Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑक्टोबर १७, २०२१

धानोरकर दाम्पत्यांच्या हस्ते वरोरा येथील ट्रामा केअर युनीट चे लोकार्पण




धानोरकर दाम्पत्यांच्या हस्ते वरोरा येथील ट्रामा केअर युनीट चे लोकार्पण


चंद्रपूर : वरोरा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले ट्रामा केअर सेंटर चे उद्घाटन आज खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रामुख्याने माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड, उपविभागीय अधिकारी वरोरा सुभाष शिंदे,  तहसीलदार रोशन मकवाने ,ठानेदार दिपक खोब्रागडे ,  न.प.वरोराचे मुख्यधिकारी भोयर साहेब, डॉ.खापने साहेब , सभापती राजू चिकटे आदी मान्यवर उपस्थित होते.
            
          खासदार,बाळुभाऊ धानोरकर व  आमदार प्रतीभाताई धानोरकर यांचा हस्ते रविवारी सकाळी ट्रामा केअर चे उद्घाटन पार पडले. यावेळी ट्रामा केअरला आवश्यक सेवा पुरवल्या जाईल व येणाऱ्या भविष्यात 100 खाटांचे सुसज्ज दवाखाना उभारण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कोविडमध्ये डॉक्टरांनी उत्कृष्ट काम केले असून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाल्याने सर्व कर्मचारी व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.