दर्शवली आहे.
मेट्रोचे प्रकल्प (संचालक) श्री राजीव त्यागी यांनी सांगितले कि, एनसीसी ( NCC) द्वारे मेसर्स मॅटच्या माध्यमातून उड्डाणपूल पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. उल्लेखनीय आहे कि मेसर्स मॅट या एजंसीने वर्धा रोडवरील छत्रपती चौक येथील उड्डाणपूल पाडला होता. ``टेकडी उड्डाणपूल पाडण्याची प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण होणार असून हवामानाच्या परिस्थितीनुसार यामध्ये विलंब होऊ शकतो. उड्डाणपूल पाडण्याचे कार्य फुटपाथ ब्रेकर प्रक्रियेद्वारे केल्या जाणार असल्याचे श्री. त्यागी यांनी सांगितले.

*ट्रॅफिक प्लॅन पुढील प्रमाणे :*
सेंट्रल एव्हेन्यूकडून एलआयसी किंवा आरबीआय चौककडे जाणारी वाहतूक आणि त्याउलट, वाहतूक पूर्वी प्रमाणे कार्यरत असेल.
एलआयसी किंवा आरबीआय चौककडून सेंट्रल एव्हेन्यू किंवा रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहतूकी मध्ये देखील कुठलाही बदल करण्यात आला नाही.
सेंट्रल एव्हेन्यू येथुन प्रवास करणार्यां ना आणि रेल्वे स्थानकाकडे जायचे आहे त्यांना पूर्वीप्रमाणेच डावीकडे वळण घेऊन त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचावे लागेल.
उड्डाणपुलावरून जयस्तंभ चौक आणि मानस चौक कडे जाण्यास बंदी असेल.



• *Maha Metro Nagpur to Start Railway Station Flyover Demolition from 19th July*

NAGPUR: The much-awaited demolition of Tekdi Fly–over will be undertaken by Maha Metro Nagpur from 19th July 2023 (Wednesday).The shops under the flyover have been vacated and shifted. The Nagpur Municipal Corporation (NMC) has given its go-ahead for the demolition.

All necessary precautions are being taken for demolition, with diversion boards and barricades being put up at specific locations. The traffic department, Nagpur Police have given the necessary permission for diversion of vehicular traffic. Security personnel will be deployed at the site, during the demolition stage.
The 812-meter-long and 10.5 meter broad Tekdi flyover was constructed in 2008 at a cost of ₹ 16.23 crore. Over all 175 shops were constructed under the flyover. However, considering the traffic bottleneck at Jai Stambh Square area, it was proposed to make suitable changes in the entire stretch of road surrounding Jai Stambh Square to address this traffic problem.

Accordingly a plan was devised and 2-arm flyover along Kings Way and a Rail-under-Bridge (RuB) near existing Loha Bridge was proposed. Along with these two, it was also decided to demolish the fly-over and instead construct road there. The entire proposal was vetted and cleared by Visvesaraya Institute of National Technology (VNIT).

The report was submitted in 2018 and subsequently the entire work was allotted to Nagpur Metro on deposit work basis. Accordingly the Kings Way flyover and RuB was constructed and later inaugurated on 1st April early this year. As per the VNIT report, the existing Flyover opposite Railway Station, which connects Jai Stambh and Manas Square has to be demolished to pave way for construction of at-grade cement concrete road.

To accommodate shop-keepers operating under Fly-over, Maha Metro constructed 111 shops and handed over the same to NMC for allotment to them. The shop-keepers had sought legal intervention leading to delay in execution of the entire process. However, the shop-keepers below the Flyover have now shifted their operations and NMC has given its go ahead for demolition of the Flyover.
The demolition would be undertaken by NCC through Messer Matte. In fact, the same agency had demolished Chhatrapati Square Flyover, on Wardha Road. ``The entire demolition process should be over in 15 days and could be delayed depending on prevailing weather conditions. The demolition would be undertaken by Disintegration of Concrete by Pavement Breaker Process,’’ confirmed Shri Rajeev Tyagi, Project Director, Maha Metro.

 *Traffic Plan:*
• The traffic from Central Avenue towards LIC or RBI Square and vice versa, would continue as it is.
• The traffic from LIC or RBI Square towards Central Avenue or Railway Station too would remain unaffected.
• Those travelling from Central Avenue and wanting to move towards Railway Station have to take left turn and reach their destination, as before.
• Vehicular movement on Flyover from either side - Jai Stambh Square and Manas Square will be prohibited.