Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑक्टोबर १७, २०२१

धानोरकर दाम्पत्यांच्याहस्ते वरोरा येथील ट्रामा केअर युनीट चे लोकार्पण


शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
        :- वरोरा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले ट्रामा केअर सेंटर चे उद्घाटन आज खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

           या कार्यक्रमास प्रामुख्याने माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड,  उपविभागीय अधिकारी वरोरा सुभाष शिंदे,  तहसीलदार रोशन मकवाने, वरोरा ठानेदार दिपक खोब्रागडे ,  न.प.वरोराचे मुख्यधिकारी भोयर साहेब, डॉ.खापने, सभापती राजू चिकटे आदी मान्यवर उपस्थित होते.
            
          खासदार,बाळुभाऊ धानोरकर व  आमदार प्रतीभाताई धानोरकर यांचा हस्ते रविवारी सकाळी ट्रामा केअर चे उद्घाटन पार पडले. यावेळी ट्रामा केअरला आवश्यक सेवा पुरवल्या जाईल व येणाऱ्या भविष्यात 100 खाटांचे सुसज्ज दवाखाना उभारण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कोविडमध्ये डॉक्टरांनी उत्कृष्ट काम केले असून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाल्याने सर्व कर्मचारी व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.