Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑक्टोबर १६, २०२१

सेंट्रल बँकेच्या संथगतीच्या कामकाजाला कंटाळून ग्रामस्थ बँकेला लावणार टाळे


स्टार पोलीस टाइम्स / इम्तियाज शेख

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील सेंट्रल बँक ऑफ विहामांडवा येथील कर्मचारी अभावी तसेच वारंवार रेंज राहत नसल्यामुळे संथगतीने चालणाऱ्या कामकाजाला कंटाळून खातेदारास नाहक त्रास सोसावा लागत असल्यामुळे दि. २० ऑक्टोंबर २०२१ रोजी व्यापारी संघटनेसहित ग्रामस्थानी बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, वीस-पंचवीस खेड्याचा कारभार चालवत असणारी विहामांडवा येथील सेंट्रल बँक ऑफ विहामांडवा ग्रामीण भागामध्ये एकमेव बँक असल्यामुळे या ठिकाणी नेहमी ग्रामस्थांची गर्दी असते, जास्त गर्दी असल्यामुळे अनेक वृद्धांना, पेन्शन धारकांना, शेतकरी बांधवांना अपंगांना आशा गरजवंतांना कित्येक वेळा त्रास सहन करून पैसे न मिळताच रिकाम्या हातानेच माघारी जावाय च्या घटना घडलेल्या आहेत. या ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीना वरिष्ठ अधिकारीच जबाबदार असल्याचे निदर्शनात येत आहे. कारण बँकेमध्ये अनेक महिन्यापासून रेंज कधी असते, तर कधी नसते, तसेच बँकेमध्ये कर्मचारी संख्याचा आभाव, असल्यामुळे येथे कार्यरत असणाऱ्या कर्तव्यदक्ष बँक व्यवस्थापका सहित कर्मचाऱ्यावर कामाचा अतिबोजा पडत असल्यामुळे त्यांनाही नाहक त्रास सोसावा लागतो. सध्या शेतकरी मेटाकुटीस आलेला असून अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना बँकेच्या हलगर्जीपणामुळे पिक कर्ज मिळालेले नाहीत. पिक कर्ज न मिळाल्यामुळे शेतकरी बांधवांचे अतोनात हाल होत आहे. बँकेच्या अनेक कार्यप्रणाली मध्ये बदल झाल्यामुळे, तसेच नेहमी नेहमी रेंज नसल्यामुळे, विशेष कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे बँक अधिकार्‍यासह इतर शेतकरी बांधवांना तीव्र समस्यांचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थाच्या सदर मागणीची दखल १८ ऑक्टोंबर २०२१ अगोदर घेण्यात यावी, नसता २० ऑक्टोंबर २०२१ रोजी सदर समस्यांचे निवारण न झाल्यामुळे ग्रामस्थ सहित व्यापारी बांधवांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना  लेखी निवेदन देऊन, बँकेला टाळे ठोकण्याचा नाईलाजात्सव निर्णय घेतल्याचा इशारा दिला  आहे . या निवेदनावर व्यापारी महासंघ अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर,नवगावचे उपसरपंच शरिफ पठाण, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रा. सदस्य सुनील पा.डुकरे, रणजीत पा. डुकरे,भागवत डुकरे ,शेख शिराज,आरेफ शेख,इम्रान शहा, शेख जावेद ,शेख मोहसिन, यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.