:- भद्रावती रोटरी क्लब तर्फे मोफत अस्थिरोग व दंतरोग निदान शिबिराचे आयोजन स्थानिक हुतात्मा स्मारक भद्रावती येथे दिनांक 17 ला करण्यात आले. या शिबिरात 122 रुग्णांची तपासणी करण्यात आली. हाडांचा ठिसूळपणा बाबत विशेष भर देण्यात आला. याबाबत रुग्णांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले.याप्रसंगी चंद्रपूरचे डॉक्टर निखिल टोंगे व श्रुती टोंगे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर निखिल टोंगे, डॉक्टर श्रुती टोंगे, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वर्मा, रोटरी क्लब भद्रावती चे अध्यक्ष सचिन सरपटवार, सचिव अब्बास अजानी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब भद्रावतीचे सदस्य भाविक तेलंग ,डॉक्टर माला प्रेमचंद ,डॉक्टर अमित प्रेमचंद प्रवीण महाजन, विनोद का मडी ,आनंद क्षीरसागर ,किशोर खंडाळकर, वसंत उमरे ,वासुदेव ठाकरे, विवेक अकोजवार ,सुनील पोटदुखे , सुधीर पारोधे, हनुमान घोटेकर, शंकर डे व रोटरी क्लब च्या सर्वच सदस्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन व आभार मदन ताठे यांनी मानले.
उद्या दि.18 ला हुतात्मा स्मारक येथे सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत रोटरी क्लब भद्रावती तर्फे कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब भद्रावती तर्फे करण्यात आले.