Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

वरोरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वरोरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, जुलै ०२, २०२३

राष्ट्रीय ओबीसी आयोग शिबिराचे उद्घाटन

राष्ट्रीय ओबीसी आयोग शिबिराचे उद्घाटन

राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, शोभाताई फडणवीस यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराचे उद्घाटन


शिरीष उगे ( वरोरा प्रतिनिधी)
वरोरा : स्व. विनायकराव वझे स्मृती प्रित्यर्थ सुयोग 
हॉस्पिटल वरोरा, भारतीय जनता पार्टी, व रोटरी क्लब वरोरा, यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मॅमोग्राफी टेस्ट मॅमोग्राफी टेस्ट शिबिराचे आयोजन १जूलै ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे घेण्यात येत आहे.

राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी
ग्रामीण जनतेमध्ये मुख रोग मोठ्या प्रमाणात आढळून येतात.  त्यामुळे अशा पद्धतीचे कॅम्प पक्षातर्फे घेण्याची योजना आम्ही आखत आहोत. दत्ता मेघे यांचे विदर्भात आरोग्य संबंधित सर्वात मोठे कार्य आहे. त्यांचा योग्य समज घेऊन डॉक्टर वाझे यांनी हा कॅम्प घेऊन गरीब लोकांचा वेळ, पैसा त्यांनी वाचवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी छोट्या छोट्या बाबींवर काम करणे सुरू केले होते. स्वच्छतेच्या बाबतीत स्वतः झाडू घेऊन स्वच्छतेचा संदेश सर्वांना दिला. त्यामुळे कॉलरा मलेरिया सारख्या साथीच्या रोगाचे प्रमाण कमी करण्यात यश आले. 
आरोग्य क्षेत्रात पंतप्रधान मोदी यांनी नवीन योजना राबवून आमूलाग्र बदल केला आहे. 2014 साली सहा एम्स होते. यानंतर 15 एम्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सुरू झाले.
औषधी निर्मितीपासून विदेशात औषधी पुरवठा करण्यापर्यंतचे कार्य या सरकारने केले आहे. 

डॉक्टर सागर वझे यांनी केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी असून त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देत पक्षातील कार्यकर्त्यांना जनतेसाठी  कार्य करत राहण्याचा संदेश दिला.

आज डॉक्टर्स दिवस  भारतरत्न डॉक्टर बीसी रॉय यांच्या जन्मतिथी निमित्त डॉक्टर दिवस साजरा करण्यात येतो याचे औचित्य साधून 1 जुलै 2023 ते 5 जुलै 2023 पर्यंत स्त्रियांमधील स्थानाचा कॅन्सर तपासणी व निदान करण्यात येत आहे. यालाच मॅमोग्राफी म्हटलं जातं मॅमोग्राफी ही एक एक्स-रे तपासणी आहे. विशिष्ट पद्धतीच्या तपासणी मधून स्त्रियांच्या स्तनांमधील गाठीची तपासणी कॅन्सर आहे की नाही हे बघण्यासाठी केला जातो. डॉक्टर्स डे च्या निमित्त आम्ही हा उपक्रम राबवतो आहे. भारतीय जनता पार्टी व रोटरी क्लब वरोरा या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.असे माजी आमदार शोभाताई फडणवीस यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

आज डॉक्टर्स दिवस  भारतरत्न डॉक्टर बीसी रॉय यांच्या जन्मतिथी निमित्त डॉक्टर दिवस साजरा करण्यात येतो याचे औचित्य साधून 1 जुलै 2023 ते 5 जुलै 2023 पर्यंत स्त्रियांमधील स्थानाचा कॅन्सर तपासणी व निदान करण्यात येत आहे. यालाच मॅमोग्राफी म्हटलं जातं मॅमोग्राफी ही एक एक्स-रे तपासणी आहे. विशिष्ट पद्धतीच्या तपासणी मधून स्त्रियांच्या स्तनांमधील गाठीची तपासणी कॅन्सर आहे की नाही हे बघण्यासाठी केला जातो. डॉक्टर्स डे च्या निमित्त आम्ही हा उपक्रम राबवतो आहे. भारतीय जनता पार्टी व रोटरी क्लब वरोरा या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. डॉक्टर सागर वजे यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमासाठी वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
        यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी डॉक्टर खूजे, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी आमदार शोभाताई फडणवीस, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, रेखाताई पाटील, सागर वझे व त्यांच्या मातोश्री व त्यांच्या पत्नी मीरा वझे, डॉक्टर विवेक तेला, करण देवतळे, रमेश राजूरकर, अहेतेशाम अली, समीर बारई, रोटरीचे अध्यक्ष पराग पत्तीवार, अदनान सिद्दीकोट, बाळूभाऊ पिसाळ, बंडू देऊळकर, डॉक्टर राहुल धांडे, डॉक्टर कपिल टोंगे, भाजपाचे भगवान गायकवाड, आदी  मान्यवर व्यक्ती व भाजपाचे व रोटरी क्लबचे सदस्य  या कार्यक्रमासाठी उपस्थित होते

बुधवार, मार्च २२, २०२३

ट्रक-कार चा भीषण अपघातात डॉक्टर पती पत्नीचा चा मृत्यू

ट्रक-कार चा भीषण अपघातात डॉक्टर पती पत्नीचा चा मृत्यू


शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
वरोरा : वरोरा वणी मार्गांवरील शेंबळ गावाजवळ भरधाव ट्रक ने वणीकडे येत असलेल्या कारला जबर धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. तब्बल अर्धा किलोमीटर पर्यंत कारला ट्रकने ओढत नेले. या भीषण अपघातात तरुण महिला डॉक्टरचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पतीचा ही मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना बुधवार दि. 22 मार्चला दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली.डॉ. अश्विनी गौरकार- झाडे (31) असे मृतक डॉक्टर चे नाव आहे त्या पाच नंबर शाळे जवळ वास्तव्यास होत्या. तर त्या तीन दिवसापूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर रुजू झाल्या होत्या. त्यांचे पती डॉ. अतुल गौरकार हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. ते वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे कर्तव्य बजावत होते.

डॉक्टर दाम्पत्य MH-34- AM- 4240 या कार ने वणीकडे येत होते तर विरुद्ध दिशेने ट्रक क्रमांक MH- 34-BZ-2996 हा ट्रक भरधाव वेगात होता. अचानक दोन्ही वाहने समोरासमोर भिडली. अपघात भीषण होता, यावेळी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. तसेच पोलिसांना सुचविण्यात आले. जखमींला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले.

शुक्रवार, मार्च १७, २०२३

 19 व 20 मार्चला जिल्ह्यातील हे मार्ग राहणार बंद

19 व 20 मार्चला जिल्ह्यातील हे मार्ग राहणार बंद

वरोरा ते वणी मार्गावरील पाटाळा पुलाच्या बांधकामादरम्यान

सर्व प्रकारच्या वाहतुकीस पुर्णतः बंदी

19 व 20 मार्च रोजी सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत राहणार वाहतुक बंद

पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे पोलिस विभागाचे आवाहन






शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
: वरोरा ते वणी या राष्ट्रीय महामार्गावरील पाटाळा पुलाचे काम सुरू असल्याने पुलाच्या बांधकाम दरम्यान 19 मार्च रोजी रात्री 8 वाजतापासुन ते 20 मार्च 2023 रोजीचे सकाळी 8 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीस पुर्णतः बंदी घालण्यात येत असुन वाहतूक वळविण्याबाबत आदेशीत करण्यात येत आहे.
पोलिस स्टेशन, माजरी हद्दीतील वरोरा ते वणी या मार्गावरील पाटाळा येथे नविन निर्माणाधिन पुलाचे बांधकाम करणे प्रस्तावित आहे. सदर पुलाच्या बांधकामादरम्यान जड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतुक समस्या निर्माण होवून अडचण निर्माण होवू नये. तसेच अपघातासारखे प्रकार घडून जिवीत व वित्तहानी होवू नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासंदर्भात नव्याने उपाययोजना करण्याचे आवश्यक झाले आहे.

या पर्यायी मार्गाचा करा अवलंब:
वरोरा कडून वणीकडे जाण्यासाठी वरोरा-भद्रावती-साखरवाही फाटा-घुग्गुस-वणी या मार्गाचा अवलंब करावा. तसेच वणीकडून वरोराकडे जाण्यासाठी वणी-घुग्गुस-साखरवाही फाटा-भद्रावती-वरोरा या मार्गाचा अवलंब करावा. व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.

गुरुवार, ऑगस्ट २५, २०२२

Chandrapur Breaking News | चारगाव धरणात बुडून दोन युवकाचा मृत्यू

Chandrapur Breaking News | चारगाव धरणात बुडून दोन युवकाचा मृत्यू



by Shirish Uge
वरोरा |  स्थानिक शेगाव येथुन जवळच असलेल्या चारगाव धरण येथे आज दुपार तीन वाजताच्या सुमारास दोन युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  Two youths died due to drowning

      सविस्तर असे की बाहेर गावी शिकत असल्याने आज पोळ्या निमित्याने कॉलेज ला सुट्ट्या लागल्या असल्याने एन्जॉय म्हणून फिरण्याचा बेत घेऊन सर्व मित्र एकत्र येऊन चारगाव धरण येथे जाण्याचा बेत घेतला व इथे आले . सदर धरणाचे मनमोहक दृश्य पाहून फोटो काढण्यात सुरुवात केली तेव्हा मृतक हार्दिक विनायक गुळघाणे राहणार शेगाव बू.हा सेल्फी फोटो काढण्या करिता गेला असता पाय स्लीप होऊन पाण्यात पडला. तेव्हा मृतक आयुष चीडे राहणार वरोरा हा त्याला वाचविण्या करिता गेला असता तो सुधा पाण्यात पडला . तेव्हा या दोघाचा मृत्यू झाला.. यात हार्दिक विनायक गुळघाने वय १९ वर्ष राहणार शेगाव बू... तर दुसरा आयुष चिडे याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती शेगाव पोलीस स्टेशन शेगाव चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांनी घटना स्थळ गाठून मुलांना पाण्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गावातील श्री रामकृष्ण भट यांच्या सहकार्याने नाव्ह व लोखंडी गळ च्या साह्याने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले ...सदर मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदन करण्या करिता उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेण्यात आले . याचा अधिक तपास ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पोलीस कर्मचारी तपास करीत आहे . मृत युवक सोबत त्यांचे सवंगडी श्वेतम जयस्वाल राह.शेगाव बू. मयूर पारखी राह.वरोरा. आश्रय गोळगोंडे राह.वरोरा.हे मित्र तलाव बाहेर असल्याने त्यांचे प्राण वाचले..

Chandrapur News34 Mh 34 | Warora | Chandrapur Police

बुधवार, एप्रिल ०६, २०२२

आनंदवनात कर्णबधिर मुला - मुलींकरीता " शिक्षणाचे महत्त्व व महिला हक्क " या विषयावरमार्गदर्शन सत्र संपन्न

आनंदवनात कर्णबधिर मुला - मुलींकरीता " शिक्षणाचे महत्त्व व महिला हक्क " या विषयावरमार्गदर्शन सत्र संपन्न


शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
वरोरा : महारोगी सेवा समिती निजबल अंतर्गत संधिनिकेतन अपंगाची कर्मशाळा व आनंद मूकबधिर विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कर्णबधिर मुला - मुलींकरीता " शिक्षणाचे महत्त्व व महिला हक्क " या विषयावर आनंदवनातील निजबल येथील प्रांगणात मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी मंडलिक, जयश्री सोमण ( मुंबई ), संधिनिकेतन अपंगाच्या कार्यशाळेचे अधिक्षक रवींद्र नलगिंटवार, आनंद मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भसारकर प्रामुख्याने उपस्थित होते.
मार्गदर्शन सत्रात मुंबईहून आलेल्या व स्वतः कर्णबधिर असलेल्या नंदिनी मंडलिक आणि जयश्री सोमण यांनी साईन लॅग्वेज, कृती अभिनय, विद्यार्थी सहभाग या माध्यमातून प्रभावी संवाद साधला. ' शिक्षणाचे महत्त्व व महिला हक्क ' यावर आपले विचार मांडताना त्या म्हणाल्या की, शिक्षणामुळे व्यवहारज्ञान वाढते. समाजात , प्रवासात सामान्य व्यक्तींशी व्यवहार करण्यासाठी तसेच उच्च शिक्षणासाठी सामान्यांप्रमाणेच कर्णबधिरांनाही भाषेचा वापर करता आला पाहिजे. यासाठी त्यांनी सतत प्रश्न विचारत, माहिती घेत शब्दसंग्रह करावा,असा सल्ला त्यांनी दिला. समाजातील काही वाईट प्रवृत्तीकडून कर्णबधिर मुलींची फसवणूक होऊ शकते, या करिता आई - वडिलांचा सल्लामसलत करून निर्णय घ्या, असे ही त्यांनी मुलींना सुचविले. कुटुंबातील व्यक्तींना समजून घ्या, सहकार्य करा ,चांगली संगत ठेवा या बाबी त्यांनी नाट्यमय पद्धतीने व विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन समजावून सांगितले.
स्वत:च मूकबधिर असलेल्या मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मिळाल्याने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शब्दाच्या पलीकडे जाऊन एकमेकांच्या भावना समजून घेत या उपक्रमाचा भरपूर आनंद लुटला
सुरूवातीला रवींद्र नलगिंटवार, यांनी आनंदवन निर्मित भेटवस्तू देऊन पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आनंद मूकबधिर विद्यालयातील सेवानिवृत्त विशेष शिक्षक दीपक शिव यांनी केले. आभार मुख्याध्यापक विजय भसारकर यांनी मानले.
संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे व कार्यकारी विश्वस्त कौस्तुभ आमटे यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित मार्गदर्शन सत्रात दोन्ही शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्णबधिर व्यक्ती कर्णबधिर मुलांना किती तन्मयतेने व आपुलकीने समजावून सांगतात व मुलेही त्यांना कसा उत्तम प्रतिसाद देतात याचा प्रत्यय या कार्यशाळेतून आला.