Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

ताज्या बातम्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ताज्या बातम्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, नोव्हेंबर ०१, २०२१

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी झटका ; गॅस 265 रुपयांनी महागला

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी झटका ; गॅस 265 रुपयांनी महागला


दिवाळीच्या - पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे . एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 265 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे . ही वाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्येच झाली आहे . घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही . त्यामुळे व्यावसायिक वापराचा 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1736.5 रुपयांवरुन 2000.5 रुपये इतकी झाली आहे . या भाववाढीचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकांना बसणार आहे .
धक्कादायक! बहिण भावाचा तलावात बुडून मृत्यू

धक्कादायक! बहिण भावाचा तलावात बुडून मृत्यू


औरंगाबाद- मध्य प्रदेशातून रोजगार साठी आलेल्या मजूर कुटुंबावर नियतीने मोठा घाला घातला . आई वडील शेतात कापूस वेचत असताना बहीण भावाचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला . पोटचे गोळे क्रूर नियतीने हिरावल्याने त्या माऊलीने फोडलेल्या हंबरड्याने आसमंत चिरून निघाला . ही घटना रविवारी दुपारी वैजापूर तालुक्यातील सफियाबादवाडीत घडली . रितू (वय 12) आणि सचिन सीना डावर ( वय 8) अशी मृत भावंडांची नावे आहेत . या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शुक्रवार, ऑक्टोबर २९, २०२१

विनायकराव पाटील महाविद्यालयात कोरोना लसीकरण शिबिर संपन्न .

विनायकराव पाटील महाविद्यालयात कोरोना लसीकरण शिबिर संपन्न .


 

औरंगाबाद / प्रतिनिधी

 विनायकराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित , कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , कन्नड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामीण रुग्णालय कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन युवा स्वास्थ्य मोहिमे अंतर्गत कोरोना लसीकरण शिबिर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते .

 या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचा डोस घेतला . याप्रसंगी ग्रामीण रुग्णालय कन्नड येथील आरोग्य सेवक  एस . जे . अकोलकर , नारायण बोरा, परिचारिका अखिला शेख , प्रमिला राठोड तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . शरद गावंडे उपप्राचार्या डॉ . सरला गोरे, उपप्राचार्य संतोष मतसागर, व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते . 

या शिबिराच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ . बबन आमले , डॉ . सुधीर पवार , प्रा . केशव मोरे डॉ . सुहास यादव यांनी परिश्रम घेतले .
फेसबुकचे नाव मध्यरात्री बदलले ; मार्क झुकरबर्ग यांची घोषणा

फेसबुकचे नाव मध्यरात्री बदलले ; मार्क झुकरबर्ग यांची घोषणा


फेसबुकचे- संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी काल मध्यरात्री फेसबुकचे नाव बदलल्याची घोषणा केली आहे . फेसबुक कंपनीने आपले नाव बदलून मेटा ( Meta ) झाले आहे . ' या नवीन नावामुळे कंपनी ज्या सेवा पुरवत आहे आणि ज्या क्षेत्रात कायम करत आहेत , त्याबद्दलची कल्पना अधिक स्पष्ट होईल , ' असा विचार मार्क झुकरबर्ग यांनी या वेळी म्हटले आहे .

गुरुवार, ऑक्टोबर २८, २०२१

बुलढाणा अर्बन बँकेत दरोडा, 25लाख रोख, 1 कोटींचे दागिने पळवले

बुलढाणा अर्बन बँकेत दरोडा, 25लाख रोख, 1 कोटींचे दागिने पळवले




विहामांडवा / प्रतिनिधी

शहागड येथील बुलढाणा अर्बन बँकेत तीन दरोडेखोरांनी फिल्मीस्टाईलने धुडगूस घालत दरोडा टाकला. दरोडेखोरांनी बंदुकीच्या नोकेवर पंचवीस लाख रोख रक्कम; तर अंदाजे एक कोटी पेक्षा जास्त रुपयांचे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजेदरम्यान घडली.

शहागड ( ता.अंबड ) येथील बुलढाणा अर्बन बँकेचे कामकाज सुरू असतांना गुरुवारी सायंकाळी पावने पाच वाजेदरम्यान तीन दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला. आत येताच तिन्ही दरोडेखोरांनी बँकेतील सात ही कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखले, कर्मचाऱ्यांजवळील मोबाईल ताब्यात घेत, एक एक करून सर्व कर्मचाऱ्यांना स्ट्राॅग रुममध्ये कोंडण्यात आले.

एक कर्मचाऱ्याच्या कानशिलाला बंदूक लावून लाॅकरची चावी घेतली. त्यानंतर ड्राव्हरमधील २५ लाख रोख रकमेसह ग्राहकांनी तारण ठेवलेले दोन ड्राॅव्हरमधील सोने लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला. बँकेतील कर्मचाऱ्यांनी जवळपासच्या नागरिकांना संपर्क केला. घटनेची माहिती गोंदी पोलीसांना मिळताच शहागड व गोंदी पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करत माग काढण्याचा प्रयत्न केला. गेवराई जि.बीड, जालना, औरंगाबाद, पैठण येथील पोलिसांना कळवून त्या त्या मार्गावर नाकेबंदी करण्याच्या सुचना केल्या. मात्र, शर्थीचे प्रयत्न करूनही दरोडेखोरांचा माग लागला नाही.

२५ लाख रोख रक्कम, १ कोटींचे दागिने लुटले

दरम्यान, औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रहदारीच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या दरोड्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या बँक दरोड्यात जवळपास २५ लाख रुपये रोख रक्कम व ग्राहकांचे तारण ठेवलेल्या दहा कोटींच्या दागिन्यांतून अंदाजे १ कोटीचे सोने दरोडेखोरांनी लुटले असल्याचे बँकेच्या स्थानिक व्यवस्थापनाने सांगितले.