गोर बंजारा साहित्य संघाच्या वतीने तिसरे वसंतीवादी साहित्य संमेलन आज
नागपूरात तिसरे वसंतवादी साहित्य संमेलन होणार
नागपूर : गोर बंजारा साहित्य संघ, भारत च्यावतीने शनिवार दि.१२ ऑगष्ट रोजी राष्ट्रभाषा कार्यालय, अंबाझरी रोड, वोक्हार्ट हॉस्पीटलच्या मागे, (शंकर नगर चौक) नागपूर येथे या वर्षीचे तिसरे वसंतवादी साहित्य संमेलन संमेलनाध्यक्ष प्रा.जे.डी.जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, संमेलनाचे उद्घाटक दिनबंधू सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितिनदादा सरदार करणार आहे.
3rd Vasantist Literary Conference today on behalf of Gor Banjara Sahitya Sangh
तर प्रथमच साहित्य संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाशभाऊ जाधव या साहित्य संमेलनाची बीजभूमिका मांडणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॅनियल राणा विचारमंचावर माजी खा.हरिभाऊ राठोड,गोर बंजारा साहित्य संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवलकिशोर ऊर्फ नामा नायक, अड. राकेशभाऊ राठोड, नंदू पवार, महंत संजय महाराज, नागपूर नगरीचे नायक आत्माराम चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते प्रा.टि.व्ही.राठोड, भाजप नेत्या जयश्रीताई राठोड, साहित्य संघाचे राष्ट्रीय महासचिव सिताराम राठोड, राष्ट्रीय कोषाध्यक्ष शेषराव चव्हाण, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एन.डी.राठोड, अमरावती विभागीय अध्यक्ष डॉ. मनोजभाऊ राठोड, शेतकरी नेते मनोहर राठोड उपस्थित राहणार आहेत. नाईक साहेबाचे शिक्षण नागपूरातच झाले, तसेच वैवाहिक जिवनाची सुरुवात सुद्धा त्यांनी नागपूरातूनच केली. नाईक साहेबांचे कार्य बंजारा समाजापुरतेच मर्यादित नसुन; तर सर्वच समाज घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य हे एक अनमोल ठेवाच आहे. नाईक साहेबांच्या कार्याला उजाळा मिळण्यासाठी आणि समाजातील नवतरुण व नव साहित्यिकांना प्रेरणा मिळण्यासाठी गोर बंजारा साहित्य संघ भारत च्या वतीने महाराष्ट्रात दरवर्षी वसंतवादी साहित्य संमेलनाचे आयोजन केल्या जाते. सदर संमेलन हे तीन सत्रात संपन्न होणार आहे. पहिल्या सत्रात उदघाटनासह, संमेलनाध्यक्षाचे मार्गदर्शन लाभणार आहे. दुसऱ्या सत्रात गोर शिकवाडी साहित्य दळाचे संयोजक रतनकुमार राठोड, राहूल सिंधू पालतीया, प्रा.रवि राठोड, अशोक पवार,सायरे सर वसंतरावजी नाईक साहेबांच्या सामाजिक, राजकिय कार्यावर प्रकाश टाकणार आहे. तर तिसरे सत्रात हास्यकवि सुरेशभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 'कवी संमेलन' पार पडणार आहे. गोर बंजारा साहित्य संघातर्फे आता पर्यंत तीन राष्ट्रीय स्तरावरील संमेलने झाली असून राज्यस्तरावरील हे साहित्य संघाचे तिसरे संमेलन आहे. साहित्य क्षेत्रात बंजारा समाजात काम करणारी गोर बंजारा साहित्य संघ,भारत ह्या संघटनेचे कार्य व्यापक स्वरूपात असून या संघटनेद्वारे राष्ट्रीय स्तरावर भारतभर साहित्य संमेलने आयोजित केली जातात. शानिवारी होणाऱ्या या संमेलनात लातूर, नांदेड, औरंगाबाद, यवतमाळ, अकोला, नंदूरबार,पुणे, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली तसेच नागपूरचे साहित्य प्रेमी, प्रतिनिधी हजर राहतील. या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी साहित्य संघाचे राष्ट्रीय संघटक पत्रकार मनोहर चव्हाण जल्लोषपूर्ण वातावरणात करीत आहे. असे संमेलनाचे मुख्य संयोजक पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.
👆🏾