स्टार पोलीस टाईम्स ब्यूरो.
गावालगत असलेल्या नदीच्या पाण्यात पाय घसरून एक आठ्याहत्तर वर्षीय आजीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दादेगाव ता.पैठण येथे रविवारी (दि.१७) रोजी सकाळी आकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. चंद्रभागाबाई संताराम गोरे (वय७८)असे मृत्यू झालेल्या वृद्ध आजीचे नाव आहे.
याविषयी सविस्तर माहिती, यंदा सर्वत्र पावसाळा चांगला असल्यामुळे तालुक्यातिल नदी,नाले,ओढे सध्या दुधडी भरुन वाहू लागले आहे.पैठण तालुक्यातिल दादेगाव बुद्रूक येथिल चंद्रभागाबाई गोरे या सकाळी दहाच्या दरम्यान घरातून स्वच्छालयसाठी बाहेर गेल्या होत्या. परंतु त्या बाहेर जाऊन एक तास उलटला तरीही घरी परत न आल्याने त्यांच्या एका नातंवाने चंद्रभागाबाई गोरे यांचा नदीकाठी जाऊन शोध घेतला आसता नदीवर त्यांचे कडील काही वस्तू तिथं दिसून आल्यावर त्यांने तात्काळ या गोष्टीची माहिती गावातील अनिल हजारे,भाऊसाहेब गोरे, देविदास हजारे, सुनिल काकडे, प्रल्हाद गहाळ, अशोक गोरे,शहाजी झिने,राम हजारे यांना कळविली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन चंद्रभागाबाई गोरे यांच्या घटनेविषयी बीट जमादार किशोर शिंदे, पोलिस नाईक रविंद्र अंबेकर यांना दिली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन गावकऱ्यांच्या मदतीने चंद्रभागाबाई यांना नदीच्या पाण्यातून बाहेर काढून तात्काळ खाजगी वाहनाव्दारे पाचोड येथिल ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाँ.वैद्यकीय अधिकारी संदिपान काळे यांनी तपासून मृत घोषित केले आहे.या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार किशोर शिंदे,फेरोझ बर्डे करीत आहे.