Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
बुधवार, डिसेंबर २१, २०२२
बुधवार, डिसेंबर १४, २०२२
जुन्नर बिबट सफारीचा सविस्तर प्रकल्प अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत तयार करा
जुन्नर बिबट सफारीचा सविस्तर प्रकल्प अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत तयार करावा
-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई | जुन्नर तालुक्यात होणारा बिबट सफारी प्रोजेक्ट स्थानिक पर्यटन आणि रोजगाराला चालना देणारा असावा. त्यादृष्टीनेच या प्रकल्पाची आखणी व्हावी. येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाला दिले आहेत.
जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे नियोजित बिबट सफारीच्या अनुषंगाने मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मंत्रालयात आज आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) डॉ. वाय. एल. पी. राव यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जुन्नर आणि आसपासच्या तालुक्यात बिबट्यांची संख्या अधिक आहे. याठिकाणी बिबट सफारी प्रकल्प केला तर त्यामुळे स्थानिक भागात रोजगार आणि पर्यटनाच्या अधिकच्या संधी निर्माण होणार आहेत. याशिवाय, या परिसरात इतर अनेक पर्यटनस्थळेही आहेत. या प्रोजेक्टमुळे या पर्यटनक्षेत्रांकडेही पर्यटक आकर्षिले जाणार आहेत. त्यामुळेच बिबट सफारीच्या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करतांना या सर्व बाबींचा विचार केला जावा. बिबट सफारीचा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होताच तात्काळ निविदा प्रक्रिया राबवून कामांना सुरुवात करावी. विहित वेळेत कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
Prepare a detailed project report of Junnar Bibat Safari by 15 February
यावेळी माजी खासदार श्री. आढळराव व माजी आमदार श्री. सोनवणे यांनी, जुन्नर आणि आसपासच्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा असल्याचे सांगितले.
गुरुवार, नोव्हेंबर २४, २०२२
खटकाळे तेथे शेतकरी बचत गटातील महिलांना भाजीपाला पिकांच्या बियाण्यांचे वाटप
शुक्रवार, ऑक्टोबर २१, २०२२
'एसएफआय'चे शाळा बंदी विरोधात पंचायत समितीसमोर आंदोलन
शनिवार, सप्टेंबर १७, २०२२
दिशाभूल व खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा |
जुन्नर /आनंद कांबळे
११२ नंबरला फोन करून दिशाभूल करणारी व खोटी माहिती दिल्या प्रकरणी जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये एका विरुद्ध कलम १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.
घडलेली हकीगत सविस्तर अशी की पोलीस खात्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व तात्काळ मदत उपलब्ध होण्याच्या हेतून ११२ हा नंबर जारी केला असून आपत्कालीन स्थितीत अथवा संकटाच्या वेळी हा नंबर डायल केला असता सदर व्यक्तीला तातडीने मदत उपलब्ध होते दरम्यान आज जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये ९५५२९७६८८५ या मोबाईल क्रमांकावरून एका अज्ञात इसमाने मी घोगरेवाडी, सुराळे ता जुन्नर येथील रहिवासी असून आमच्या इथे खूप सारे लोक नदीत वाहून गेले असून त्यात माझा भाऊ देखील आहे व आम्हाला मदत हवी आहे अशा आशयाचा फोन केला. बाब गंभीर असल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ मदतीसाठी रवाना झाले मात्र सदर ठिकाणी जाऊन स्थानिक नागरिक व पोलीस पाटील यांना घटनेची माहिती विचारली असता ही बाब खोटी असून अशी कोणतीही घटना या ठिकाणी घडलेली नाही अशी माहिती प्राप्त झाली.
त्यामुळे सदर इसमाने ११२ क्रमांकावर खोटा व दिशाभूल करणारा फोन केल्याचे सिद्ध झाल्याने त्या व्यतिविरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात कलम १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Misleading and false information by calling 112 number
सोमवार, ऑगस्ट २२, २०२२
रतिलाल बाबेल यांना इंडिया एज्युकेशनल राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
शनिवार, ऑगस्ट २०, २०२२
जुन्नरच्या संस्कृती दहीहंडी उत्सवास नागरिकांची मोठी गर्दी
शनिवार, ऑगस्ट १३, २०२२
Local News | डिसेंट फाउंडेशनचा "कळी उमलताना" उपक्रम कौतुकास्पद : प्राचार्य डॉ. उत्तम शेलार
सोमवार, ऑगस्ट ०८, २०२२
अखिल भारतीय किसान सभेचे जुन्नर तालुका अधिवेशन |
गुरुवार, जुलै १४, २०२२
आई -वडील दैवत आहे , त्यांची स्वप्नं पूर्ण करा: संतोष काशिद
आई -वडील दैवत आहे , त्यांची स्वप्नं पूर्ण करा: संतोष काशिद
जुन्नर /आनंद कांबळे
बाळांनो , आई -बाबांनी हे सुंदर जग आपल्याला दाखविल आहे, जीवन खूप सुंदर व अनमोल आहे.असेच यशवंत , गुणवंत व्हा,चांगल्या मित्रांची संगत करा,आई ,वडील व गुरूंचा आदर करा , त्यांची स्वप्नं पूर्ण करा ,असे ऑस्ट्रेलिया निवासी संतोष काशिद यांनी मुलांना मार्गदर्शन केले. Santosh kashid
चिंचोली ( काशिद ) ता.जुन्नर येथील श्री समर्थ मधुकरराव विद्यालयात एस. एस. सी.चा १००% निकाल लागल्याबद्दल गुरूदक्षिणा फाऊंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व शिक्षकाचा कौतुक सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून काशिद बोलत होते .
संस्थेचे उपाध्यक्ष बबनराव काशिद हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .या वेळी विद्यालयातील गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक - शिक्षकेतर वृंद यांना सन्मान चिन्ह , शाल , गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच अनया या विद्यार्थिनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य व बिस्किटे वाटण्यात आली .
या प्रसंगी श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिर चे माजी मुख्याध्यापक एफ .बी.आतार , संतोष काशिद ,सामाजिक कार्यकर्ते संदिप पानसरे ,संचालक अजित काशिद , तुकाराम चव्हाण , भास्कर काशिद ,मनिषा काशिद आदि मान्यवरांसह पालक , विद्यार्थी , शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक विठ्ठल गडगे यांनी तर उपशिक्षक विठ्ठल भोर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .
-----------------------
ऑस्ट्रेलिया निवासी माजी विद्यार्थ्यांच्या मुलीचा वाढदिवस शैक्षणिक
https://www.khabarbat.in/2022/07/santosh-kashid-house.html
Australian
रविवार, जुलै १०, २०२२
ऑस्ट्रेलिया निवासी माजी विद्यार्थ्यांच्या मुलीचा वाढदिवस शैक्षणिक उपक्रमातून साजरा
जुन्नर /आनंद कांबळे
सावरगाव ( ता.जुन्नर )येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय चे माजी विद्यार्थी संतोष शांताराम काशिद नोकरीच्या निमित्ताने परिवारासह ऑस्ट्रेलियात वास्तव्यास आहेत. जवळपास ३/४ वर्षानंतर मायभूमीत आल्यानंतर प्रथम शाळेला भेट दिली. मुलगी अनया हिचा वाढदिवस मुला-मुली समवेत साजरा केला.
एस. एस. सी.च्या परिक्षेत गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थिनीचा सन्मान चिन्ह , शाल , श्रीफळ देऊन कौतुक केले. सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
चिंचोली ( काशिद ) येथील हा विद्यार्थी ऑस्ट्रेलिया येथे अभियंता म्हणून काम करतो .तेथे भारतीय लोकांना एकत्र करून मुलांसाठी चार मराठी शाळा सुरू केल्या आहेत त्याचबरोबर सर्वांना एकत्र करून शिवजयंती , गणेशोत्सव ,स्वातंत्र्य दिन साजरा करतात. पत्नी मनीषा ही देखील अभियंता असून महिला दिन , हळदी कुंकू , रक्षाबंधन कार्यक्रम घेतात .
या प्रसंगी संचालक माधवराव बाळसराफ , डिंसेंट फाउंडेशन चे प्रकल्प समनव्यक फकिर आतार ,मुख्याध्यापक साळुंके , माजी सनदी अधिकारी शंकर कचरे , माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुरेश भागवत , संतोष काशिद , संदिप पानसरे , मनिषा काशिद आदि मान्यवरांसह विद्यार्थी शिक्षक , कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पेश ढमढेरे , स्वागत अरुणाआल्हाट मॅडम तर आभार ज्येष्ठ शिक्षक जयकुमार कडाळे यांनी व्यक्त केले
माजी विद्यार्थी संतोष यांनी किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी वेंडिंग व डिस्ट्रॉय मशिन , ई-लर्निंग सॉफ्टवेअर,कोरोना ग्रस्त मुलांना मदत , हे खरोखर कौतुकास्पद आहे असे मुख्याध्यापक अनिल साळुंके यांनी सांगितले .
https://www.khabarbat.in/2020/06/kashid-family-of-chincholi-gave-free.html
#sagarkashid #sapnapatil #marathibeatz
Santosh Kashid |
सोमवार, जुलै ०४, २०२२
दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर शहरालगतच्या सोमतवाडी येथील पद्मावती तलावाच्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाय घसरून ते दोघेही तलावात पडल्याने तेथील गाळमध्ये अडकून या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
पवन दुर्गेश ठाकूर वय 13 , सम्राट देवेंद्र परदेशी वय 14 दोघेही राहणार परदेशपुरा जुन्नर असे हा घटनेत मयत झालेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत. रविवारी दुपारी हे दोघे जण सोमतवाडी येथील पद्मावती तलाव येथे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी फोटो काढीत असताना त्यांचा पाय घसरून ते दोघेही तलावात पडले. तेथे असलेल्या खोल खड्ड्यांमधील गाळा मध्ये अडकून या दोघांचा मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी त्यांना ओढून बाहेर काढले. त्यांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी ते मयत असल्याचे सांगितले. अभिलाष परदेशी यांनी या घटनेची खबर जुन्नर पोलिसांना दिली. पुढील तपास जुन्नर पोलिस करीत आहेत.
जुन्नर, महाराष्ट्र 410502, भारत
Latest News on Junnar | Breaking Stories and Opinion Articles
रविवार, जुलै ०३, २०२२
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ तालुकाध्यक्षपदी सौ.अनिताताई गुंजाळ यांची निवड #anitagunjal
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर प्रकल्पतील सर्व सेविका. मिनी सेविका. मदतनीस यांचा संघटनात्मक मेळावा कोंडाजी बाबा डेरे आश्रम जुन्नर या ठिकाणी पार पडला.यावेळी तालुकाध्यक्षपदी आनिताताई गुंजाळ यांची निवड करण्यात आली अशी माहिती राज्याचे उपाध्यक्ष निलेश दातखिळे यांनी दिली.
सण 1986साली एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प जुन्नर ची निर्मिती झाली. प्रकल्प अंतर्गत लहान मुलांचे कुपोषण निर्मूलन व्हावे म्हणून अंगणवाडी सेविका. मिनी सेविका. मदतनीस यांची नेमणूक करण्यात आली.
प्रकल्प निर्मिती मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुरवातीला 50रू मानधन होते.संघर्ष करून सद्या त्यांचे मानधन 8250रू झाले अल्पशा मानधनात काम करावे लागत होते. अंगणवाडी कर्मचारी एकत्र येऊन.कॉम्रेड एम. ए पाटील सरच्या मार्गदर्शनाखाली कॉम्रेड ब्रिजपाल सिंग व कॉम्रेड व्ही डी दातखिळे तसेच सविंद्रा बोऱ्हाडे यांच्या सहकार्याने जुन्नर तालुक्यात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ तयार करून पायाभरणी केली. एक एक महिलांना जोडत संघटनेचा बालेकिल्ला जुन्नर प्रकल्पत तयार करण्यात आला.
जुन्नर प्रकल्प मेळाव्याच्या निमित्ताने अंगणवाडी कर्मचारी यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या. मानधन वाढ करा. पेन्शन योजना लागू करा. आजारपणाची रजा द्या. मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करणे.लहान मुलांना चांगल्या प्रतीचा आहार द्या. अमृता आहारातील दरवाढ करा.आशा अनेक अत्यंत महत्वाच्या विषयवार संघटनात्मक चर्चा करण्यात आली.
अंगणवाडी कर्मचारी यांना शासकीय सेवेत वर्ग करून स्पे स्केल लागू करण्याबाबत औद्योगिक न्यायालय पुणे येथे केस घालण्यात आली आहे
आदीवासी भागातील पेसा अंतर्गत ए पी जे अमृत आहार देण्यात येतो. महागाईच्या दृष्टीने
शासना कडून दरवाढ न झाल्यामुळे दि 1ऑगस्ट 2022पासून लाभार्थी यांना वाटप न करण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचारी यांनी घेतला आहे.
अंगणवाडी कर्मचारी यांच्या मागण्यासाठी केंद्र व शासन स्तरावर या पुढे अनेक लढे देण्याबाबत संघर्ष करण्याचा निर्धार करण्यात आला.
कोव्हीड 19मध्ये अंगणवाडी कर्मचारी यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता कोव्हीड चे काम जिगरीने काम केले. समाजामध्ये उल्लेखनीय काम करून स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे.
मेळाव्याच्या निमित्ताने नवीन प्रतिनिधी ची नेमणूक करण्यात आली. तालुका अध्यक्ष पदी अनिताताई गुंजाळ. तर तालुका सचिव पदी मीराताई तळपे यांची नेमणूक करण्यात आली आहे .संघटनात्मक
सोशल मीडिया प्रतिनिधी म्हणून किशोरी खंडागळे यांची नेमणूक करण्यात आली.
तसेच काही बिट मध्ये नवीन बिट प्रतिनिधीची नेमणूक करण्यात आली.
भारतीय महिला फेडरेशन तालुका प्रतिनिधी म्हणून सविंद्रा ताई बोऱ्हाडे. शैलेजा कोऱ्हाळे. शोभा डुंबरे. मालती नवले यांची नेमणूक करण्यात आली आहे.
अंगणवाडी केंद्रातील लाभार्थी यांची पटसंख्या वाढवी तसेच लहान मुलांचे कुपोषण निर्मूलन करावे.व पूर्व प्राथमिक शिक्षण लहान मुलांना देण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सातत्याने प्रयत्न करतील. गरम व ताजा आहारापासून लाभार्थी वंचित राहणार नाही. या बाबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघांचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड निलेश दातखिळे व जिल्हा अध्यक्ष सविंद्रा बोऱ्हाडे यांनी उपस्तित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन सोनाली हांडे यांनी केले.केंद्र सरकारने व महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन जगण्या इतके वेतन द्यावे अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांची आहे.
शैलेजा कोऱ्हाळे. अनिता थोरात. रंजना देवाडे.रंजना गायकवाड.राजश्री शेळकंदे. नंदा गायकवाड.विदया ढोले. अरुणा दुराफे. वनिता ढोले. गुलाब वाबळे. स्मिता वाघुले. पुलावती थोरवे.शिला मातेले गंगुबाई साबळे. मीना चकवे रोहिणी गवारी.तसेच सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिस मोठ्या संखेने उपस्थित होत्या.
जुन्नर, महाराष्ट्र 410502, भारत

