Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

ताज्या बातम्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ताज्या बातम्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, नोव्हेंबर ०१, २०२१

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी झटका ; गॅस 265 रुपयांनी महागला

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी झटका ; गॅस 265 रुपयांनी महागला


दिवाळीच्या - पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे . एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 265 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे . ही वाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्येच झाली आहे . घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही . त्यामुळे व्यावसायिक वापराचा 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1736.5 रुपयांवरुन 2000.5 रुपये इतकी झाली आहे . या भाववाढीचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकांना बसणार आहे .
धक्कादायक! बहिण भावाचा तलावात बुडून मृत्यू

धक्कादायक! बहिण भावाचा तलावात बुडून मृत्यू


औरंगाबाद- मध्य प्रदेशातून रोजगार साठी आलेल्या मजूर कुटुंबावर नियतीने मोठा घाला घातला . आई वडील शेतात कापूस वेचत असताना बहीण भावाचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला . पोटचे गोळे क्रूर नियतीने हिरावल्याने त्या माऊलीने फोडलेल्या हंबरड्याने आसमंत चिरून निघाला . ही घटना रविवारी दुपारी वैजापूर तालुक्यातील सफियाबादवाडीत घडली . रितू (वय 12) आणि सचिन सीना डावर ( वय 8) अशी मृत भावंडांची नावे आहेत . या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शुक्रवार, ऑक्टोबर २९, २०२१

विनायकराव पाटील महाविद्यालयात कोरोना लसीकरण शिबिर संपन्न .

विनायकराव पाटील महाविद्यालयात कोरोना लसीकरण शिबिर संपन्न .


 

औरंगाबाद / प्रतिनिधी

 विनायकराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित , कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , कन्नड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामीण रुग्णालय कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन युवा स्वास्थ्य मोहिमे अंतर्गत कोरोना लसीकरण शिबिर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते .

 या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचा डोस घेतला . याप्रसंगी ग्रामीण रुग्णालय कन्नड येथील आरोग्य सेवक  एस . जे . अकोलकर , नारायण बोरा, परिचारिका अखिला शेख , प्रमिला राठोड तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . शरद गावंडे उपप्राचार्या डॉ . सरला गोरे, उपप्राचार्य संतोष मतसागर, व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते . 

या शिबिराच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ . बबन आमले , डॉ . सुधीर पवार , प्रा . केशव मोरे डॉ . सुहास यादव यांनी परिश्रम घेतले .
फेसबुकचे नाव मध्यरात्री बदलले ; मार्क झुकरबर्ग यांची घोषणा

फेसबुकचे नाव मध्यरात्री बदलले ; मार्क झुकरबर्ग यांची घोषणा


फेसबुकचे- संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी काल मध्यरात्री फेसबुकचे नाव बदलल्याची घोषणा केली आहे . फेसबुक कंपनीने आपले नाव बदलून मेटा ( Meta ) झाले आहे . ' या नवीन नावामुळे कंपनी ज्या सेवा पुरवत आहे आणि ज्या क्षेत्रात कायम करत आहेत , त्याबद्दलची कल्पना अधिक स्पष्ट होईल , ' असा विचार मार्क झुकरबर्ग यांनी या वेळी म्हटले आहे .

गुरुवार, ऑक्टोबर २८, २०२१

बुलढाणा अर्बन बँकेत दरोडा, 25लाख रोख, 1 कोटींचे दागिने पळवले

बुलढाणा अर्बन बँकेत दरोडा, 25लाख रोख, 1 कोटींचे दागिने पळवले




विहामांडवा / प्रतिनिधी

शहागड येथील बुलढाणा अर्बन बँकेत तीन दरोडेखोरांनी फिल्मीस्टाईलने धुडगूस घालत दरोडा टाकला. दरोडेखोरांनी बंदुकीच्या नोकेवर पंचवीस लाख रोख रक्कम; तर अंदाजे एक कोटी पेक्षा जास्त रुपयांचे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजेदरम्यान घडली.

शहागड ( ता.अंबड ) येथील बुलढाणा अर्बन बँकेचे कामकाज सुरू असतांना गुरुवारी सायंकाळी पावने पाच वाजेदरम्यान तीन दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला. आत येताच तिन्ही दरोडेखोरांनी बँकेतील सात ही कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखले, कर्मचाऱ्यांजवळील मोबाईल ताब्यात घेत, एक एक करून सर्व कर्मचाऱ्यांना स्ट्राॅग रुममध्ये कोंडण्यात आले.

एक कर्मचाऱ्याच्या कानशिलाला बंदूक लावून लाॅकरची चावी घेतली. त्यानंतर ड्राव्हरमधील २५ लाख रोख रकमेसह ग्राहकांनी तारण ठेवलेले दोन ड्राॅव्हरमधील सोने लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला. बँकेतील कर्मचाऱ्यांनी जवळपासच्या नागरिकांना संपर्क केला. घटनेची माहिती गोंदी पोलीसांना मिळताच शहागड व गोंदी पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करत माग काढण्याचा प्रयत्न केला. गेवराई जि.बीड, जालना, औरंगाबाद, पैठण येथील पोलिसांना कळवून त्या त्या मार्गावर नाकेबंदी करण्याच्या सुचना केल्या. मात्र, शर्थीचे प्रयत्न करूनही दरोडेखोरांचा माग लागला नाही.

२५ लाख रोख रक्कम, १ कोटींचे दागिने लुटले

दरम्यान, औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रहदारीच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या दरोड्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या बँक दरोड्यात जवळपास २५ लाख रुपये रोख रक्कम व ग्राहकांचे तारण ठेवलेल्या दहा कोटींच्या दागिन्यांतून अंदाजे १ कोटीचे सोने दरोडेखोरांनी लुटले असल्याचे बँकेच्या स्थानिक व्यवस्थापनाने सांगितले.

रविवार, ऑक्टोबर २४, २०२१

पैठणच्या तहसीलदारांसह दोघांवर गुन्हा,वाळू उपसा करून देण्यासाठी प्रति महिना केली होती १ लाख ३० हजारांची मागणी

पैठणच्या तहसीलदारांसह दोघांवर गुन्हा,वाळू उपसा करून देण्यासाठी प्रति महिना केली होती १ लाख ३० हजारांची मागणी


औरंगाबाद- वाळूचा " अवैध उपसा करून तिची वाहतूक करण्यासाठी प्रत्येक महिन्याला १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यासह खासगी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . विशेष म्हणजे शहरात अशा प्रकरणात तहसीलदारांवर कारवाई होण्याची ही वर्षामधील दुसरी कारवाई आहे . त्यामुळे महसूल प्रशासनात प्रचंड खळबळ उडाल आहे . तक्रारदार यांचा शेती व वाहतुकीचा व्यवसाय आहे . शेळके यांच्यासह नारायण वाघ असे गुन्ह दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत . पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदाराच्या शेताजवळूनच शेंदुरवादा येथून खामनदी वाहते . या नदीत अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात वाळूसाठा झालेला आहे . या वाळूचा अवैध उपसा करून तिची वाहतूक दोन हायवांद्वारे करण्यासाठी प्रत्येक महिन्याला लाच स्वरूपात १ लाख ३० हजार रुपयांची मागणी करून ती रक्कम तहसीलदार शेळके यांनी नारायण वाघ यांच्याकडे देण्याचे तक्रारदार यांना २२ ऑक्टोबर रोजी सांगितले होते . या संदर्भातील बोलणी तक्रारदार तहसीलदार शेळके यांच्यात पैठण येथील तहसील कार्यालयात झाली होती . दरम्यान , या प्रकरणी लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दोघांवर तक्रार नोंदविली . 

खासगी व्यक्ती करतो वाळूची वसुली

मागील वर्षी दिवाळीच्या सणादरम्यान लाच घेताना पैठण येथील तहसीलदारांना अटक करण्यात आली होती . त्याच कारवाईची पुनरावृत्ती पुन्हा वर्षाच्या आत झाली आहे . त्यामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे . सदर खासगी इसम वाघ हा अनेक दिवसांपासून पैठण तालुक्यात अवैधरित्या वाळू , मुरुमाचा उपसा करणाऱ्या लोकांकडून वसुली करत असल्याची चर्चा आहे .

शनिवार, ऑक्टोबर २३, २०२१

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (शनिवारी) 23 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.

सकाळी 9:05 वा: औरंगाबाद विमानतळ येथे आगमन
सकाळी 9:20 वा : मा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची विस्तारीत इमारत, सिडको येथे आगमन व राखीव
सकाळी 9:40 वा: मा न्या. श्री एन.व्ही.रमण्णा, भारताचे मुख्य न्यायाधीश यांचे आगमन
सकाळी 9:45 वा: Inauguration of B & C wings ko new high Court Annex building of bombay high court bench at aurangabad

सकाळी 11:40 वा: राखीव

दुपारी 12:40 वा: औरंगाबाद विमानतळ येथे आगमन
दुपारी 12:45 वा: विमानाने मुंबईकडे प्रयाण

शुक्रवार, ऑक्टोबर २२, २०२१

सिल्लोड कन्नड रस्त्यावर भिषण अपघात; दोन जण जागीच ठार

सिल्लोड कन्नड रस्त्यावर भिषण अपघात; दोन जण जागीच ठार




सिल्लोड तालुक्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त टिप्परला आयशरने पाठीमागून धडक दिल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली . या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी  झाले  .

हा भीषण अपघात सिल्लोड - कन्नड रस्त्यावरील धानोरा फाट्याजवळ   पहाटेच्या सुमारास झाला . अपघातात मरण पावलेले दोघेही सोलापूर जिल्ह्यातील   रहिवासी आहेत . पाचोरा येथून काही ऊसतोड कामगारांना घेऊन हा आयशर बारामतीकडे निघाला होता . धानोरा फाट्याजवळ रस्त्यावर त्याने नादुरुस्त टिप्परला मागून धडक दिली . या भीषण अपघातामध्ये कल्पनाबाई इमाजी पवार , प्रशांत विठ्ठल वाघ , हे दोघे जागीच ठार झाले . तर अन्य चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे . अपघात एवढा भीषण होता की आजूबाजूचे लोक मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी जमा झाले . दरम्यान जखमींना सिल्लोडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे . या घटनेची ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे .

बुधवार, ऑक्टोबर २०, २०२१

एक मुलगी झाल्यानंतर प्रियकरा विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

एक मुलगी झाल्यानंतर प्रियकरा विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल



पैठण /प्रतिनिधी

पैठण तालुक्यातील पिंपळवाडी पिं येथील गणेशनगर मध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय  प्रेयसीना एक मुलगी झाल्यानंतर प्रियकराविरुद्ध बलात्कार केल्याचा गुन्हा पैठण पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
 
पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की पैठण तालुक्यातील पिंपळवाडी पिं येथील ( काल्पनिक नाव स्वाती)  वय १९ या खाजगी नोकरी करणाऱ्या या मुलीशी प्रेम संबंध जुळवून १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखविल्यामुळे सदरील प्रेयसी स्वाती येणे विश्वास ठेवून पैठण शहरातील इंदिरानगर येथील प्रियकर सचिन कल्याण गाढे त्याच्यासोबत प्रेमविवाह झाले या दरम्यान स्वाती ला एक मुलगी झाली. परंतु किरकोळ कारणावरून प्रियकर सतत शिवीगाळ करून मारहाण करीत असल्यामुळे स्वातीने पैठण पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्याकडं प्रियकरा विरुद्ध तक्रार केली त्यामुळे वरिष्ठ अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शन घेऊन महिला सपोनि जनाबाई सांगळे यांनी सदरील पीडित मुलीचा जवाब देण्याचा आदेश देऊन प्रियकर आरोपी सचिन गाढे विरुद्ध ३७६, (३) ,३२३, ५०४, भादवि सह कलम ४,६ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जनाबाई सांगळे या करीत आहे.

रविवार, ऑक्टोबर १७, २०२१

पाण्यात पाय घसरून वृद्ध आजीचा मृत्यू

पाण्यात पाय घसरून वृद्ध आजीचा मृत्यू



स्टार पोलीस टाईम्स ब्यूरो.

गावालगत असलेल्या नदीच्या पाण्यात पाय घसरून एक आठ्याहत्तर वर्षीय आजीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दादेगाव ता.पैठण येथे रविवारी (दि.१७) रोजी सकाळी आकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. चंद्रभागाबाई संताराम गोरे (वय७८)असे मृत्यू झालेल्या वृद्ध आजीचे नाव आहे.

याविषयी सविस्तर माहिती, यंदा सर्वत्र पावसाळा चांगला असल्यामुळे तालुक्यातिल नदी,नाले,ओढे सध्या दुधडी भरुन वाहू लागले आहे.पैठण तालुक्यातिल दादेगाव बुद्रूक येथिल चंद्रभागाबाई गोरे या सकाळी दहाच्या दरम्यान घरातून स्वच्छालयसाठी बाहेर गेल्या होत्या. परंतु त्या बाहेर जाऊन एक तास उलटला तरीही घरी परत न आल्याने त्यांच्या एका नातंवाने चंद्रभागाबाई गोरे यांचा नदीकाठी जाऊन शोध घेतला आसता नदीवर त्यांचे कडील काही वस्तू तिथं दिसून आल्यावर त्यांने तात्काळ या गोष्टीची माहिती गावातील अनिल हजारे,भाऊसाहेब गोरे, देविदास हजारे, सुनिल काकडे,  प्रल्हाद गहाळ, अशोक गोरे,शहाजी झिने,राम हजारे यांना कळविली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन चंद्रभागाबाई गोरे यांच्या घटनेविषयी बीट जमादार किशोर शिंदे, पोलिस नाईक रविंद्र अंबेकर यांना दिली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन गावकऱ्यांच्या मदतीने चंद्रभागाबाई यांना नदीच्या पाण्यातून बाहेर काढून तात्काळ खाजगी वाहनाव्दारे पाचोड येथिल ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाँ.वैद्यकीय अधिकारी संदिपान काळे यांनी तपासून मृत घोषित केले आहे.या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार किशोर शिंदे,फेरोझ बर्डे करीत आहे.

त्या अपघातातील मृतांची संख्या चार ,सात महिन्याच्या चिमुकल्याचेही निधन

त्या अपघातातील मृतांची संख्या चार ,सात महिन्याच्या चिमुकल्याचेही निधन


पिशोर- पिशोर सिल्लोड रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातातील जखमी चिमुकल्याची प्राणज्योत शनिवारी सकाळी मालवली. या अपघातातील मृतांची संख्या चार झाली असून ट्रॅक्टर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
          पिशोर सिल्लोड रस्त्यावर मोहंद्री फाट्यानजीक शुक्रवारी भरधाव ट्रॅक्टर क्रमांक
एम एच-२० एएस-८९२४ ने  दुचाकी क्रमांक एमएच-२० ईक्यू-०५८२ ला जोरात धडक दिली. दसऱ्या निमित्त असलेल्या कार्यक्रमासाठी पिशोर येथील सोमिनाथ शेषराव सुरे हा आपली बहिण बाली भीमा चौगुले, भाची ज्योती चौगुले, रेणुका चौगुले व भाचा कार्तिक उर्फ सागर चौगुले आणण्यासाठी चिंचोली लिंबाजी येथे गेला होता. सायंकाळी ६.४५ वाजेदरम्यान घरापासून हाकेच्या अंतरावर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात बाली चौगुले व ज्योती चौगुले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर सोमिनाथ सुरे याचा औरंगाबाद घाटीत नेतांना वाटेतच मृत्यू झाला होता. यातील सात महिन्याच्या जखमी कार्तिक याचा उपचारा दरम्यान शनिवारी मृत्यू झाला असून रेणुकावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर मयतांचे नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. शनिवारी कार्तिकच्या मृत्यूची वार्ता कळताच नातेवाईकांचा मोठा जमाव पोलीस ठाण्यासमोर जमा झाला. आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी नातेवाईक करीत होते. सपोनि हरिषकुमार बोराडे, सपोनि देविदास वाघमोडे, उपनिरीक्षक विजय आहेर, सतीश बडे, जमादार किरण गंडे, कदिर पटेल आदींनी आरोपी अटकेत असून ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला आहे अशी नातेवाईकांची समजूत घातली त्यांनतर जमाव शांत झाला. मयत बाली चौगुले, ज्योती चौगुले यांचे नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात तर सोमिनाथ सुरे व कार्तिक चौगुले यांचे घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तिन्ही माय लेकांचे चिंचोली लिंबाजी तर सोमिनाथ सुरे याच्यावर पिशोर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान ट्रॅक्टर चालक भगवान सांडू भागवत रा. शफेपुर यास पोलिसांनी अटक केली असून उपनिरीक्षक सतीश बडे अधिक तपास करीत आहेत.

शनिवार, ऑक्टोबर १६, २०२१

सेंट्रल बँकेच्या संथगतीच्या कामकाजाला कंटाळून ग्रामस्थ बँकेला लावणार टाळे

सेंट्रल बँकेच्या संथगतीच्या कामकाजाला कंटाळून ग्रामस्थ बँकेला लावणार टाळे


स्टार पोलीस टाइम्स / इम्तियाज शेख

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील सेंट्रल बँक ऑफ विहामांडवा येथील कर्मचारी अभावी तसेच वारंवार रेंज राहत नसल्यामुळे संथगतीने चालणाऱ्या कामकाजाला कंटाळून खातेदारास नाहक त्रास सोसावा लागत असल्यामुळे दि. २० ऑक्टोंबर २०२१ रोजी व्यापारी संघटनेसहित ग्रामस्थानी बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, वीस-पंचवीस खेड्याचा कारभार चालवत असणारी विहामांडवा येथील सेंट्रल बँक ऑफ विहामांडवा ग्रामीण भागामध्ये एकमेव बँक असल्यामुळे या ठिकाणी नेहमी ग्रामस्थांची गर्दी असते, जास्त गर्दी असल्यामुळे अनेक वृद्धांना, पेन्शन धारकांना, शेतकरी बांधवांना अपंगांना आशा गरजवंतांना कित्येक वेळा त्रास सहन करून पैसे न मिळताच रिकाम्या हातानेच माघारी जावाय च्या घटना घडलेल्या आहेत. या ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीना वरिष्ठ अधिकारीच जबाबदार असल्याचे निदर्शनात येत आहे. कारण बँकेमध्ये अनेक महिन्यापासून रेंज कधी असते, तर कधी नसते, तसेच बँकेमध्ये कर्मचारी संख्याचा आभाव, असल्यामुळे येथे कार्यरत असणाऱ्या कर्तव्यदक्ष बँक व्यवस्थापका सहित कर्मचाऱ्यावर कामाचा अतिबोजा पडत असल्यामुळे त्यांनाही नाहक त्रास सोसावा लागतो. सध्या शेतकरी मेटाकुटीस आलेला असून अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना बँकेच्या हलगर्जीपणामुळे पिक कर्ज मिळालेले नाहीत. पिक कर्ज न मिळाल्यामुळे शेतकरी बांधवांचे अतोनात हाल होत आहे. बँकेच्या अनेक कार्यप्रणाली मध्ये बदल झाल्यामुळे, तसेच नेहमी नेहमी रेंज नसल्यामुळे, विशेष कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे बँक अधिकार्‍यासह इतर शेतकरी बांधवांना तीव्र समस्यांचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थाच्या सदर मागणीची दखल १८ ऑक्टोंबर २०२१ अगोदर घेण्यात यावी, नसता २० ऑक्टोंबर २०२१ रोजी सदर समस्यांचे निवारण न झाल्यामुळे ग्रामस्थ सहित व्यापारी बांधवांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना  लेखी निवेदन देऊन, बँकेला टाळे ठोकण्याचा नाईलाजात्सव निर्णय घेतल्याचा इशारा दिला  आहे . या निवेदनावर व्यापारी महासंघ अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर,नवगावचे उपसरपंच शरिफ पठाण, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रा. सदस्य सुनील पा.डुकरे, रणजीत पा. डुकरे,भागवत डुकरे ,शेख शिराज,आरेफ शेख,इम्रान शहा, शेख जावेद ,शेख मोहसिन, यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार कोसळणार

महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार कोसळणार


 राज्यात- पुढच्या दोन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे . बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं त्याचा परिणाम म्हणून हा पाऊस होईल , अशी माहिती के . एस . होसाळीकर यांनी ही दिली . विदर्भ , मराठवाड्याचा काही भाग तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता आहे , असंही त्यांनी सांगितलं . वीजा चमकत असताना बाहेर पडू नका , असंही आवाहन करण्यात आलंय .
जमीयत संघटना अध्यक्ष पदी हाफिज रौनक यांची निवड

जमीयत संघटना अध्यक्ष पदी हाफिज रौनक यांची निवड

    स्टार पोलीस टाइम्स/ इम्तियाज शेख

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील विहामांडवा मरकस मस्जिद मध्ये जमीयत संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी हिरडपुरी येथील हाफीज रौनक, यांची सर्वानुमते जमीयत संघटना सर्कल अध्यक्षपदी निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी इम्तियाज मास्टर व आयुब भाई जळगाव यांची निवड करण्यात आली सरचिटणीस अशपाक भाई, सचिव आलिम पटेल, तर खजिनदार जावेद टी हाऊस, ची निवड करण्यात आली यावेळी जमियत महाराष्ट्र सेक्रेटरी मुफ्ती रज्जाक,यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले या प्रसंगी जमियत तालुका अध्यक्ष मौलाना हारुण मजाहिरी, माजी सरपंच अफसर भाई शेख, शेरू भाई पटेल नवगाव , अ . रहमान, अमजद मौलाना , काजी कलिमुल्लाह  पैठण, यूनुस मौलाना ,हाजी फेरोज, इलियास मौलाना, सुभान मौलाना,अफसर सय्यद , मौलाना जुबेर,सलीम भाई गुत्तेदार, शब्बीर भाई,पत्रकार शिराज शेख,साजेद तांबोळी,शिराज शेख,हाफिज तोसिफ, आरोग्य सेवक अर्शद शेख, अजिम सय्यद,मोहसीन शेख,आसेफ शेख,शामहमंद शेख यांची उपस्थिती होती.
पहिली ते चौथीच्या शाळा ११ नोव्हेंबरपासून सुरू होणार

पहिली ते चौथीच्या शाळा ११ नोव्हेंबरपासून सुरू होणार


राज्यात- सध्या पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू आहेत . त्यातच आता पहिली ते चौथीच्या शाळा दिवाळीनंतर राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्य साधून ११ नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार केला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी दिली . सध्या सुरू असलेल्या माध्यमिक शाळा व त्यातील विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन शासन स्तरावरुन त्यासंबंधीचा अंतिम निर्णय काही दिवसांत होईल , असं देखील सांगण्यात आलं .
धक्कादायक! पिशोर - सिल्लोड रोडवर भिषण अपघात ; तिन ठार

धक्कादायक! पिशोर - सिल्लोड रोडवर भिषण अपघात ; तिन ठार

 स्टार पोलीस टाइम्स न्युज-  पिशोर सिल्लोड रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीचा भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर एकाचा उपचारासाठी  नेत असतांना मुत्यु झाला .   घटना शुक्रवारी रोजी सायकाळी साडेसहा  वाजता घडली.मयत बाली भीमा चौगुले (वय२५) ज्योती भीमा चौगुले (वय ३) (दोघी रा.चिंचोली लिंबाजी) असे अपघातात मृत झालेल्या माय लेकीची नावे आहेत. 

या विषयी अधिक माहिती अशी की, पिशोर येथील सोमनाथ शेषराव  सुरे  हा दसऱ्यासाठी त्याच्या बहिण बाली चौगुले हिला चिंचोली लिंबाजी येथे आणायला गेला होता. सायकळी साडेसहा वाजेदरम्यान पिशोर सिल्लोड रस्त्यावरील मोहंद्री फाट्यावर ट्रॅक्टर व दुचाकीचा  अपघात झाला. दुचाकीवर भाऊ, बहीण, इतर तीन लहान बालक होते. अपघात स्थळाजवळच काही फूट अंतरावर सोमिनाथ सुरेचे घर आहे. आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ गंभीर जखमी सर्वांना काही मिनिटात पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी बाली व ज्योती चौगुले या आई व मुलगी मृत झाल्याचे  ङाॅ कोकणे यांनी सांगितले.  अतिशय गंभीर जखमी सोमिनाथला व लहान बाळ कातीॅक चौगुले, रेणुका चौगुले याना  तात्काळ पुढील  उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात  पाठविले  रस्त्यावर सोमनाथ  सुरे याची प्राणज्योत  मालवली  .
पुढील  तपास  सपोनी हरिशकुमार  बोराडे,विजय  आहेर  करित आहे.

शुक्रवार, ऑक्टोबर १५, २०२१

धक्कादायक! पोलीसाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

धक्कादायक! पोलीसाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार


राज्यात- बलात्काराच्या घटना वाढतच चालल्या आहेत . नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या मुंबईतील पोलिसानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे . कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात ही घृणास्पद घटना घडली आहे . राजेंद्र गणपती पाटील असे आरोपी पोलिसाचे नाव आहे . पाटील विरोधात पन्हाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मात्र , एका पोलिसानेच असे कृत्य केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे .

गुरुवार, ऑक्टोबर १४, २०२१

ब्रेकिंग - महाराष्ट्रात 3 दिवस पुन्हा मुसळधार पाऊस

ब्रेकिंग - महाराष्ट्रात 3 दिवस पुन्हा मुसळधार पाऊस


हवामान- विभागाने पुन्हा राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे . 16 ते 18 ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . 16 ऑक्टोबरला नागपूर , अकोला , अमरावती , बुलडाणा , वाशिम , परभणी , नांदेड , हिंगोली , यवतमाळ , वर्धा , चंद्रपूर , भंडारा , गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे . दरम्यान गेल्या आठवड्यात अनेक भागात चांगला पाऊस झाला .मात्र,आज पुन्हा इशारा देण्यात आला आहे.
मनमोहन सिंग एम्स मध्ये दाखल,आरोग्यमंत्री एम्समध्ये पोहोचले

मनमोहन सिंग एम्स मध्ये दाखल,आरोग्यमंत्री एम्समध्ये पोहोचले


माजी- पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे . त्यानंतर आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिल्लीतल्या एम्समध्ये हजेरी लावली . यावेळी त्यांनी सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस केली . याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन मनमोहन सिंग लवकर बरे व्हावेत , यासाठी प्रार्थना केली . दरम्यान सिंग यांना बुधवारी एम्समध्ये आणण्यात आले .
मोठी गुडन्यूज ! खाद्य तेल बाबतीत सर्वसामान्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

मोठी गुडन्यूज ! खाद्य तेल बाबतीत सर्वसामान्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय


सर्वसामान्यांना- दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे . सरकारनं पाम तेल आणि सनफ्लॉवर तेलावरील अग्री सेस आणि सानुकूल शुल्क कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे . याआधी ग्राहक व्यवहार , अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं तेल आणि तेलबियांच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक नियम जारी केले होते . सरकारनं खाद्य तेलाच्या किरकोळ किमतीत 3.28 टक्के ते 8.58 टक्क्यांपर्यंत घट केली .